AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! ट्रम्प यांचा भारताला पुन्हा दणका, 25 टक्के अतिरिक्त कर लादला

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला पुन्हा दणका दिला आहे. अमेरिकेने भारतावर 25 टक्के अतिरिक्त कर लादण्याची घोषणा केली आहे.

मोठी बातमी! ट्रम्प यांचा भारताला पुन्हा दणका, 25 टक्के अतिरिक्त कर लादला
DONALD-TRUMP-3
| Updated on: Aug 06, 2025 | 7:57 PM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला पुन्हा दणका दिला आहे. अमेरिकेने भारतावर 25 टक्के अतिरिक्त कर लादण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेने हा निर्णय घेताना म्हटलं आहे की, भारताने रशियन तेलाची सतत खरेदी केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी अमेरिकेने भारतावर 25% टॅरिफ लावला होता. त्यामुळे आता अमेरिकेचा एकूण कर 50 % झाला आहे. ही भारतासाठी चिंतेची बाब आहे.

अतिरिक्त कर 21 दिवसांत लागू होणार

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेला अतिरिक्त कर 21 दिवसांच्या आत लागू होणार आहे. म्हणजेच 27 ऑगस्ट 2025 पासून हा कर लागू होणाप आहे. मात्र या तारखेपूर्वी निघून 17 सप्टेंबर 2025 पूर्वी अमेरिकेत पोहोचलेल्या वस्तूंवर हा कर आकारला जाणार नाही. विशेष म्हणजे हा कर इतर सर्व शुल्क आणि करांव्यतिरिक्त असणार आहे, मात्र काही विशेष प्रकरणांमध्ये यात सूट दिली जाण्याची शक्यता आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी 24 तासांपूर्वीच भारतावर कर वाढवण्याची धमकी दिली होती. एका मुलाखतीत ट्रम्प म्हणाले होते की, जर भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवली तर कर आणखी वाढवला जाईल. आता ट्रम्प ते औषध आयातीवरील कर 250 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे. जो आतापर्यंतचा सर्वात मोठा कर असू शकतो.

आधी लावला होता 25 टक्के कर

या आधी अमेरिकेने 29 जुलै रोजी भारतावर 25 टक्के कर लावल्याची घोषणा केली होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि अमेरिकेतील संबंध तितकेसे चांगले नाहीत असंही विधान केलं होतं. अमेरिकेच्या या निर्णयामुळे भारताच्या निर्यातीवर परिणाम होणार आहे. आता आणखी कर वाढल्याने भारताची अर्थव्यवस्था संकटात सापडण्याची शक्यता आहे.

भारत हा रशियन तेलाचा सर्वात मोठा खरेदीदार

भारत हा रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेलाची खरेदी करतो. 2022 मध्ये रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर, अनेक युरोपीय देशांनी रशियासोबतच्या व्यापारावर बहिष्कार टाकला होता. अमेरिका आणि युरोपीय देशांनी रशियन तेलावर बंदी घातली होती, मात्र भारत आणि चीन सारख्या आशियाई देशांनी रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी केले होते. भारत अजूनही रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करत आहे. त्यामुळे अमेरिकेने भारतावर हा कर लादला आहे.

मोठी अपडेट! छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
मोठी अपडेट! छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष
दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष.
दादांवर भाजपचं खरं प्रेम असेल तर...; संजय राऊतांनी केली मोठी मागणी
दादांवर भाजपचं खरं प्रेम असेल तर...; संजय राऊतांनी केली मोठी मागणी.
पहिल्यांदाच असं घडलं... अजितदादांच्या जाण्याने मंत्रालयातील गजबज हरवली
पहिल्यांदाच असं घडलं... अजितदादांच्या जाण्याने मंत्रालयातील गजबज हरवली.
अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी सुरू
अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी सुरू.
दोन्ही राष्ट्रवादींच्या एकीकरणावर जयंत पाटलांची मोठी प्रतिक्रिया
दोन्ही राष्ट्रवादींच्या एकीकरणावर जयंत पाटलांची मोठी प्रतिक्रिया.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील; नरहरी झिरवाळ यांचा विश्वास
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील; नरहरी झिरवाळ यांचा विश्वास.
दादांच्या उत्तराधिकारी सुनेत्रा पवारच?उपमुख्यमंत्रीपदासाठी नाव आघाडीवर
दादांच्या उत्तराधिकारी सुनेत्रा पवारच?उपमुख्यमंत्रीपदासाठी नाव आघाडीवर.
अवकाळी पावसाचा थयथयाट... वारा एवढा सुटला की पपईची गाडीच उलटली
अवकाळी पावसाचा थयथयाट... वारा एवढा सुटला की पपईची गाडीच उलटली.
विलीनीकरण करुन अजित पवार यांची इच्छा पूर्ण करणार?
विलीनीकरण करुन अजित पवार यांची इच्छा पूर्ण करणार?.