AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोमात गेल्यानंतर काय होते ? रुग्णांनी सांगितले आपले धक्कादायक अनुभव

कोमातून जागलेले लोकांनी सांगितले की बेशुद्धावस्थेत त्यांना काय अनुभव आला होता. एका व्यक्तीने सांगितले की तो जोरात ओरडण्याचा प्रयत्न करीत होता, परंतू आवाजचे बाहेर पडत नव्हता.

कोमात गेल्यानंतर काय होते ? रुग्णांनी सांगितले आपले धक्कादायक अनुभव
| Updated on: Aug 16, 2025 | 8:52 PM
Share

एखादी व्यक्ती कोमात गेल्यानंतर नेमके काय होते ? याबाबत केवळ तिच व्यक्ती सांगू शकते जिने या परिस्थितीची सामना केलेला असेल. तसे काही लोकांना हा झोप पूर्ण करण्याचा चांगली पद्धत वाटू शकते. परंतू कोमातून वाचलेल्या लोकांशी बातचीत केली असता त्यांनी हा प्रकार बिलकुल आरामदायी नसतो.

डेली मेलच्या बातमीनुसार कोमातून जागे झालेल्या डझनावारी लोकांनी इंस्टाग्रामच्या टेक्स्ट आधारीत एप थ्रेड्सवर आपले अनुभव सांगितले आहेत. जेव्हा एका युजरन विचारले की जे लोक कोमात राहिले होते, त्यांचा अनुभव कसा होता.? ही पोस्ट लागलीच व्हायरल झाली.

कोमात झाली दलाई लामा आणि मदर तेरेसा यांची भेट

कोणीच कोमाचा अनुभव आरामदायक असल्याचे म्हटले नाही.त्याऐवजी अनेक लोकांनी सांगितले की हा एक अवास्तविक, त्रास देणार आणि भयावह अनुभव होता. एका युजरने उपचारादरम्यान चार आठवडे कोमात घालवले होते. त्यांनी दावा केला की या दरम्यान तो वेग-वेगळ्या जागांवर, वेगवेगळ्या वेळी गेला, त्याने दलाई लामा आणि मदर तेरेसा यांची भेट घेतली.

युजरने सांगितले की एका समुद्रावरुन उडणाऱ्या विमान अपघातात मी जखमी झालो होता. त्यानंतर मला असे वाटले की मला अंतराळात फेकले आहे. परंतू मी हिंमत हारली नाही, हे सर्व एखादा न संपणारं विचित्र स्वप्नं होते.

जेव्हा पतीच्या हत्येला खरे मानले

एका युजरने खूपच निराशाजनक अनुभव कथन करताना सांगितले की मला सर्व अजब स्वप्नं पडली. यात असेही स्वप्नं होते की माझ्या पतीची हत्या केली आहे. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मला नळ्या लावल्या होत्या. त्यामुळे मी बोलू शकत नव्हती. त्यामुळे मी विचारु शकली नाही की हे सत्य आहे का ? त्यामुळे मी कोमात जे घडलं त्यालाच सत्य मानून विश्वास ठेवला.

एका रात्री माझा पती मला भेटायला आला, तेव्हा मला खरेच वाटले की त्याचे भूत आहे. मी इतकी घाबरले की मला काही समजले नाही मी असे का करत आहे.

नर्स आणि प्रियव्यक्तींचा आवाज ऐकू येत होतो

कोमात गेलेल्या काही लोकांनी दावा केला की त्यांनी आपले प्रियजन त्यांच्यासाठी प्रार्थना करत होते ते त्यांना ऐकू येत होते. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांचा आवाज ते ऐकू शकत होते आणि ते बोलू इच्छीत होते, परंतू असे करण्यास ते असमर्थ होते.

एका नर्सने एका रुग्णा संदर्भातील किस्सा पोस्ट केला होता. त्यात त्यांनी सांगितले की त्या रुग्णाला कॅन्सर होता आणि स्टेम सेल ट्रान्सप्लांट झाला होता. ती रुग्ण एक महिनाभर कोमात होती तिने शुद्धीवर आल्यानंतर सांगितले की एक वेगळेच जीवन यादरम्यान पाहायला मिळाले. तिने एका कॅरीबियन बेटाचे वर्णन केले, जेथे ती सर्व लोकांनी भेटली, हे खूपच अजब होते.

गाढ बेशुद्धीची स्थिती आहे ‘कोमा’

एनएचएसने कोमाला एक बेशुद्ध अवस्थेची अशी स्थिती ज्यात व्यक्ती प्रतिक्रीयाहीन होते, आणि तिला जागे केले जाऊ शकत नाही. कोमात गेलेल्या व्यक्तीच्या मेंदूच्या गतिविधी खूपच कमी झालेल्या असतात. केव्हा केव्हा कर तो यंत्राशिवाय श्वास घेणे किंवा गिळू शकण्यास देखील असमर्थ असतो.

एनएचएस दिशानिर्देशात पुढे म्हटले आहे की ते जीवंत असतात परंतू त्यांना जागे केले जाऊ शकत नाही. आणि त्यांच्या सचेत असण्याचे कोणतेही लक्षण दिसत नाही. व्यक्तीचे डोळे बंद असू शकतात. ते आपल्या वातावरणाप्रती उदासिन असू शकतात. ते ध्वनी किंवा दुखणे यावर देखील कदाचित प्रतिक्रीया देणार नाही, वा स्वत:च्या इच्छेने हलणे- डुलण्यास सक्षम नसतील.

काही दिवस ते अनेक महिने कोमात असतात लोक

कोमा अनिश्चित काळापर्यंत राहू शकतात लोक, अनेक दिवस ते महिन्यांपर्यंत तर कधी-कधी वर्षांपर्यंतही. लोक हळूहळू चेतना आणि जागृत होऊ शकतात. किंवा दुर्दैवाने कधीच जागे होऊ शकत नाहीत.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा