3 हजार वर्षांपासून दडवून ठेवले होते 3 मडके, खोदकामात समोर दिसलं असं काही की सर्वांनाच बसला धक्का!
सध्या संशोधकांना अद्भुत असा खजिना सापडला आहे. या खजिन्यात अशा काही गोष्टी मिळाल्या आहेत, ज्याच्या मदतीने अनेक रहस्यांचा उलगडला होणार आहे.

Treasure Hunting : पृथ्वीच्या पोटातून कधी काय बाहेर येईल हे कधीच सांगता येत नाही. शेकडो, हजारो लाखो वर्षांपूर्वीची संस्कृती आज नष्ट झाली आहे. पृथ्वीवर खोदकाम केलं तर या संस्कृतीची पाळंमुळं सापडतात. काही पुराव्यांच्या आधारे नंतर पुरातत्त्व शास्त्रज्ञ इतिहास शोधून काढण्याचा प्रयत्न करतात. सध्या एका खोदकामातून अचंबित करणारा खजानाच समोर आला आहे. विशेष म्हणजे हा काही साधासुधा खजाना नसून त्याच्या मदतीने इतिहासाची अनेक रहस्ये उलगडली जाऊ शकतता. संशोधकांना हा अमूल्य खजिना मिळाला असून आता अनेक प्रश्नांची उत्तरं सुटणार असल्याचे म्हटले जात आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार खोदकामात सापडलेला हा तीन मडक्यांतील खजिना तब्बल 1800 वर्षांपूर्वीचा आहे. या खजिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
खजिना नेमका कुठे सापडला?
मिळालेल्या माहितीनुसार संशोधकांच्या हाती लागलेला हा खजिना 1800 वर्षांपूर्वीचा असून तो फ्रान्स देशात सापडला आहे. फ्रान्स देशातील उत्तर पूर्वेला असलेल्या सेनॉन या भागात हा खजिना सापडला असून संशोधकांच्या हाती एकूण तीन मडके लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून संशोधकांची टीम त्या भागात खोदकाम करत होती. या तिन्ही मडक्यांमध्ये नाणे आढलले आहेत. एका मडक्यात साधारण 38 किलो वजनाचे सिक्के आढळले आहेत. त्यात एकूण 23000 ते 24000 सिक्के असल्याचे बोलले जात आहे. तर दुसऱ्या मडक्याचे वजन 50 किलो आहे. यात साधारण 18000 ते 19000 नाणे असल्याचे बोलले जात आहे. तिसऱ्या मडक्यात फक्त तीनच नाणे सापडले आहेत.
सापडलेल्या नाण्यांवर नेमके काय आहे?
संशोधकांना आढळलेल्या या नाण्यांवर विक्टोरिनस, टेट्रिकस प्रथम, टेट्रिकस द्वितीय यासारख्या सम्राटांचे चित्र आहे. या शासकांनी इसवी सन 260 ते 274 या काळात शासन केलेले आहे. शेकडो वर्षांपासून या मडक्यातील नाणे पृथ्वीच्या पोटातच होते. आता ही नाणी बाहेर काढण्यात आली असून संशोधक त्यावर अभ्यास करत आहेत. या अभ्यासातून आता रोमन साम्राज्यातील राहणीमान कसे होते, अर्थव्यवस्था कशी चालायची, याचा शोध घेण्यास मदत मिळणार आहे.
