कोणत्या कामासाठी वापरला जातो रेअर अर्थ एलिमेंट, चीननंतर कोण आहे जगात दादा ?
Rare Earth Elements: अमेरिकेच्या टॅरिफबाबतच्या अरेला कारे करण्याचे धारिष्ट्य चीनने रेअर अर्थ एलिमेंट्सच्या जोरावर दाखवले आहे. जगातील बाजारपेठ चीनने ताब्यात घेतली आहे. या रेअर अर्थच्या बाबतीत भारताचा कितवा क्रमांक लागतो ? कोणते देश यात पुढे आहेत ते पाहूयात..

Rare Earth Elements: रेअर अर्थ एलिमेंट्सला आधुनिक तंत्रज्ञानाचा कणा मानला जाते. हे १७ खास धातू असून जे आपल्या रोजच्या जीवनात वापरल्या जाणाऱ्या जवळपास प्रत्येक हाय टेक गॅझेट, मशीन्स, शस्रास्रांत महत्वाची भूमिका निभावतात. मोबाईल फोनपासून इलेक्ट्रीक कार, सोलर पॅनल, क्षेपणास्र आणि सॅटेलाईटपर्यंत प्रत्येक जागी यांचा वापर केला जातो. या रेअर एलिमेंट्समध्ये चीनचे वाढते प्राबल्यामुळे जागतिक बाजारात तणाव वाढला आहे. अलिकडेच चीनने या रेअर अर्थ एलिमेंट्सच्या निर्यातीवर कठोर नियम लागू केले आहेत. त्यामुळे याच्या आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळीवर गंभीर प्रभाव पडला आहे. कोणत्या कामासाठी हे धातू वापरले जातात आणि कोणत्या देशांकडे हे रेअर अर्थ एलिमेंट्स भरपूर आहेत.
कोठे कोठे वापरले जाते रेअर अर्थ एलिमेंट्स ?
रेअर अर्थ एलिमेंट्सचा वापर आपल्या आजच्या युगात जवळपास सर्व क्षेत्रात होतो.
इलेक्ट्रॉनिक्समध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, टेलिव्हीजन आणि कॅमेरा यात मायक्रोचिप्समध्ये या धातूंचा वापर केला जातो. यात नियोडिमियम आणि प्रासियोडिमियम सारखे धातूंचा वापर होता. इलेक्ट्रीक कार आणि हायब्रिड वाहनांच्या मोटर्समध्ये रेअर अर्थ मॅग्नेट्स वापर केला जात होता, ज्यामुळे ते हलका किंवा अधिक पॉवरफूल बनवतो. संरक्षण क्षेत्रात क्षेपणास्र, जेट इंजिन, नाईट व्हीजन डिव्हाईस आणि रडार सिस्टीम यात देखील या धातूंची मोठी भूमिका असते.
ऊर्जा क्षेत्रात विंड टर्बाईन, सोलर पॅनल आणि रिचार्जेबल बॅटरीत रेअर अर्थ मटेरियल्सचा वापर वेगाने वाढत आहे. मेडिकल टेक्नॉलॉजीत एमआरआय मशिन, लेझर सर्जरी आणि डायग्नोस्टीक उपकरणात हे अत्यंत महत्वाचे असते. म्हणजेच जगातील प्रत्येक आधुनिक तंत्रज्ञानात कोणत्या ना कोणत्या रुपात हे १७ रेअर अर्थ एलिमेंट्स वापरले जातात.
कोणते देश आहेत सर्वात मोठे खिलाडी ?
चीन
चीन हा जगातला सर्वात मोठा रेअर अर्थ भंडार असलेला देश आहे. चीनमध्ये या धातूंचा जगातील जवळपास अर्धा साठा ( ४४ मिलियन मेट्रीक टन ) आहे. केवळ उत्खनन, प्रोसेसिंग आणि जागतिक पुरवठा साखळीवर चीनचे नियंत्रण आहे. गेल्या काही वर्षात चीनने त्याच्या रेअर अर्थ एलिमेंट्समुळे जागतिक बाजारपेठेत आपले नाव आणखीन मजबूत केले आहे.
ब्राझील
जगात याबाबत ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथे २१ मिलियन मेट्रीक टन भंडार आहे. हे भंडार विशाल असले तरी संपूर्णपणे विकसित झालेले नाही. ब्राझील त्यांचे उत्पादन वाढवणे आणि जागतिक मागणी पूर्ण करण्यासाठी शोध आणि उत्खनन दोन्ही क्षेत्रात सातत्याने प्रयत्न करत आहे.
भारत
भारताच्या जवळ ६.९ मिलीयन मेट्रीक टन रेअर अर्थचे भंडार आहे. तसेच देशाच्या समुद्र किनारे आणि वाळू तसेच खनिज पुरेसे आयआयआय उपलब्ध आहे. जे जागतिक पुरवठ्यासाठी महत्वपूर्ण योगदान देते. भारताचे उत्पादन सातत्याने वाढत आहे. आणि हे मुलद्रव्यांचा औद्योगिक वापर वाढावा यासाठी पायाभूत संरचनेत भारत गुंतवणूक करीत आहे.
ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलिया या यादीत चौथ्या स्थानी असून या देशात ५.७ मिलीयन मेट्रीक टन रेअर साठा आहे. तसेच अनेक खाण उद्योग सुरु आहेत. स्थिर खणन धोरणे आणि समृद्ध साठ्यांमुळे ऑस्ट्रेलिया जागतिक बाजारातील एक प्रमुख खेळाडू म्हणून पुढे येत आहे.
रशिया
रशियाकडे जवळपास ३.८ मिलीयन मेट्रीक टन रेअर अर्थचा साठा आहे. हे आधीच्या अंदाजित आकड्यांच्या तुलनेत याचे प्रमाण थोडे कमी आहे. परंतू रशियाने त्यांच्या उत्खनन आणि इतर क्षेत्रातील विकास सुरुच ठेवला आहे. आपली जागतिक स्थिती मजबूत करण्यासाठी रशिया टॉप – ५ देशात सामील आहे.
व्हीएतनाम
व्हीएतनाममध्ये देखील ३.५ मिलीयन मेट्रीक टन रेअर अर्थ साठा आहे. चीनच्या सीमेलगत आणि पूर्व किनाऱ्यावर हे साठे आहेत. जे इलेक्ट्रीक वाहने, डिस्प्ले आणि चुंबकांसाठी महत्वाचे आहेत. व्हीएतनाम उत्पादन वाढवणे आणि आयातीवर अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.
अमेरिका
अमेरिकेकडे १.९ मिलीयन मेट्रीक टन आरआयआय साठा आहे. जो त्याला जगातला सातवा सर्वात मोठा देश बनवतो. कॅलिफोर्नियातील खाणी याचा मोठा स्रोत आहे. ज्या १९५० पासून सक्रीय आहेत. परंतू तरीही चीनकडून अमेरिका रेअर अर्थ एलिमेंट्स आयात करत असतो.
