America on BLA : स्वातंत्र्यासाठी पाकिस्तान विरोधात लढणाऱ्या बलूचिस्तान लिबरेशन आर्मीबद्दल अमेरिकेचा मोठा निर्णय
America on BLA : पाकिस्तानने बलूचिस्तानची गळचेपी चालवली आहे. अनेक वर्षांपासून पाकिस्तानी सैन्य तिथले नागरिक, स्त्रिया यांच्यावर अत्यार, अन्याय करत आहे. पाकिस्तानच्या या दडपशाही विरुद्ध बलूच जनतेने नेहमीच आवाज उठवला. आता अमेरिकेने बलूचिस्तान लिबरेशन आर्मीबद्दल एक मोठा निर्णय घेतला आहे.

आपल्या अधिकारांसाठी, हक्कांसाठी पाकिस्तान विरोधात लढणाऱ्या बलूचिस्तान लिबरेशन आर्मी बद्दल अमेरिकेने अखेर मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानच्या निर्मितीपासून बलूचिस्तानचा हा लढा सुरु आहे. पाकिस्तानच्या दक्षिण प्रांतात सक्रीय असलेल्या बलूचिस्तान लिबरेशन आर्मीबद्दल अमेरिकेने हा निर्णय घेतलाय. अमेरिकेने BLA म्हणजे बलूचिस्तान लिबरेशन आर्मीला दहशतवादी संघटना घोषित केलं आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाकडून ही माहिती देण्यात आलीय. BLA माजीद ब्रिगेड या नावाने सुद्धा ओळखली जाते. मागच्या अनेक दशकांपासून BLA चा बलूचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढा सुरु आहे. अलीकडे बलूच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानी सैन्याला चांगलचं हैराण करुन सोडलय. बलूचिस्तानात सतत पाकिस्तानी सैन्यावर हल्ले सुरु आहेत.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने या संदर्भात लेटर जारी केलं आहे. त्यात म्हटलयं की, अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने बलूचिस्तान लिबरेशन आर्मी BLA आणि त्यांची सहाय्यक मजीद ब्रिगेडला परदेशी दहशतवादी संघटना FTO घोषित केलं आहे.
जाफर एक्सप्रेस ट्रेन हायजॅक
BLA चा अनेक दहशतवादी घटनांशी संबंध आढळून आला आहे असं अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने जारी केलेल्या लेटरमध्ये म्हटलय. 2019 पासून या संघटनेने अनेक दहशतवादी हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. 2024 मध्ये बीएलएने दावा केलेला की, त्यांची कराची विमानतळ आणि ग्वादर पोर्ट प्राधिकरण परिसरात आत्मघातकी हल्ले केले होते. त्यानंतर 2025 साली मार्च महिन्यात क्वेटावरुन पेशावला जाणाऱ्या जाफर एक्सप्रेस ट्रेन हायजॅक केली होती. यात 31 नागरिक आणि पाकिस्तानी सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झालेला. ट्रेनमध्ये 300 पेक्षा जास्त प्रवासी होते. त्यांना बंधक बनवण्यात आलेलं.
अमेरिकेने पत्रात काय म्हटलय?
BLA चा दहशतवादी संघटनांमध्ये समावेश करण्याचा ट्रम्प प्रशासनाचा निर्णय म्हणजे अमेरिकेची दहशतवादाविरोधात लढण्याची कटिबद्धता दिसून येते असं परराष्ट्र विभागाने जारी केलेल्या पत्रात म्हटलं आहे. धोका कमी करणं हा दहशतवादी संघटनांची यादी बनवण्यामागचा उद्देश आहे असं पत्रात म्हटलय. दहशतवादासाठी बाहेरुन मिळणारं पाठबळ रोखणं हा सुद्धा त्यामागे हेतू आहे. बलूचिस्तानात अनेक नैसर्गिक साधन, संपत्तीचे स्त्रोत आहेत. पाकिस्तान आपल्या सैन्य ताकदीच्या बळावर बलूच नागरिकांचा आवाज दडपून या साधन संपत्तीवर अधिकार गाजवतो. हेच या संघर्षाच मूळ कारण आहे.
