अवघ्या 30 वर्षात ‘या’ देशाचे अस्तित्व संपणार, नकाशावरून कायमचा होणार गायब, नेमकं काय घडणार?
Tuvalu: प्रशांत महासागरात तुवालू हा देश वसलेला आहे. हा जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लहान देश आहे. या देशात फक्त 10,643 लोक राहतात. हवामान बदलामुळे पुढील 20-30 वर्षांत हा देश पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. यामागील नेमकं कारण काय आहे ते जाणून घेऊयात.

प्रशांत महासागर हा जगातील सर्वात मोठा महासागर आहे. या महासागरात तुवालू हा देश वसलेला आहे. हा जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लहान देश आहे. या देशात फक्त 10,643 लोक राहतात. हा देश निसर्ग सौदर्यांन संपन्न आहे. मात्र या देशावर नवं संकट ओढावलेलं आहे. हवामान बदलामुळे पुढील 20-30 वर्षांत हा देश पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. यामागील नेमकं कारण काय आहे ते जाणून घेऊयात.
देश पाण्याखाली जाण्याची शक्यता
या देशाची लोकसंख्या ही भारतातील एखाद्या खेडेगावाएवढी आहे. या देशातील फुनाफुटी बेटावरील विमानतळाची धावपट्टी येथील मुलांसाठी खेळाचे मैदान म्हणून काम करते. या विमानतळावर मुले फुटबॉल खेळताना दिततात. हळूहळू पर्यटक या देशाकडे आकर्षित होत आहेत, मात्र आता हा देश आणखी काहीच वर्षे अस्तित्वा राहण्याची शक्यता आहे. कारण कालांतराने हा देश पाण्याखाली जाऊन, जगाच्या नकाशावरून कायमचा गायब होण्याची शक्यता आहे.
समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे धोका
तुवालू हा नऊ बेटांचा मिळून बनलेले देश आहे. याचे एकूण क्षेत्रफळ फक्त 25.14 चौरस किलोमीटर आहे. या देश समुद्रसपाटीपासून फक्त 4.6 मीटर उंचीवर वसलेला आहे, त्यामुळे हा देश पाण्याखाली जाण्याचा धोका आहे. फूनाफुटी टाइड गेजनुसार, येथील समुद्राची पातळी दरवर्षी 3.9 मिमीने वाढत आहे. हा आकडा जागतिक सरासरीपेक्षा दुप्पट आहे.
आयपीसीसीने एक अहवाल जारी केला होता. यानुसार, गेल्या शतकात जागतिक समुद्राची पातळी 0.2 मीटरने वाढली आहे. मात्र याचा फटका तुवालुसारख्या देशांना सर्वात जास्त बसत आहे. पुढील 100 वर्षांत ही बेटे मानवास राहण्यायोग्य राहणार नाहीत. सरकारने असे म्हटले की, दोन बेटे आधीच बुडण्याच्या मार्गावर आहेत. किनारपट्टीची सतत धूप होत आहे. तसेच 2015 साली आलेल्या पाम चक्रीवादळामुळे 45% लोकसंख्या विस्थापित झाली होती, तसेच 90% पिके नष्ट झाली होती.
स्थलांतर खूप कमी
समुद्राच्या लाटांमुळे विमानतळावर नेहमी पाणी आणि रस्ते उद्ध्वस्त होतात. या देशातील लोक पॉलिनेशियन वंशाचे आहेत. येथील महिलांचे आयुर्मान 70.2 वर्षे आणि पुरुषांचे 65.6 वर्षे आहे. येथील लोकसंख्या वाढीचा दर 0.86 % आहे, मात्र स्थलांतर नकारात्मक आहे. येथील 1000 लोकांमध्ये फक्त 6.6 लोकच बाहेर जातात. या देशाची अर्थव्यवस्था मासेमारी, परदेशी मदत, tv डोमेन विक्रीवर आधारित आहे. 2019 मध्ये या देशाला फक्त 3600 पर्यटकांनी भेट दिली होती. त्यामुळे हा देश सर्वात कमी पर्यटक असणारा देश ठरला होता.
