उद्योगपतीचे 1.14 अब्ज डॉलरचे दान, 150 अब्ज डॉलर संपत्तीचा ठरवला उत्तराधिकारी

Berkshire Hathaway Warren Buffett: अमेरिकन अब्जाधिश वॉरन बफे यांनी आपल्या उत्तराधिकारीची निवड केली आहे. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपत्तीचे उत्तराधिकारी कोण असणार? ते त्यांनी निश्चित केले आहे. त्यांनी त्या उत्तराधिकारीची ओळख जाहीर केली नाही.

उद्योगपतीचे 1.14 अब्ज डॉलरचे दान, 150 अब्ज डॉलर संपत्तीचा ठरवला उत्तराधिकारी
Follow us
| Updated on: Nov 30, 2024 | 12:16 PM

Berkshire Hathaway Warren Buffett: जगप्रसिद्ध गुंतवणूकदार आणि उद्योगपती बर्कशायर हैथवेचे चेअरमन वॉरेन बफे हे आपल्या सामाजिक कार्यासाठी ओळखले जातात. त्यांनी आपल्या संपत्तीमधील 1.14 अब्ज डॉलरपेक्षा जास्त किंमतीच्या शेअरचे दान करण्याचा निर्णय घेतला. कुटुंबातील चार सामाजिक संस्थांना हे शेअर ते दान करणार आहे. तसेच त्यांनी आपल्या संपत्तीचा उत्तराधिकारी निश्चित केला. त्यांच्याकडे 150 अब्ज डॉलरची संपत्ती आहे.

अशी केली शेअरची विभागणी

बर्कशायर हैथवे कंपनीकडून जारी करण्यात आलेल्या माहितीत म्हटले आहे की, 94 वर्षीय वॉरेन बफे यांनी 1,600 बर्कशायरचे क्लास ए शेअर 24 लाख क्लास बी शेअरमध्ये बदलणार आहे. त्यानंतर त्यातील 15 लाख शेअर त्यांची दिवंगत पत्नीच्या नावावर असलेल्या सुसान थॉम्पसन बफेट फाउंडेशनला देणार आहे. तसेच 3 लाख शेअर मुलांनी बनवलेले फाउंडेश शेरवूड फाउंडेशन, हावर्ड जी. बफेट फाउंडेशन आणि नोवो फाउंडेशनला देणार आहे.

वॉरन बफे यांनी 2010 मध्ये बिल गेट्स आणि मेलिंडा फ्रेंच गेट्स यांच्यासोबत ‘गिव्हीग प्लेज’ची सुरुवात केली होती. त्यात त्यांनी म्हटले की, ते त्यांची संपत्ती त्यांच्या जीवनकाळ किंवा त्यांच्या मृत्यूनंतर दान करणार आहे. चार वर्षांपूर्वी त्यांनी त्यांचे गेट्स फाउंडेशन आणि मुलांच्या फाउंडेशला मोठे दान केले होते. वॉरन बफे यांनी यापूर्वीच सांगितले होते की, त्यांची संपत्ती ही त्यांच्या परिवाराची संपत्ती असणार नाही.

नवीन उत्तराधिकारी केला जाहीर

अमेरिकन अब्जाधिश वॉरन बफे यांनी आपल्या उत्तराधिकारीची निवड केली आहे. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपत्तीचे उत्तराधिकारी कोण असणार? ते त्यांनी निश्चित केले आहे. त्यांनी त्या उत्तराधिकारीची ओळख जाहीर केली नाही. परंतु त्यांनी सांगितले, माझ्या मुलांनी त्याची माहिती दिली आहे. त्यांना ती मान्य आहे. वॉरन बफे यांची सूसी, हॉवर्ड आणि पीटर अशी तीन मुले आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्सनुसार वॉरेन बफे यांची एकूण संपत्ती 150.2 अब्ज डॉलर आहे. ते जगातील सातवे श्रीमंत व्यक्ती आहे.

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.