जे स्वत:ला वाचवू शकले नाहीत ते आपलं काय संरक्षण करणार, ओबामांचे ट्रम्प यांच्यावर टीकास्त्र

जी व्यक्ती कोरोनापासून स्वत:चा बचाव करु शकली नाही, ती आपल्या सर्वांना वाचवणार नाही, अशा शब्दांत ओबामांनी ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला. (Barack Obama attacked Trump saying he who cannot save himself he will not save us all)

जे स्वत:ला वाचवू शकले नाहीत ते आपलं काय संरक्षण करणार, ओबामांचे ट्रम्प यांच्यावर टीकास्त्र

नवी दिल्ली : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. जी व्यक्ती कोरोनापासून स्वत:चा बचाव करु शकली नाही, ती आपल्या सर्वांना वाचवणार नाही, अशा शब्दांत ओबामांनी ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला. बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांचा प्रचार करत आहेत. (Barack Obama attacked Trump saying he who cannot save himself he will not save us all)

फिलाडेल्फियामधील लिंकन फायनान्शियल फिल्ड येथे ओबामा यांनी सभेला संबोधित केले. ओबामा जो बायडेन यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. ओबांमांनी कोरोनावरून ट्रम्पं यांच्यावर निशाणा साधला. कोरोना महामारी देशात 8 महिन्यांपासून आहे. देशात कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढत आहे. ट्रम्प आपल्याला वाचवू शकत नाहीत. या महामारीमध्ये कोरोना विषाणूपासून स्वत:चा बचाव करण्यातही ते अपयशी ठरले आहेत.

ट्रम्प यांनी कोरोना विषाणूला गांभीर्यानं घेतलं नसल्यामुळे त्याच्या होणाऱ्या परिणामांसह आपल्याला जगावे लागेल. हा काही रिअ‌ॅलिटी शो नाही, हे वास्तव आहे, असा टोला ओबामांनी लगावला.

गेल्या चार वर्षांपासून सोडली नव्हती, निराश होतो मात्र आशा सोडली नव्हती, असे ओबामांनी मतदारांना सांगितले. मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडून मतदान करा. आपण घेतलेला निर्णय आणि आगामी 13 दिवस पुढील अनेक दशकांवर परिणाम करणारे आहेत, त्यामुळे बाहेर पडून मतदान करण्याचं आवाहन बराक ओबामांनी केलं आहे.

संबंधित बातम्या: 

कमला हॅरिस यांचा पावसातील डान्सचा व्हिडीओ वायरल, ट्विटरवरही प्रतिक्रियांचा पाऊस

‘चांगल्या कामासाठी पैसे देण्याआधी नोटा मोजताना ट्रम्प’, डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोवर लोकांच्या मजेशीर कमेंट

(Barack Obama attacked Trump saying he who cannot save himself he will not save us all)

Published On - 12:30 pm, Thu, 22 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI