जग हादरले… जापानमध्ये 16 ठिकाणी भूकंप, अमेरिकेसह या देशात खळबळ, रशियातील महाभयंकर भूकंपाने मोठं संकट
Russia Earthquake : मोठे संकट आले असून समुद्रात भूकंप झाला. समुद्रातील या भूकंपामुळे थेट त्सुनामीचा इशारा हा देण्यात आला. पुढील काही तास अत्यंत महत्वाची असणार आहेत.

जगातील तीन देश संकटात सापडली आहेत. समुद्रात मोठा भूकंप झाल्याने त्सुनामीचे संकट आहे. आज रशियाला मोठा भूकंप झाला आहे. रशियाच्या कॅमचटका द्वीपकल्पात हा भूकंप झाला. भूकंपाची तीव्रता तब्बल रिश्टर स्केलवर 8.8 होती. या भूकंपाचे धक्के इतके जास्त तीव्र होती की, इमारतींचे काही भाग पडले असून सर्वकाही हादरले. रशियामधून येणारे अनेक फोटो आणि व्हिडिओ सांगतात की, हा भूकंप किती जास्त मोठा होता.
भूकंप आल्यानंतर लगेचच थेट त्सुनामीचा इशारा देण्यात आला. जापान, अमेरिका, न्यूझीलंड आणि इंडोनेशियामध्येही या भूकंपाचा परिणाम दिसून आला. याठिकाणी त्सुनामीचा अलर्ट जारी करण्यात आला. काही ठिकाणी त्सुनामीचा परिणाम दिसू लागला आहे. जापानच्या हवामान संस्थेने बुधवारी सांगितले की, रशियाच्या कॅमचटका द्वीपकल्पाजवळ 8.०8 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप झाला. यामुळे जापानसाठी त्सुनामीचा इशारा देण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, भूकंप सकाळी 8:25 वाजता झाला आणि त्याची सुरुवातीची तीव्रता 8.0 इतकी नोंदवली गेली. एजन्सीने ज3पानच्या पॅसिफिक किनाऱ्यावर 1 मीटर पर्यंत त्सुनामीचा इशारा देण्यात आला. नंतर तो सुधारित करून 8.8 करण्यात आला. अनेक ठिकाणी त्सुनामीचा इशारा असल्याने मोठे संकट म्हणावे लागणार आहे.
❗️FIRST pic of a kindergarten in Russia after walls COLLAPSED from earthquake
There were no children inside, everyone was able to evacuate in time https://t.co/mEmIhVlr3c pic.twitter.com/SS7XRq1lFM
— RT (@RT_com) July 30, 2025
रशियाच्या किनाऱ्यावर तसेच अमेरिका जापान आणि कॅलिफोर्नियावर त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रात तीन फूट उंच लाटा उसळू शकतात असे सांगितले जात आहे. नागरिकांना अगोदरच सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला असून प्रशासनाने महत्वाची बैठक बोलवली असून प्रत्येक परिस्थितीवर तेथील सरकारचे बारीक लक्ष आहे. पुढील काही तास अत्यंत महत्वाचे असल्याचेही सांगितले जात आहे. जापानमध्ये 16 ठिकाणी भूकंप झालाय.
रशियातील भूकंपानंतर आणि कॅलिफोर्निया आणि हवाईच्या किनारी भागात त्सुनामीचा इशारा दिल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील सतर्क राहण्यास सांगितले आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्टही शेअर केली. त्सुनामीच्या इशाऱ्यानंतर अनेक ठिकाणी वाहतूककोंडी झाल्याचेही बघायला मिळाले. प्रशानाकडून अगोदरच तयारी करण्यात आलीये. आता या भूकंपादरम्यानचे काही धक्कादायक व्हिडीओ पुढे येताना दिसत आहेत.
