Russia Ukraine War : खरच अमेरिकेने युक्रेनला हे खतरनाक मिसाइल दिलं, तर रशियात होईल मोठा विद्ध्वंस, जाणून घ्या कारण
Russia Ukraine War :माजी राष्ट्रपती दिमित्रि मेदवेदेव यांनी आपल्या टेलिग्राम पोस्टमध्ये थेट इशारा दिलाय की, अशा प्रकारची हत्यारं दिल्यामुळे थेट युद्धाची स्थिती निर्माण होईल. रशियाचे सरकारी प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव यांनी ही रेड लाइन ओलांडण्यासारख असल्याचं म्हटलं.

एकाबाजूला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या दुसऱ्या कार्यकाळात आठ युद्ध समाप्त केल्याचा दावा करत आहेत, त्यासाठी ते नोबेल पुरस्काराची मागणी करतायत. पण जे युद्ध त्यांनी आपण राष्ट्रपती बनताच 24 तासात संपवू असा दावा केला होता, ते मात्र वाढतच चाललं आहे. आम्ही बोलतोय तीन वर्षांपासून सुरु असलेल्या रशिया-युक्रेन युद्धाची.
अलीकडे अमेरिकेने युक्रेनला टॉमहॉक मिसाइल देणार असल्याच म्हटलं होतं. अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंस यांच्यानुसार, हा मुद्दा वर्तमानात ट्रम्प प्रशासनातंर्गत चर्चेचा विषय बनला आहे. रशिया याकडे थेट हस्तक्षेप म्हणून पाहत आहे. माजी राष्ट्रपती दिमित्रि मेदवेदेव यांनी आपल्या टेलिग्राम पोस्टमध्ये थेट इशारा दिलाय की, अशा प्रकारची हत्यारं दिल्यामुळे थेट युद्धाची स्थिती निर्माण होईल. रशियाचे सरकारी प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव यांनी ही रेड लाइन ओलांडण्यासारख असल्याचं म्हटलं.
केवळ अमेरिकी कंपनी RTX च हे मिसाइल बनवते
टॉमहॉक मिसाइल लांब पल्ल्याच सबसॉनिक क्रूज मिसाइल आहे. जहाजं, पाणबुड्या आणि ग्राऊंड लॉन्चर्सवरुन हे मिसाइल डागता येऊ शकतं. या मिसाइलची रेंज 1250 किलोमीटर ते 2500 किलोमीटर पर्यंत आहे. या मिसाइल्समध्ये हाय-एक्सप्लोसिव वॉरहेड असतात. बंकर किंवा दुसर्या टार्गेटचा लक्ष्यभेद करता येतो. टॉमहॉक मिसाइल्स लो-अल्टीट्यूड म्हणजे कमी उंचीवरुन उड्डाण करुन रडारला चकवा देऊ शकतात. अमेरिकेने 1970 च्या दशकात या मिसाइलचा वापर केला होता. वर्तमानात केवळ अमेरिकी कंपनी RTX च हे मिसाइल बनवते.
कारण त्यांना मोठ्या युद्धात पडायचं नव्हतं
युक्रेन दीर्घकाळापासून रशियाच्या आत खोलवर प्रहार करण्यासाठी लांब पल्ल्याच्या मिसाइल्सची मागणी करत आहे. NATO देशांनी आधी ही मिसाइल देण्यास नकार दिला. कारण त्यांना मोठ्या युद्धात पडायचं नव्हतं. पण हळू-हळू काही देश आपली भूमिका बदलत आहेत.
ब्रिटनने 2023 पासून युक्रेनला स्टॉर्म शॅडो मिसाइल द्यायला सुरुवात केली. ऑगस्ट 2024 मध्ये युक्रेनला थेट रशियावर हल्ला करण्यासाठी वापरण्याची परवानगी दिली होती. विश्लेषकांनुसार, युक्रेनला टॉमहॉक क्षेपणास्त्र मिळालं, तर रशियाची सैन्य ठिकाणं, एअर फिल्डस, लॉजिस्टिक हब्स आणि कमांड सेंटरवर हल्ला करण्यासाठी युक्रेन सक्षम होईल.
….तर पुतिन यांना चर्चेसाठी मजबूर करु शकतो
आम्ही या मिसाइलचा वापर करणार नाही असं युक्रेनचे राष्ट्रपती जेलेंस्की यांनी म्हटलं आहे. ही मिसाइल रशियावर दबाव टाकण्यासाठी आणि शांतता चर्चेसाठी ताकद म्हणून वापरु असं जेलेंस्की यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले की, “आम्हाला याची आवश्यकता आहे, पण याचा अर्थ असा नाही की, आम्ही याचा वापर करु. जर, ही मिसाइल्स आमच्याकडे असतील, तर पुतिन यांना चर्चेसाठी मजबूर करु शकतो”
