डोनाल्ड ट्रम्प यांची घाबरगुंडी, ‘या’ देशाने मुसक्या आवळताच आली जाग, दुटप्पी भूमिका जगासमोर
डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लावल्यामुळे ते मागील काही दिवसांपासून टिकेची धनी बनले आहेत. भारतावर त्यांनी टॅरिफ लादला आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफच्या निर्णयामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. अमेरिका टॅरिफसाठी भारतावर दबाव टाकत आहे.

भारतावर टॅरिफ कर 25 टक्के अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लावला आहे. पुढील येत्या काळात तो 50 टक्क्यांपर्यंत वाढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलंय. हा भारतासाठी मोठा धक्का आहे आणि याचा परिणाम थेट भारतीय अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. हेच नाही तर ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत भारतासोबत व्यापारी चर्चा होणार नाहीये. अमेरिका भारतावर दबाव टाकत आहे, त्यांची अटी पूर्ण करण्यासाठी. मात्र, चीनबाबत नरम भूमिका घेताना अमेरिका दिसतंय.
डोनाल्ड ट्रम्पने चीनवर मेहरबानी दाखवत नवीन टॅरिफ दर लागू करण्यासाठी चीनला तब्बल 90 दिवसांची वेळ दिलीये. हेच नाही तर चर्चा करून काहीतरी मार्ग शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. टॅरिफच्या प्रश्नावरून ट्रम्प यांची दुटप्पी भूमिका स्पष्ट दिसत आहे. एकीकडे भारताला अजिबात वेळ दिला जात नाही टॅरिफ लादला जातोय तर दुसरीकडे टॅरिफसाठी चीनला वेळ दिला जात आहे. अमेरिकेसाठी चीन हा एक प्रतिस्पर्धी देश आहे.
हेच नाही तर व्यापारावरून चीन आणि अमेरिकेत मागील काही वर्षांपासून संघर्ष हा बघायला मिळतोय. एक प्रकारे त्यांच्यामध्ये व्यापार युद्ध सुरू आहे. मात्र, अमेरिका टॅरिफच्या प्रश्नावरून चीनसाठी एक पाऊस मागे टाकत आहे. याचे मुख्य कारण दुर्मिळ पृथ्वी खनिजे असल्याचे मानले जाते. ज्यासाठी अमेरिका मोठ्या प्रमाणात चीनवर अवलंबून आहे आणि त्यामुळे त्यांनी चीनला टॅरिफसाठी वेळ दिलाय. टॅरिफविरोधात चीनने अमेरिकेच्या विरोधात भूमिका घेतली.
बीजिंगने या क्षेत्रातील आपल्या वर्चस्वाचा फायदा घेत चीनच्या दुर्मिळ पृथ्वी खनिजांवर आणि इतर 5 प्रमुख घटकांवर शुल्क लादले आणि निर्यातीवर बंदी घातली. मे महिन्यात जिनिव्हा येथे झालेल्या चर्चेनंतर अमेरिका आणि चीनने त्यांच्या वाढत्या शुल्कांवर 90 दिवसांचा बंदी जाहीर केली. चीन आणि अमेरिकेत व्यापार युद्ध सतत सुरू आहे. मात्र, डोनाल्ड ट्रम्प हे चीनबाबत शांत भूमिका घेताना स्पष्ट दिसत आहेत. आता भारत डोनाल्ड ट्रम्पची टॅरिफ निती कशाप्रकारे हाताळते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
