कमला हॅरिस यांचे भारतीय कनेक्शन काय? कशी असते अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक ?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अखेर राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूकीतून आपली माघार घोषीत केली आहे. त्यांनी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांना पाठींबा जाहीर केला आहे. भारत आणि अमेरिका जगातील दोन सर्वात मोठी लोकशाही राष्ट्रे परंतू त्यांच्यातील निवडणूक पद्धती किती भिन्न आहे ते पाहूयात...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी निवडणूकीतून माघार घेतली आहे. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या यांच्या समोर आपला निभाव लागणार नाही याचा अंदाज आल्यानंतर 81 वर्षीय जो बायडेन यांनी अखेर माघार घेतली आहे. त्यामुळे आता जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणूकीत आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या समोर भारतीय वंशाच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरीस यांचे आव्हान असणार आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर ट्रम्प यांच्याबाजूने सहानुभूतीची लाट निर्माण झाली आहे. त्यामुळे या निवडणूकीतील रंगत वाढली आहे. कशी असते अमेरिकेतील निवडणूक पद्धत ? तेथील राष्ट्राध्यक्ष आणि आपल्याकडील राष्ट्रपतींचे पद यात फरक काय ? कशी होते ही निवडणूक प्रक्रीया पाहूयात…. ...
