AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ट ट्रम्प यांना दाढी टोचली… सैन्यासाठी घेतला मोठा निर्णय; शिखांपासून मुस्लिमांचं टेन्शन वाढलं

गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प हे त्यांच्या टॅरिफ धोरामुळे चांगलेच चर्चेत आहेत. पण आता त्यांनी अमेरिकेतील सैन्यासाठी घेतलेल्या निर्णयाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. नेमका काय निर्णय घेतला चला जाणून घेऊया...

डोनाल्ट ट्रम्प यांना दाढी टोचली... सैन्यासाठी घेतला मोठा निर्णय; शिखांपासून मुस्लिमांचं टेन्शन वाढलं
Donald TrumpImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Oct 05, 2025 | 1:56 PM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प यांनी सैनिकांसंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयामुळे आता अमेरिकेतील शीखांचे आणि मुस्लीमांचे टेन्शन वाढले आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी एक नवीन आदेश जारी केला आहे. ३० सप्टेंबरला जारी झालेल्या या कडक ग्रूमिंग धोरणामुळे अमेरिकेतील सैनिकांचे टेन्शन वाढले आहे. आता हे धोरण नेमकं काय आहे? चला जाणून घेऊया…

अमेरिकेच्या सेनेत २०१० पूर्वीच्या नियमांची पुनरावृत्ती करण्यात आली आहे. म्हणजेच, बहुतांश सैनिकांसाठी दाढीवर बंदी घालण्यात आली आहे. फक्त काही स्पेशल फोर्सेस युनिट्सना मर्यादित सूट दिली जाईल. हेगसेथ यांनी वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांना संबोधित करताना सांगितले की, हा निर्णय शिस्त आणि युद्धक क्षमते (lethality) ला पुन्हा स्थापित करण्यासाठी आवश्यक आहे. त्यांनी इशारा दिला की, सेनेत अनुचित वैयक्तिक अभिव्यक्ती आणि विचित्र शेविंग प्रोफाइल्सचा अंत केला जाईल.

वाचा: मोठी बातमी! अपघाता वेळी गौतमीच्या गाडीत होता मोठा अधिकारी? काय करत होता? खळबळजनक दावा काय?

६० दिवसांत अंमलबजावणी होईल

पेंटागॉनच्या मेमोनुसार, सर्व सैन्य शाखांना या धोरणाची अंमलबजावणी ६० दिवसांत करावी लागेल. यात स्पष्ट केले आहे की, सैनिक फेशियल हेअर (दाढी) ठेवू शकणार नाहीत. वास्तवात, २०१० पासून धार्मिक स्वातंत्र्यासाठी दाढी ठेवण्यास सवलत दिली गेली होती. पण, आता ती जवळजवळ संपवण्यात आली आहे.

धार्मिक समुदायांवर परिणाम

हा नवीन नियम धार्मिक कारणांसाठी दाढी ठेवणाऱ्या सैनिकांना थेट प्रभावित करतो. त्यामध्ये शीख, ऑर्थोडॉक्स ज्यू आणि मुस्लिम समुदायातील सैनिकांचा समावेश आहे. शीख कोअलिशन, जी एक प्रमुख वकिली संघटना आहे, त्याने या निर्णयाची निंदा करत सांगितले की, हा निर्णय शेकडो धार्मिक सैनिकांना त्यांच्या धार्मिक विश्वास आणि देश सेवेतून एक पर्याय निवडण्यास भाग पाडेल.

२०१० नंतर मिळाली होती परवानगी

२०१० पूर्वीपर्यंत अमेरिकन सेनेत शीख सैनिकांना दाढी आणि पगडी घालण्याची परवानगी नव्हती. कारण सेनेचे नियम सर्व सैनिकांसाठी क्लीन-शेव चेहरा ठेवण्याची परवानगी देत होते. यामुळे अनेक शीख तरुणांना त्यांच्या धर्म आणि सेनेत सेवा करण्याच्या स्वप्नातून निवड करावी लागत होती. तसेच, वर्षानुवर्षे चाललेल्या कायदेशीर लढाई आणि मानवाधिकार मोहिमांनंतर परिस्थिती बदलू लागली. अनेक शीख सैनिकांनी न्यायालय आणि काँग्रेससमोर युक्तिवाद केला की, त्यांची धार्मिक ओळख, जसे पगडी आणि दाढी… त्यांच्या विश्वासाचा अविभाज्य भाग आहे, ती काढून घेणे धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन करणारे आहे.

हळूहळू न्यायालयांनी शीख सैनिकांना वैयक्तिक सूट (waiver) अंतर्गत त्यांची ओळख जपत सेनेत सामील होण्याची परवानगी दिली. अशा प्रकरणांची संख्या वाढत गेली आणि नंतर २०१७ मध्ये अमेरिकन संरक्षण विभागाने ही धोरण औपचारिकपणे स्वीकारले. या बदलानंतर शेकडो शीख, मुस्लिम आणि ज्यू सैनिकांना सेनेत त्यांच्या धार्मिक ओळखीसह सेवा करण्याची संधी मिळाली. ज्यामुळे हा निर्णय अमेरिकन सैन्य इतिहासात धार्मिक समानतेच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल मानला गेला. तसेच, आता पुन्हा एकदा सेनेत दाढीवर बंदी येणे शीख, ज्यू आणि मुसलमानांची टेन्शन वाढवत आहे.

अफ्रिकन-अमेरिकन सैनिकांवर परिणाम

हे धोरण ब्लॅक सैनिकांना (Black troops) देखील प्रभावित करेल ज्यांना Pseudofolliculitis Barbae (PFB) नावाच्या वेदनादायक त्वचारोगामुळे वैद्यकीय सूट दिली जात होती. आता ही सूट १२ महिन्यांपर्यंत मर्यादित केली गेली आहे. त्यानंतर सैनिकांना उपचार योजना पूर्ण करावी लागेल, अन्यथा त्यांना सेवेतून अनैच्छिक वेगळे केले जाण्याचा (involuntary separation) धोका राहील.

टीका आणि वाद

नागरिक हक्क संघटना, माजी सैनिक आणि धार्मिक संस्थांनी या धोरणाला भेदभावपूर्ण तसेच धार्मिक स्वातंत्र्यावर मोठा प्रहार म्हटले आहे. कायदेशीर तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अमेरिकन संविधानाच्या पहिल्या दुरुस्ती (First Amendment) अंतर्गत सरकारला सिद्ध करावे लागेल की दाढी ठेवल्याने सेनेच्या सुरक्षेला गंभीर नुकसान होते, जे अद्याप कोणत्याही न्यायालयात सिद्ध झालेले नाही.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.