AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोण आहेत भारतीय वंशाच्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार, भारतासाठी आताच केली मोठी घोषणा

भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक असलेल्या निक्की हेल्ली यांनी भारतासाठी आतापासूनच मोठी घोषणा केली आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या त्या प्रबळ दावेदार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ही त्यांनी टीका केली आहे. एका मुलाखतीत बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

कोण आहेत भारतीय वंशाच्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार, भारतासाठी आताच केली मोठी घोषणा
| Updated on: Feb 20, 2024 | 6:25 PM
Share

Nikki Haley on India : भारतीय वंशाच्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार निक्की हेली यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे चीनला धक्का बसणार आहे. त्यांचं हे विधान भारतासाठी मात्र फायदेशीर मानले जात आहे. रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदासाठी उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भारतीय-अमेरिकन निक्की हेली म्हणाल्या की, मी सत्तेवर आल्यास केवळ नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशनला (नाटो)च नव्हे तर भारतालाही सहकार्य करेल. त्या ऑस्ट्रेलिया, जपान, दक्षिण कोरिया आणि फिलीपिन्ससह इतर अनेक देशांशी आपले संबंध मजबूत करेल.

ट्रम्प पुन्हा निवडून आल्यास ‘नाटो’ला धोका

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा निवडून आल्यास नाटोसोबतच्या संबंधांना धोका निर्माण होऊ शकतो, असे हेली म्हणाल्या. जर ट्रम्प पुन्हा एकदा सत्तेत आले तर अनेक मुद्द्यांची चिंता आहे. त्यांच्यामुळे नाटोशी संबंधांना धोका आहे. नाटो ही 75 वर्षांची यशोगाथा आहे. अमेरिकेतील 2024 च्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याच्या शर्यतीत रिपब्लिकन पक्षाकडून ट्रम्प यांच्या विरोधात हॅली या एकमेव उमेदवार उरल्या आहेत.

नाटो काय आहे?

NATO ही 31 सदस्य असलेल्या राष्ट्रांची लष्करी युती आहे, ज्यामध्ये युरोपमधील २९ तर दोन उत्तर अमेरिकेतील देशांचा समावेश आहे. हेली म्हणाल्या की, चीन नेहमीच या आघाडीचा विरोधक राहिलायय. अशा परिस्थितीत नाटोला बळकट करणे आवश्यक आहे. सुमारे एक आठवड्यापूर्वी, ट्रम्प यांनी कॅरोलिनामध्ये टिप्पणी केली होती की ते रशियाला कोणत्याही नाटो सदस्य राष्ट्रासोबत “काहीही” करण्यास प्रोत्साहित करतील.

नाटोचा विस्तार करणार

यासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर हेली म्हणाल्या की, नाटोमध्ये आणखी मित्र देश जोडणे आवश्यक आहे. ही वेळ एकत्र उभे राहण्याची आहे. 11 सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर अमेरिकेच्या पाठीशी उभे राहिलेल्या मित्र देशांची बाजू घेण्याची ही वेळ आहे.

भारतासह इतर देशांना सोबत घेणार

एका प्रश्नाला उत्तर देताना हेली म्हणाल्या की, “मी वचन देते की, जर मला राष्ट्राध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली तर आम्ही नाटोला बळकट करूच, शिवाय भारत, ऑस्ट्रेलिया, जपान, दक्षिण कोरिया, फिलीपिन्स या देशांसोबतचे संबंधही मजबूत करू.” त्यांनी या वक्तव्यातून ‘क्वाड’ संघटनेची ताकद सांगितली. आम्ही त्यात आणखी देशांना जोडू. भारत आणि अमेरिकेशिवाय ऑस्ट्रेलिया आणि जपानचाही यामध्ये समावेश आहे.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.