AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Putin : रशिया-युक्रेन युद्धादरम्यान पुतिन यांचे भारताबाबत सर्वात मोठे वक्तव्य

जगात सध्या ज्या युद्धाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. त्या युद्धादरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी मोठे वक्तव्य केले आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात सध्या युद्ध सुरु आहे. आतापर्यंत मोठी जीवितहानी आणि नुकसान झाले आहे. त्यातच पुतिन यांनी भारतावर मोठा विश्वास दाखवला होता. काय म्हणाले पुतिन भारताबाबत जाणून घ्या.

Putin : रशिया-युक्रेन युद्धादरम्यान पुतिन यांचे भारताबाबत सर्वात मोठे वक्तव्य
| Updated on: Sep 05, 2024 | 8:16 PM
Share

रशिया आणि युक्रेन युद्धादरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे मोठे वक्तव्य पुढे आले आहे. रशियाच्या युक्रेनसोबतच्या संभाव्य शांतता चर्चेत भारत, चीन आणि ब्राझील मध्यस्थाची भूमिका बजावू शकतात, असे पुतीन यांनी म्हटले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्षांचे हे वक्तव्य पंतप्रधान मोदी यांच्या युक्रेन आणि रशिया भेटीनंतर आले आहे. पीएम मोदींच्या या दोन परदेश दौऱ्यांची बरीच चर्चा झाली होती. मोदींचा हा दौरा महत्त्वाचा असल्याचं बोललं जात आहे. जगभरात या भेटीची चर्चा झाली. अमेरिकेसह असे अनेक देश आहेत जे चीनवर विश्वास ठेवू शकत नाहीत. पंतप्रधानांनी दोन्ही देशांना भेटी देऊन आपल्या भूमिकेवर ठाम राहून शांततेने चर्चा करुन मार्ग काढावा असे म्हटले होते.

पंतप्रधान मोदी यांनी जुलैमध्ये रशिया, ऑगस्टमध्ये युक्रेन आणि आता सप्टेंबर महिन्यात दिलेल्या भेटीनंतर हे वक्तव्य आले आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून भारताची भूमिका तीच आहे. ती बदललेली नाही. भारत हा विकासाच्या धोरणाला पाठिंबा देतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. हे युद्ध थांबवण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे युक्रेनसह जगातील अनेक देशांनी म्हटले आहे. आता रशियाही तेच सांगत आहे. पीएम मोदी मध्यस्थीची भूमिका बजावू शकतात आणि हे युद्ध आणखी वाढू नये यासाठी त्यांच्या वतीने प्रयत्न करण्यात आले.

रशियाचा भारतावर विश्वास

पंतप्रधान मोदी युक्रेनहून परतल्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष या दोघांशी बोलले. या भेटीत पंतप्रधान मोदींना काय अनुभव आला तेही त्यांनी शेअर केले. यामुळे आशा आहे का हे युद्ध लवकरच संपेल.

ऑगस्ट महिन्यात युक्रेन दौऱ्यावरून परतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला. युक्रेनसोबतच्या संघर्षाचे लवकर, चिरस्थायी आणि शांततापूर्ण निराकरण करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला. पीएम मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत ही चर्चा केली. संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून या प्रदेशात लवकर शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताचा पूर्ण पाठिंबा व्यक्त केला.

अमेरिका युक्रेनच्या पाठीशी आणि रशियाच्या विरोधात उभा आहे. अमेरिकेने सुरुवातीला भारताला सोबत घेण्याचा प्रयत्न केला. पण भारताने आपली भूमिका आहे तशीच कायम ठेवली. युद्धानंतर मोदी पहिल्यांदा रशियाला पोहोचले तेव्हाही अनेक पाश्चात्य देशांनी प्रश्न विचारले. पण भारताची भूमिका बदलली नाही.

झेलेन्स्की यांचाही भारतावर विश्वास

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनीही म्हटले आहे की, युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध संपवण्यासाठी भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. मोदी युक्रेन दौऱ्यावर असताना द्विपक्षीय चर्चेनंतर भारतीय माध्यमांना संबोधित करताना झेलेन्स्की म्हणाले की मोदींचा दौरा ऐतिहासिक आहे. 1991 मध्ये युक्रेनच्या स्वातंत्र्यानंतर भारतीय पंतप्रधानांची मोदींची युक्रेन भेट ही पहिलीच भेट होती. युक्रेन आणि रशिया या दोघांनीही युद्ध संपवण्यासाठी वेळ न घालवता एकत्र बसावे, असे मोदींनी झेलेन्स्कीला सांगितले.

व्हाईट हाऊसमधील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन किर्बी यांनी म्हटले आहे की, युक्रेनमधील संघर्ष संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही देशाचे अमेरिका स्वागत करते.

हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक.
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद.
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले.
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता.
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी.
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी.
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे.
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन.
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा.