AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: म्यानमार येथील भूंकपाने इमारती पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या…

म्यानमार आणि थायलंडमध्ये शुक्रवारी झालेल्या शक्तिशाली भूकंपानंतर तेथील भयानक परिस्थितीचे व्हिडीओ व्हायलर होत आहेत. मोठ्या इमारती पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळल्या आहेत. या अपघाताचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Video: म्यानमार येथील भूंकपाने इमारती पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या...
After the powerful earthquake in Myanmar and Thailand, big buildings collapsed
Follow us
| Updated on: Mar 28, 2025 | 3:41 PM

म्यानमार आणि थायलँड येथे 7.0 ते 7.7 मॅग्निट्यूड तीव्रतेच्या भूकंपाने दोन्ही देशांमध्ये हाहा:कार माजला आहे. अनेक इमारती पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळून धाराशाही झाल्या आहेत. या भूंकापने दोन्ही देशात अफरातफरी माजली आहे. लोकांनी या भूकंपाची दृश्य आपल्या कॅमेऱ्यात बंदीस्त करीत सोशल मीडियावर अपलोड केली आहेत.

येथे पोस्ट पाहा –

हे सुद्धा वाचा

म्यानमार येथे शुक्रवारी आलेल्या शक्तीशाली भूकंपाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरह होत आहेत. या व्हिडीओतून तेथील भयानक परिस्थितीचा अंदाज आपल्यााला येऊ शकतो. कोसळणाऱ्या इमारतींनी धुळीचे लोट आकाशात उमटले आहेत. सर्वत्र किंचाळण्याचा आणि मदतीसाठी धावा करण्याचे आवाज येत आहेत. या भूकंपाची भयानक दृश्य पाहून अंगावर काटा येत आहे.

येथे पोस्ट पाहा –

 प्रसिद्ध एव्हा ब्रिज देखील वाहून गेला 

भूकंपाचे केंद्र म्यानमार येथील Sagaing शहरात असल्याचे म्हटले जात आहे. भूकंपाचे झटक्यांनी म्यानमाराच्या मांडलेय येथे इरावडी नदीवरील प्रसिद्ध एव्हा ब्रिज देखील वाहून गेला आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी विभागाने दिलेल्या माहीतीनुसार भूकंपाच्या पहिल्या धक्क्याची तीव्रता 7.2 रिश्टर स्केल होती तर दुसऱ्या धक्क्याची तीव्रता 7.0 इतकी होती. काही लोकांच्या मते हा भूकंप 7.7 रिश्टर स्केलचा होता. देशातील अनेक भागातील दृश्य हादरविणारी आहे. सोशल मीडियावर याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. हे व्हिडीओ म्यानमार आणि थायलंड येथील आहेत. कोसळणाऱ्या इमारतींच्या दृश्यांनी या भूकंपाची तीव्रता लक्षात येते.

येथे पोस्ट पहा  – 

अनेक लोक इमारतीत अडकले

‘द सन’  मधील वृत्तानुसार, बँकॉकमधील एका ३० मजली इमारतीत किमान ६७ लोक अडकल्याचे वृत्त आहे.असे म्हटले जाते की जेव्हा भूकंप झाला तेव्हा इमारतीत बांधकाम चालू होते. भूकंपाच्या केंद्रापासून ८०० मैल अंतरावर असलेल्या थायलंडच्या राजधानीत पहिल्या भूकंपाच्या झटक्यानंतर स्थानिक लोक प्रचंड घाबरले आणि त्यांनी त्यांच्या इमारतींमधून रस्त्यावर धाव घेतली आहे. त्यांनी या इमारती कोसळतानाचे व्हिडीओ पोस्ट केले आहेत.

सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक.
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'.
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली.
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ स्थानिक रस्त्यावर अन् भारतीयांना आर्त हाक
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ स्थानिक रस्त्यावर अन् भारतीयांना आर्त हाक.
पर्यटकांच्या तान्ह्या बाळाला वाचवण्यासाठी काश्मिरी चिमुकला सरसावला
पर्यटकांच्या तान्ह्या बाळाला वाचवण्यासाठी काश्मिरी चिमुकला सरसावला.
'मोदी, फक्त 1 तास...', पहलगाम हल्ल्यावरून बांगर भडकले अन् जीभही घसरली
'मोदी, फक्त 1 तास...', पहलगाम हल्ल्यावरून बांगर भडकले अन् जीभही घसरली.
राजस्थानजवळ पाकने जैश-ए-मोहम्मदचे 4 दहशतवादी तळ बांधले
राजस्थानजवळ पाकने जैश-ए-मोहम्मदचे 4 दहशतवादी तळ बांधले.
अतिरेक्यांची बंदूक हिसकवण्याच्या प्रयत्नात आदिलनं गमावला जीव, घडलं काय
अतिरेक्यांची बंदूक हिसकवण्याच्या प्रयत्नात आदिलनं गमावला जीव, घडलं काय.
'त्यानं जीवाची बाजी लावली अन्', भाजप नेत्याची नजाकत भाईंसाठी खास पोस्ट
'त्यानं जीवाची बाजी लावली अन्', भाजप नेत्याची नजाकत भाईंसाठी खास पोस्ट.
उधमपूरमध्ये दहशतवाद्यांशी चकमक; अली शेख यांना वीरमरण
उधमपूरमध्ये दहशतवाद्यांशी चकमक; अली शेख यांना वीरमरण.