Shinzo Abe shot: हाच तो क्षण, ज्यावेळी जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना मारल्या गोळ्या.. पाहा VIDEO

जेव्हा आबे हे निवडणूक प्रचार सभेत बोलत होते. त्याचवेळी गोळ्यांचे आवाज आले. गोळ्या लागल्याने आबे जागेवरच कोसळले. त्यांच्यावर पाठीमागून गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्या ठिकाणी एकच गोँधळ उडाला.

Shinzo Abe shot: हाच तो क्षण, ज्यावेळी जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना मारल्या गोळ्या.. पाहा VIDEO
हाच तो क्षण Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Jul 08, 2022 | 5:54 PM

टोकियो – जपानचे माजी पंतप्रधान (Former Japan PM)शिंजो आबे (Shinzo Abe)हे स्टेजवर भाषण करत असताला त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. आबे यांना दोन गोळ्या मारण्यात आल्या. गोळ्या मारल्यानंतर हल्लेखोर जागीच उभा राहिला. त्याने हल्ला केल्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्नही केला नाही. आबे यांच्यावर हा हल्ला नारा शहरात निवडणूक प्रचारावेळी करण्यात आला. काही वेळापूर्वीच त्यांचा हा दौरा ठरला होता.मात्र त्याची माहिती या हल्लेखोराला कशी मिळाली, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. त्यांना जेव्हा गोळ्या मारण्यात आल्या, तो क्षण कॅमेरात कैद (Video)झाला आहे.

नेमकं काय आहे व्हिडिओत

जेव्हा आबे हे निवडणूक प्रचार सभेत बोलत होते. त्याचवेळी गोळ्यांचे आवाज आले. गोळ्या लागल्याने आबे जागेवरच कोसळले. त्यांच्यावर पाठीमागून गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्या ठिकाणी एकच गोँधळ उडाला. सुरक्षारक्षकांनी त्यांना तातडीने गाडीत नेले आणि हॉस्पिटलकडे नेले. मात्र त्यांचा जीव वाचू शकला नाही. त्याचवेळी गोळीबार करणाऱ्या आरोपीलाही अटक करण्यात आली. त्याच्याकडून बंदूक जप्त करण्यात आली ती एखाद्या कॅमेरासारखी होती. या हल्लेखोराने स्वतानेच ही बंदूक तयार केली होती.

हल्लेखोर माजी सैनिक, वय ४२ वर्ष

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या हल्लेखोराने हा गोळीबार केला त्याचे वय ४२ वर्ष आहे. त्याचे नाव यामागामी तेत्सुया असे सांगण्यात आले आहे. तो माजी सैनिक होता आणि आबे यांची धोरणे त्याला पसंत नव्हती म्हणून त्याने गोळीबार केल्याचे सांगण्यात येते आहे. यामागामी याने वापरलेली स्टेनगनही जप्त करण्यात आली आहे. संपूर्ण जगात जपानमध्ये बंदुकीच्या वापराबाबत सर्वात कठोर नियम आहेत. त्या ठिकाणी खुलेआम हा प्रकार घडल्याने अनेकांचा आश्चर्य वाटले आहे. आबे यांच्यावर हल्ला करण्यासाठी स्टेनगनचा वापर करण्यात आल्याची माहिती आहे.

शिंजो आबे सर्वाधिक काळ पंतप्रधानपदावर

शिंजो आबे हे जपानचे सर्वाधिक काळ पदावर राहिलेले पंतप्रधान होते. वयाच्या ५२ व्या वर्षी त्यांची निवड पंतप्रधानपदासाठी करण्यात आली होती. सर्वात कमी वयात पंतप्रधान होण्याचा मानही त्यांना मिळाला होता. २०२० साली कोलायटिस या आजारामुळे त्यांनी आपल्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.