
रशिया युकेन युद्ध गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. सुरूवातीला ज्यावेळी हे युद्ध सुरू झाले, त्यावेळी युद्ध जास्त काळ चालणार नाही, असा सर्वांचा अंदाज होता. युक्रेनच्या तुलनेत रशियाकडे मोठी लष्करी ताकद आहे. मात्र, अमेरिकेसह नाटो देश युक्रेनसाठी थेट मैदानात उतरले. अमेरिका युकेनला युद्धासाठी मदत करत असल्याचे जगजाहीर आहे. पुतिन यांनी नुकताच दावा करत म्हटले की, युक्रेनला शांतता मार्गाने हे युद्ध थांबवायचे नाही. अमेरिकेकडून हे युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न केली जात आहेत. एक शांतता प्रस्ताव देखील अमेरिकेने युक्रेन आणि रशियाला दिला. मात्र, या शांतता प्रस्तावाला युक्रेनने केराची टोपली दाखवली. रशियाकडून हा शांतता प्रस्ताव मंजूर असल्याचे सांगण्यात आले. युकेनचे अध्यक्ष अमेरिकेच्या दाैऱ्यावर असून या युद्धाच्या मुद्द्यामध्ये त्यांच्या या अमेरिकेच्या भेटीकडे संपूर्ण जगाच्या नजरा लागल्या आहेत.
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. या काळात दोन्ही देशांचे प्रचंड नुकसान झाले असून अनेक नागरिक मारले गेले. अमेरिका आणि युरोपीय देश या दोन्ही देशांमध्ये शांतता करार घडवून आणण्यासाठी आता प्रयत्न करताना दिसत आहेत. रशिया आणि युक्रेन हे दोन्ही देश आपल्या मागण्यावर ठाम आहेत. त्यामुळे शांतता करार पुढे जाण्याच नाव घेत नाही.
या शांतता करारासंदर्भात रविवारी 28 डिसेंबर रोजी एका मोठ्या घोषणेची अपेक्षा आहे. असे सांगितले जात आहे की, झेलेन्स्की अखेरीस शांतता कराराबाबत एक निर्णय घेऊ शकतात, जो युद्धाचा अंतिम परिणाम निश्चित करेल. पुतिन यांनी अगोदरच झेलेन्स्की यांच्यावर आरोप करत म्हटले की, झेलेन्स्की यांनाच हे युद्ध थांबवायचे नाही. पहिला प्रस्तावही त्यांनी धुडकून टाकला होता.
पुतिन यांनी ट्रम्प यांच्यासमोर शांतता करारासाठीच्या अटी स्पष्टपणे मांडल्या होत्या. ज्यात त्यांनी म्हटले होते की, युद्धात ताब्यात घेतलेल्या युक्रेनियन प्रदेशांवरील नियंत्रण ते सोडणार नाहीत. मात्र, त्याकरिता युक्रेनही दावा करताना दिसत आहे. झेलेन्स्की सातत्याने आत्मसन्मानाची लढाई असल्याचे सांगत आहेत. मात्र, अमेरिकेकडून झेलेन्स्की यांची चांगलीच कानउघडणी करण्यात आली. यामुळे झेलेन्स्की एक पाऊल मागे टाकण्याची शक्यता आहे. आजच अमेरिकेतून झेलेन्स्की युद्धाबाबत मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.