AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिंदू हो क्या? विचारून हल्ला करणाऱ्या जैब जुबेरकडे सापडलेल्या कागदात धक्कादायक मजकूर; काय घेतली शपथ?

मीरा रोड चाकू हल्ला प्रकरणी जैब झुबेर अन्सारीच्या घरातून ISIS ला बैयत (शपथ) घेतलेली धक्कादायक चिठ्ठी सापडली आहे. त्यात त्याने 'लोन वुल्फ' हल्ल्यांचा उल्लेख करत इस्लामिक स्टेटमध्ये सामील होण्याचे आवाहन केले आहे. एटीएस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, जैबचा नेमका हेतू काय होता आणि त्याचे दहशतवादी संघटनांशी काही संबंध आहेत का, याचा शोध सुरू आहे. त्याचा मोबाईल फॉरमॅट करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचेही समोर आले आहे.

हिंदू हो क्या? विचारून हल्ला करणाऱ्या जैब जुबेरकडे सापडलेल्या कागदात धक्कादायक मजकूर; काय घेतली शपथ?
जैब जुबेरकडे सापडलेल्या कागदात धक्कादायक मजकूर
| Updated on: Apr 29, 2026 | 2:37 PM
Share

मिरा रोडच्या नयानगरमध्ये एका वॉचमनवर चाकू हल्ला करणाऱ्या जैब जुबैरच्या चांगल्याच मुसक्या आवळल्या गेल्या आहेत.  तुम हिंदू हो क्या ? कलमा पढना आता है क्या ? नमाज पढते हो क्या ? असं म्हणत धर्म विचारून जैबने हल्ला केल्याने या प्रकरणाचं गांभीर्य अधिकच वाढलं आहे. पहलगाम हल्ल्यासारखं तर हे प्रकरण नाही ना? यासाठी दहशतवाद विरोधी पथक आणि एटीएसकडून या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे. एटीएसने जैबच्या घराची झाडाझडती घेतली. यावेळी त्यांना धक्कादायक गोष्टी आढळून आल्या आहेत. पोलिसांना एक नोट सापडली असून त्यावर त्याने धक्कादायक शपथ घेतल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे जैबचा नेमका हेतू काय होता? याचा शोध घेतला जात आहे.

मीरा रोड चाकू हल्ला प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. एटीएस सूत्रांनुसार मीरा रोडच्या नया नगर परिसरात दोन सिक्युरिटी गार्डवर हल्ला केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या जैब जुबेर अन्सारीने स्वतःचा मोबाईल फॉरमॅट केला होता. तपास यंत्रणांच्या नजरेसमोर पुरावे जाऊ नयेत आणि डेटा नष्ट व्हावा यासाठी त्याने मोबाईल फॉरमॅट केल्याचा संशय आहे. आरोपीने दुसरा मोबाईल कुठेतरी फेकून दिल्याची माहिती समोर आली असून एटीएस त्याचा शोध घेत आहे.

काय घेतली शपथ?

एटीएसने त्याच्या घरातून त्याने लिहिलेल्या काही नोट जप्त केल्या आहेत. त्यात त्याने आयसीसच्या प्रति बैयत म्हणजेच शपथ लिहिली होती. जैब जुबेर अन्सारीने लोन वुल्फ हल्ल्याचा उल्लेख करत लिहिलेल्या शपथेत “आम्ही अल्लाहकडे दुआ करतो की तो सर्व मुस्लिमांना योग्य मार्ग दाखवो आणि तरुणांना सांगतो की त्यांनी कुटुंबाची चिंता न करता इस्लामिक स्टेटमध्ये सहभागी व्हावे. अल्लाह त्यांना एक दिवस मार्ग दाखवेल. आज ते समजत नाहीत,” असं म्हटलं आहे.

“आज आम्ही एकटे आहोत आणि सर्वांनी आम्हाला नाकारले आहे, पण आम्ही ‘गुरबा’ ( एकटे पडलेले लोक) आहोत. कुटुंब, पत्नी, आई-वडील तुम्हाला सोडून देतील. अल्लाह त्यांना योग्य मार्ग दाखवो. गाझा फक्त खिलाफतद्वारेच मुक्त होईल! अल्लाहनंतर खिलाफत हीच एकमेव आशा आहे,” असंही त्याने या शपथेत म्हटलं आहे. हा सगळा आक्षेपार्ह मजकूर त्याने एका कागदावर लिहून ठेवल्याचे एटीएस सूत्रानी सांगितले.

दरम्यान, जैबला ठाणे न्यायालयाने 4 मेपर्यंतची एटीएस कोठडी सुनावली आहे. एटीएसने त्याच्या घरी धाड मारली होती. त्यावेळी त्याच्या घरातून ‘लोन वुल्फ’ हल्ले आणि ‘इस्लामिक स्टेट’ संदर्भातील चिठ्ठी जप्त करण्यात आली आहे. याशिवाय लॅपटॉप, मोबाईल, पेन ड्राइव्हसह संशयास्पद साहित्य पोलिसांच्या हाती लागले आहे. हे सर्व साहित्य महाराष्ट्र एटीएसकडून ठाणे एटीएसकडे तपास हस्तांतरित करण्यात आलं आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने अवघ्या दीड तासात आरोपीला अटक करण्यात आली होती. आरोपी पूर्वी अमेरिकेत वास्तव्यास होता. त्याची पत्नी अफगाण वंशाची आहे. त्याचा दहशतवाद्यांशी काही संबंध होता का? याचा शोध घेतला जात आहे. त्याची मुंबई-ठाण्यातील लिंक शोधली जात आहे.

Follow Us
ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; त्र्यंबकेश्वर मंदिर..
Kumbh Mela Update : ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; त्र्यंबकेश्वर मंदिर आज भाविकांसाठी राहणार बंद
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! राष्ट्रपतींच्या हस्ते
Nashik Kumbh : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद, राष्ट्रपतींच्या हस्ते प्रथमच ध्वजारोहण; एका ऐतिहासिक पर्वाला सुरुवात
ठाकरे बंधूंसोबतच्या भेटीवर फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
Devendra Fadnavis : ठाकरे बंधूंसोबतच्या भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
मी दाऊदबरोबर बसू शकत नाही, पण...; शेलारांच्या विधानाने चर्चांना उधाण
Ashish Shelar : मी दाऊदबरोबर बसू शकत नाही, पण...; आशिष शेलारांच्या एका विधानाने राजकीय चर्चांना उधाण
दाढीवाला अजगर... गुणरत्न सदावर्तेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका
Gunratna Sadavarte : दाढीवाला अजगर... गुणरत्न सदावर्तेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका; पूर्णेकर प्रकरणावरून आरोप- प्रत्यारोपांची मालिका सुरूच
सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच देणार, राजीनाम्यानंतर मिनाक्षी शिंदे....
Minakshi Shinde : सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच देणार..., राजीनाम्यानंतर मिनाक्षी शिंदे पहिल्यांदाच बोलल्या; आरोपांवर काय म्हणाल्या?
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट