अमेरिकेत मृत्यूचं तांडव, कोरोनाने अडीच लाख नागरिकांचा मृत्यू

अमेरिकेत कोरोनाने प्रचंड धुमाकूळ घातला आहे. कोरोनामुळे दररोज एक हजार लोकांचा मृत्यू होत आहे (US Corona death increase).

अमेरिकेत मृत्यूचं तांडव, कोरोनाने अडीच लाख नागरिकांचा मृत्यू

वॉश्गिंटन : अमेरिकेत कोरोनाने प्रचंड धुमाकूळ घातला आहे. कोरोनामुळे दररोज एक हजार लोकांचा मृत्यू होत आहे. विशेष म्हणजे गेल्या महिन्यापेक्षा या महिन्यात मृत्यूचं प्रमाण 50 टक्क्यांनी वाढलं आहे. गेल्या आठवड्यात तर दोन दिवस असे होते की, त्या दिवशी 1400 पेक्षाही जास्त रुग्णांचा मृत्यू झाला होता (US Corona death increase).

कोरोना संकटाचा सर्वात जास्त फटका अमेरिकेला बसला आहे. कोरोनाने अमेरिकेत सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. अमेरिकेत आतापर्यंत जवळपास अडीच लाख रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेपाठोपाठ भारतात सर्वाधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतात आतापर्यंत 1 लाख 28 हजार पेक्षाही जास्त रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे (US Corona death increase).

‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या एका रिपोर्टमध्ये अमेरिकेत परिस्थिती आणखी बिघडू शकते, असा तज्ज्ञांचा दावा असल्याचं म्हटलं आहे. जॉन्स हॉपकन्स सेंटर फॉर हेल्थ सिक्यॉरिटीचे तज्ज्ञ जेनिफिर नुजो यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. आगामी काळ अमेरिकेसाठी प्रचंड भयावह असणार आहे, असा दावा त्यांनी केला आहे. दरम्यान, कोरोना संकटाचा विचार करता अमेरिकेच्या काही राज्यांमध्ये आरोग्य यंत्रणा आणखी सक्षम उभी राहावी यासाठी प्रशासनाने तयारी सुरु केली आहे.

अमेरिकेत आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार 1 कोटी 9 लाख 77 हजार 635 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 59 लाख 26 हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली. मात्र, 2 लाख 48 हजार 833 म्हणजेच जवळपास अडीच लाख नागरिकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.

अमेरिकेपाठोपाठ भारतालाही फटका

दुसरीकडे अमेरिकेपाठोपाठ कोरोना संकटाचा सर्वाधिक फटका भारताला बसला आहे. भारतात 88 लाख 15 हजार 740 नागरिकांना कोरोनाची लागण झाली. यापैकी 82 लाख 3 हजार 903 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. मात्र, 1 लाख 29 हजार 693 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याची नोंद आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण

भारतात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत 17 लाख 44 हजार 698 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 16 लाख 12 हजार 314 रुग्णांनी कोरोनावर मात केली. तर 45 हजार 914 रुग्णांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रपाठोपाठ कर्नाटक राज्यात सर्वाधिक 8 लाख 60 हजार 82 रुग्ण आढळले आहेत. यापैकी 8 लाख 20 हजार 590 रुग्ण बरे झाले आहेत. तर 11 हजार 508 रुग्णांचा दु्र्देवी मृत्यू झाला आहे.

संबंधित बातम्या :

Good News! भारतात डिसेंबरपर्यंत सिरम इन्स्टिट्यूट कोरोना लसीचे 10 कोटी डोस पुरवणार

कोरोना लसीची चाचणी घेतलेल्या स्वयंसेवकाचा अनुभव, पहिल्या इंजेक्शनवेळी वेदना आणि तापाचा करावा लागला सामना!

Corona Vaccine | सीरम इन्स्टिट्यूटची मोठी घोषणा, कोविशील्ड लसीच्या चाचणी अंतिम टप्प्यात

Published On - 4:21 pm, Sun, 15 November 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI