AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेत चोरी करताना भारतीय मुलीला अटक, धायमोकलून रडली, पोलिसांना दया आली नाही…

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता एका परदेशातील सुपरस्टोअरमध्ये चोरी करताना पकडलेल्या तरुणीचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

अमेरिकेत चोरी करताना भारतीय मुलीला अटक, धायमोकलून रडली, पोलिसांना दया आली नाही...
| Updated on: Nov 03, 2025 | 1:01 PM
Share

सोशल मीडियावर प्रत्येक दिवशी कोणता ना कोणता व्हिडीओ व्हायरल होत असतो. काही व्हिडीओ हलके फुलके हसवणारे असतात.तर काही व्हिडीओ धक्कादायक असतात. आता इंटरनेटवर अशाच एका धक्कादायक व्हिडीओ हंगामा माजला आहे. यात व्हिडीओत एका भारतीय तरुणीला सुपर स्टोरमध्ये चोरी करताना पकडल्याचे दाखवले असून ती गयावया करताना दिसत आहे.

दिसायला सर्वसाधारण वाटणारी ही तरुणी जेव्हा पोलिसांच्या समोर येते तेव्हा ती रडू लागत आणि हाथ जोडून माफी मागताना दिसत आहे. ती गयावया करत आपण पेमेंट करायला विसरलो असे पोलिसांना समजवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. परंतू पोलिस तिचे काहीही ऐकत नाहीत. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आणि सोशल मीडियावर या व्हिडीओवर निरनिराळ्या प्रतिक्रीयांचा पाऊस पडला आहे.

विदेशी सुपरमार्केटमध्ये चोरी करताना पकडली

व्हायरल व्हिडीओच्या नुसार ही घटना एका परदेशी सुपरमार्केटमधील असल्याचे सांगितले जाते. येथे एक भारतीय वंशांची मुलगी खरेदी करायला सुपरमार्केटमध्ये जाते. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे तिची चोरी पकडली जाते. ती अनेक वस्तू बॅगेत भरत असून तिने बिलींग काऊंटरवर हे साहित्य स्कॅन केले नसल्याचे समजते. त्यानंतर ती पेमेंट न करता निसटण्याचा प्रयत्न करते. तेव्हा सुरक्षागार्ड तिला थांबवतात आणि तिच्या बॅगेची तपासणी करतात. बॅगेत अनेक वस्तू बिल न केलेल्या आढळतात.

पोलिसांसमोर रडू कोसळते…

स्टोर मॅनेजमेंट या तरुणीला पोलिसांच्या ताब्यात देतात. पोलिस कर्मचारी तिला म्हणतात पाठीवळ आम्ही तुला हथकडी लावणार आहोत. हे ऐकून ही तरुणी प्रचंड घाबरते. आणि हाथ जोडून पोलिसांना विनवणी करते की सर मी पैसे पे करायला विसरली होते. आता मी पैसे पे करते…परंतू पोलिस तिच्या या स्पष्टीकरणावर विश्वास ठेवत नाहीत. पोलिस तिला आम्हाला जबरदस्ती करण्यासाठी मजबूर करु नकोस असे तिला दरडवताना दिसत आहेत.

येथे पाहा व्हिडीओ –

यूजर्स संतापले…

या व्हिडियोला सोशल मीडियावर विविध प्लॅटफॉर्मने शेअर केले आहे. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओला युजर अनेक प्रतिक्रीया देत आहेत. एका युजरने लिहीलेय की जर खिशात पैसे नाहीत तर परदेशात जायचे कशाला ? आणखीन एका युजरने लिहिलंय की यांसारख्या लोकांमुळे परदेशात भारताची प्रतिमा खराब होत आहे. तर एका युजरने लिहीलंय की अशा लोकांना डिपोर्ट केले पाहिजे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.