US च्या डॉक्टरने सांगितला मृत्यूनंतरच्या जगाचा अनोखा अनुभव, डोळे उघडताच सोडली कोट्यवधी पगाराची नोकरी, काय झाले नेमके ?
जगात आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू केव्हा ना केव्हा होणारच असतो. मृत्यूनंतर आपली कहाणी संपते. परंतू त्याचा प्रवास सुरु असतो. भारतीय मूळ असलेल्या अमेरिकेतील डॉक्टर राजीव पारती यांनी दावा केला आहे की त्यांना नरक आणि देवाला पाहिले आहे.

मृत्यू म्हणजे शरीराचा शेवट असतो. परंतू आत्मा हा अमर असो असे अनेक धर्मात मानले जाते. मृत्यूच्या दरवाजा हा दुसऱ्या जगात जाण्याचा रस्ता असतो.या अनोख्या अनुभवाने डॉ. राजीव पारती यांचे संपूर्ण जीवन बदलले.त्यानंतर डोळे उघडताच त्यांनी सर्व भौतिक वस्तूंचा त्याग केला आहे. ज्यास मिळवणे हे सर्वांच्या जीवनाचे ध्यैय असते. त्याचे झाले काय २००८ मध्ये प्रोस्टेट कॅन्सरच्या उपचारादरम्यान डॉ. राजीव यांचे हृदय काही वेळासाठी अचानक थांबले होते. त्यावेळी ते ५१ वर्षांचे होते.
नरकाच्या तोंडावर आहे
डॉ.राजीव पारती यांनी सांगितले की मला अचानक वेदनेने व्हिव्हळ्याचे आणि भेसूर रडण्याचे, किंचाळण्याचे आवाज ऐकायला आले. जणू मी कोणत्या जळत्या रस्त्यावर उभा आहे. मी धगधगणाऱ्या दरीच्या किनाऱ्याकडे खेचलो गेलो. माझ्या नाकपुड्यात धुराने भरल्या होत्या. त्याच बरोबर जळालेल्या मांसाचा दुर्गंधी नाकातून येत होती. तेव्हा मला कळले की मी नरकाच्या तोंडावर आहे. डॉ.राजीव यांनी आपल्या युट्युब चॅनलवर हे आपले अनुभव सांगितले. त्यांनी हे सांगितले की एका आवाजाने माझ्या भौतिकवादी जीवनाची टीका केली. त्यानंतर त्यांनी बेकर्सफील्ड हार्ट हॉस्पिटलच्या मुख्य एनेस्थेसियोलॉजिस्ट पदाचा राजीनामा दिला, लक्झरी कार, घर सोडले आणि आपल्या जीवनात मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला.
डाईंग टू वेक अप
डॉक्टर राजीव पारती यांनी ‘डाईंग टू वेक अप: ए डॉक्टर्स वॉयेज इनटू द आफ्टरलाइफ एंड द विजडम ही ब्रॉट बैक’ नावाचे पुस्तक लिहिले. त्यात डॉक्टरानी आपल्या मृत्यूनंतरच्या जीवनाचे अनुभव लिहीले आहेत. परंतू त्यांनी जेव्हा या संदर्भात त्यांचे मित्र आणि कलीग यांना हे सांगितले तर कोणी त्यांच्यावर विश्वास केला नाही. ते म्हणाले की मी सर्वांना चांगल्या प्रकारे हे समजवू शकलो असतो की मला माझा उद्देश्य , मला माझ्या आत्म्याच्या उद्देश्याचे पालन करावे लागेल.त्यांना माझ्या निर्णयाचा धक्का बसला, परंतू मला पर्वा नव्हती. मी त्या शक्ती आणि तो स्रोत मला जाणवला. निर्देश माझ्या मनात स्पष्ट होते. त्यानंतर मी माझ्या पेशाचा राजीनामा दिला. माझ्या लक्झरी कार आणि घराला विकून टाकले.
निअर-डेथ एक्सपिरियन्समध्ये सच्चाई?
निअर-डेथ एक्सपिरियन्स (NDE) असे अनुभव असतात जे मृत्यूच्या जवळ गेल्यानंतर होतात. ,उदा. हृदय थांबणे, यावेळी लोकांना ते त्यांच्या शरीरापासून वेगळे झाल्याचा अनुभव येतो. शांतता जाणवते… वा प्रकाश दिसतो आणि मेले लोक दिसतात. परंतू वैज्ञानिकदृष्ट्या हे अशा प्रकारच्या मृत्यूनंतरच्या जीवनाचे कोणतेही पुरावे मिळत नाहीत.
