AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर इराण-इस्रायल युद्धात अमेरिकेची एन्ट्री, इराणच्या 3 अणू प्रकल्पांवर बॉम्ब हल्ले

US Attack On Iran: इराण-इस्त्रायल युद्धात अमेरिकाही उतरली आहे. अमेरिकेने इराणच्या तीन प्रमुख अणू उर्जा केंद्रांवर हल्ला केला आहे. फोर्डो, नतान्झ आणि इस्फहानवर या केंद्रांवर यशस्वी हवाई हल्ला केला आहे.

अखेर इराण-इस्रायल युद्धात अमेरिकेची एन्ट्री, इराणच्या 3 अणू प्रकल्पांवर बॉम्ब हल्ले
फोर्डो अणू प्रकल्प
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jun 22, 2025 | 9:45 AM
Share

Iran Israel conflict: इस्रायल आणि इराणमधील युद्धात आता अमेरिकाही उतरली आहे. अमेरिकेच्या हवाई दलाने फोर्डो, नतान्झ आणि एस्फहान अणू उर्जा केंद्रांवर हल्ला केला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही माहिती दिली. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेने इराणच्या तीन प्रमुख अणू उर्जा केंद्रांवर हल्ला केला आहे. फोर्डो, नतान्झ आणि इस्फहानवर या केंद्रांवर यशस्वी हवाई हल्ला केला आहे. अमेरिकन सैन्याने पूर्ण तयारीने या ठिकाणांवर बॉम्ब टाकले. ज्यामध्ये फोर्डो हे मुख्य लक्ष्य होते.

काय म्हणाले ट्रम्प?

डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर लिहिले की, आम्ही इराणमधील फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान येथील तीन अणुस्थळांवर यशस्वी हल्ले केले आहेत. फोर्डोवर बॉम्बचा संपूर्ण पेलोड टाकण्यात आला. हल्ले करुन आमची सर्व लढाऊ विमाने आता इराणी हवाई हद्दीतून सुरक्षितपणे बाहेर पडली आहेत. जगातील इतर कोणत्याही सैन्याकडे ही क्षमता नव्हती. अमेरिकेच्या लष्करी सामर्थ्याचे हे यश आहे. आता शांततेची वेळ आली आहे.

बी-२ बॉम्बर्सचा वापर

अमेरिकन हल्ल्याच्या काही तास आधी अमेरिकेने त्यांचे स्टिल्थ बी-२ बॉम्बर्स इराणकडे पाठवले होते. या निर्णयानंतर अमेरिका या युद्धात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर काही तासांतच अमेरिकेने इराणचे ३ अणू प्रकल्प उद्ध्वस्त केल्याचा दावा केला आहे. बी-२ बॉम्बर्स हे एकमेव विमान आहे जे बंकर बस्टर बॉम्ब टाकण्यास सक्षम आहे. अमेरिकेने या बी-२ बॉम्बर्सने फोर्डो नष्ट केले आहे.

इराणविरुद्ध इस्रायलच्या लष्करी मोहिमेचा निर्णय घेण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन आठवडे घेतले होते. दोन आठवड्यात निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. ट्रम्प यांच्या या विधानाच्या आदल्या दिवशी अमेरिकेने त्यांचे अत्याधुनिक लढाऊ विमान बी२ बॉम्बर्स प्रशांत महासागरात असलेल्या त्यांच्या ग्वाम हवाई तळाकडे पाठवले होते. दरम्यान, आता स्थानिक वेळेनुसार, डोनाल्ड ट्रम्प रात्री १० वाजता राष्ट्राला संबोधित करतील.

Follow Us
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान धक्कादायक घटना, व्हिडीओच आला समोर
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर संताप
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्ते  मनोज जरांगेंवर भडकले; सडकून टीका!
मोठी बातमी! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची...
मोठी खळबळ! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची... नेमकी भानगड काय?
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर'
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर' महारक्तदान शिबीराचे आयोजन
पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! पहा Video
Manoj Jarange Patil | पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! फुलांचा वर्षाव अन्... पहा व्हिडीओ
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील नेत्याचा एकाच विमानाने प्रवास
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील बड्या नेत्याचा एकाच विमानाने प्रवास, फोटो आले समोर
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही घेऊ शकतो- जरांगे
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही... भर मंचावरून मनोज जरांगे कडाडले; आता...
Big Breaking| बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर
Big Breaking | बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर; नेमकं काय घडलं? पहा व्हिडीओ
मी नितीन गडकरी यांना फोन केला अन् म्हणालो... तिसऱ्या मुंबईवरून राज ठाक
मी नितीन गडकरी यांना फोन केला अन् म्हणालो... तिसऱ्या मुंबईवरून राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल