Donald Trump On US Court Tariff : ट्रम्प आर-पारच्या मूडमध्ये, सरळ म्हणाले ‘यापुढे सहन करणार नाही’
Donald Trump On US Court Tariff : कोर्टाने टॅरिफ 14 ऑक्टोबरपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे. जेणेकरुन ट्रम्प प्रशासनाला अमेरिकी कोर्टात अपील करता येईल. टॅरिफ पुढेही सुरु राहिलं, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील अनेक देशांवर टॅरिफ लावला आहे. अलीकडेच त्यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लागू केला. आता हा टॅरिफचा वाद अमेरिकी कोर्टापर्यत जाऊन पोहोचला आहे. टॅरिफ लावण्याला अमेरिकी कोर्टाने बेकायदेशीर ठरवलं आहे. कोर्टाने स्पष्टपणे म्हटलय की, ट्रम्प यांनी टॅरिफ लावण्यासाठी ज्या अधिकारांचा वापर केला, त्यांना तो कायदेशीर अधिकार नाहीय. कोर्टाने ट्रम्प यांच्या टॅरिफ निर्णयावर कठोर टीका केली आहे. अमेरिकी कोर्टाने स्पष्टपणे म्हटलय की, ट्रम्प यांच्याकडे प्रत्येक आयातीवर टॅरिफ लावण्याचा अधिकार नाहीय. कोर्टाने टॅरिफ 14 ऑक्टोबरपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे. जेणेकरुन ट्रम्प प्रशासनाला अमेरिकी कोर्टात अपील करता येईल. टॅरिफ पुढेही सुरु राहिलं, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
कोर्टाच्या निर्णयानंतर काही मिनिटात ट्रम्प यांनी कोर्टाच्या निर्णयावर टीकेचे आसूड ओढले. कोर्टाचा निर्णय लागू केल्यास देशासाठी विनाशकारी ठरेल. आपलं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर त्यांनी अपील न्यायालयं पक्षपाती असल्याचा आरोप केला. सुप्रीम कोर्ट आपल्याबाजूने निर्णय देईल, असा त्यांनी दावा केला. हे टॅरिफ संपले, तर ते अमेरिकेसाठी विनाशकारी ठरेल, असं ट्रम्प यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. टॅरिफ अजूनही लागू असल्याचं व्हाइट हाउसचे प्रवक्ते कुश देसाई म्हणाले. “अमेरिकेचा शेवटी विजय होणार आहे, हे टॅरिफ गेले, तर देश बरबाद होईल. त्यामुळे अमेरिका आर्थिक दृष्टया दुर्बल होईल. आपल्याला मजबूत राहणं आवश्यक आहे. दुसऱ्या देशांचे अन्यायकार टॅरिफ आणि व्यापारी तूट अमेरिका यापुढे सहन करणार नाही” असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. ‘कोर्टाचा निर्णय मान्य करणात अमेरिकेच मोठ नुकसान आहे’ असं ट्रम्प यांनी आपल्या ट्रुथ सोशलच्या प्लॅटफॉर्मवर म्हटलं आहे.
अमेरिकेच सुद्धा नुकसान
डोनाल्ड ट्रम्प आपल्या दुसऱ्या कार्यकाळात अमेरिकेच अन्य देशांसोबतच व्यापार संतुलन साधण्यासाठी टॅरिफचा शस्त्रासारखा वापर करत आहेत. अन्य देशांसोबत व्यापार करताना अमेरिकेला मोठी तूट सहन करावी लागतेय. ते अन्यायकारक आयात कर लावतात. त्यामुळे अमेरिकी उत्पादकांचा नुकसान होतं. यावर उपाय म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ अस्त्र उगारलं आहे. यात अन्य देशांसोबत अमेरिकेच सुद्धा नुकसान आहे. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे जगभरातले लोक हैराण आहेत. बाजारांची अवस्थ बिकट आहे.
