AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘इराणकडे फक्त दोन आठवडे…’, डोनाल्ड ट्रम्प यांचा अल्टिमेटम, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी नेमके काय म्हटले?

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी शुक्रवारी जिनेव्हा येथे त्यांच्या युरोपीय समकक्षांसोबत चर्चा केली होती. त्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी इराणने युरोपसोबत नाही तर अमेरिकेसोबत चर्चा करावी, असे म्हटले आहे.

'इराणकडे फक्त दोन आठवडे...', डोनाल्ड ट्रम्प यांचा अल्टिमेटम, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी नेमके काय म्हटले?
donald trump
| Updated on: Jun 21, 2025 | 8:05 AM
Share

इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरु आहे. या संघर्षाच्या दुसऱ्या आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्वाचे विधान केले आहे. अमेरिकेच्या लष्करी कारवाईपासून बचाव करण्यासाठी इराणकडे जास्त वेळ नाही. मी एक निश्चित वेळ देत आहे. ती वेळ जास्तीत जास्त दोन आठवडे असेल, असे ट्रम्प यांनी सांगत इराणला थेट अल्टिमेटम दिले आहे.

युरोपसोबत नव्हे आमच्याशी चर्चा करा

डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धबंदीबाबत विचारण्यात आले. त्यावेळी ते म्हणाले, परिस्थिती कशी असते यावर सर्व अवलंबून असेल. इराण आणि इस्रायलमधील युद्धात युरोप फारशी मदत करू शकणार नाही. इराणने युरोपशी बोलायचे नाही. जे बोलयचे आहे ते आपल्याशी बोलायचे आहे. युरोप यामध्ये काहीही शकणार नाही. दरम्यान, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी शुक्रवारी जिनेव्हा येथे त्यांच्या युरोपीय समकक्षांसोबत चर्चा केली होती. त्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी हे विधान केले. युरोपीय नेत्यांनी इराणला वॉशिंग्टनशी थेट संवाद साधण्याचा आग्रह केला. यामुळे अब्बास अराघची यांची युरोपिय देशांसोबतची चर्चा कोणताही मार्ग न निघता संपली.

इराण विरोधात अमेरिकन सैन्य तैनात केले जाऊ शकते का? असे विचारले असता डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ठीक आहे. मी भूदलाबद्दल बोलणार नाही. कारण भूदल ही शेवटची गोष्ट आहे. जी तुम्हाला करायची नाही.

इस्रायल आणि इराणमधील युद्ध १३ जून रोजी सुरू झाले. जेव्हा इस्रायली हवाई दलाने इराणी भूभागावर हल्ले सुरू केले. त्यात इराणचे आर्मी प्रमुख आणि कमांडरचा मृत्यू झाला. तसेच अणू शास्त्रज्ञांचाही मृत्यू झाला. त्यानंतर इराणनेही इस्रायलवर शेकडो क्षेपणास्त्रे डागून प्रत्युत्तर दिले. यामध्ये बॅलिस्टिक आणि हायपरसॉनिक शस्त्रांचा समावेश आहे. इस्रायलने आपल्या हल्ल्याचे समर्थन करताना म्हटले की, इराणवर केलेली ही कारवाई अण्वस्त्रे मिळवण्यापासून रोखण्यासाठी आहे. दरम्यान, अमेरिकास्थित मानवाधिकार संस्थेच्या मते, इस्रायली हल्ल्यांमध्ये इराणमध्ये ६३९ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी इराणी हल्ल्यात इस्रायलमधील २४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?.
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ.
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?.