
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच अत्यंत मोठा इशारा दिला. गेल्या काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प जगातील अनेक देशांवर भरमसाठ टॅरिफ लावत आहेत. हेच नाही तर इराणसोबतचेही संबंधही तणावात आहेत. ट्रम्प वारंवार ग्रीनलँड ताब्यात घेण्याची धमकी देत आहेत. तेथील रशियन धोका संपवण्याबद्दल ते भाष्य करत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले की, डेनमार्क काही वर्षांपासून रशियाच्या धोक्यापासून ग्रीनलँडला दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. आता वेळ आली आहे की, पूर्णपणे हा धोका दूर ठेवण्याची. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे.
20 वर्षांपासून नाटो डेनमार्कला सांगत आहे की, रशियन धोक्याचा सामना करण्याची गरज आहे. डेनमार्कने आतापर्यंत यावर काहीही केलेले नाही, हीच वस्तूस्थिती आहे. पण आता खरोखरच ती वेळ आली आहे. निश्चितपणे कारवाई करणे आवश्यक आहे. या मुद्द्यावर आतापर्यंत युरोपियन यूनियन आणि डेनमार्कने काही भाष्य केले नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या विधानावर त्यांनी माैन बाळगले. डोनाल्ड ट्रम्प हे बऱ्याचदा बोलले की, ग्रीनलॅंडला त्यांचा अधिकार हवा आहे.
डेनमार्क आणिग्रीनलँडच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे की, हा उपखंड विक्रीसाठी नाही आणि तो कधीही अमेरिकेचा भाग होणार नाही. ट्रम्प यांनी, जर ग्रीनलँड त्यांच्या ताब्यात दिले नाही, तर युरोपीय देशांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, अशी धमकी दिली होती. त्यामध्येच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट मोठी धमकी दिल्याने खळबळ उडाली. ही योग्य वेळ कारवाई करण्याची असल्याचे त्यांनी थेट म्हटले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी एका देशाच्या अध्यक्षांना ताब्यात घेऊन अमेरिकेत आणल्याची घटना ताजी असतानाच आता ही धमकी देण्यात आली. यासोबतच अमेरिका आणि इराण यांच्यातीलही संबंध तणावात आहेत. रशिया आणि युक्रेन युद्धात मध्यस्थी करताना काही दिवसांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प हे दिसले. मात्र, कोणताही मार्ग निघताना दिसत नाहीये, उलट पुतिन यांच्यावर हल्ला करण्याच नियोजन डोनाल्ड ट्रम्प यांनी केले.