व्हेनेझुएलाला ट्रम्प टार्गेट करीत असताना रशिया आणि चीन शांत का ?
व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्यावर अमेरिकेच्या हल्ल्याचे संकट कायम असताना मादुरो यांचे मित्र रशिया आणि चीन यांनी त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष करण्यामागे काय आहे कारण ?

व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना सध्या अडचणीत सापडले आहेत. अनेक वर्षे चीन आणि रशिया या देशाला पाठींबा देत आला आहे. अनेक वर्षांपर्यंत व्हेनेझुएला येथील साम्यवादी सरकारला राजकीय, आर्थिक आणि सैन्य समर्थन देत होता. या नात्याची सुरुवात माजी राष्ट्राध्यक्ष ह्यूगो शावेज यांच्या काळात झाली होती. जे मादुरो यांचे मार्गदर्शक होते. परंतू आता तज्ज्ञांचे मत आहे की हा पाठींबा आता बऱ्याच प्रमाणात प्रतिकात्मक राहिला आहे. मदत म्हणून सैन्य वा आर्थिक सहकार्याऐवजी केवळ तोंडी समर्थन दिले जात आहे.
हा बदल जेव्हा झाला आहे तेव्हा अमेरिकेने कॅरेबियन भागात आपले वायूदल आणि नौदल तैनात केले आहे. यात अणू ऊर्जेवर चालणारी पाणबुडी, हेरगिरी करणारे विमाने आणि १५ हजार सैनिकांचा समावेश आहे. अमेरिकेने या भागात ड्रग्स तस्करीत सामील असल्याचा आरोप करीत अनेक नौकांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात ८० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अलिकडेच अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या किनाऱ्यावर तेल टँकर देखील जप्त केला आहे. ट्रम्प प्रशासनचे म्हणणे आहे की सैन्य तैनाती आणि हे हल्ले ड्रग तस्करीच्या विरोधातील कारवाईचा भाग आहे आणि जप्त केलेल्या टँकरवर आधीपासून निर्बंध लादलेले होते.
अनेक तज्ज्ञांच्या मते अमेरिकेचा खरा हेतू सत्ता परिवर्तन आहे. स्वत: राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरा देखील हा दावा करत आहेत. अशा वेळी राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरा यांना सर्वाधिक पाठींब्याची गरज असताना अखेर काय बदलले आहे.
व्हेनेझुएला आता चीन आणि रशिया दोन्हीसाठी कमी प्राथमिकतेचा मुद्दा बनलेला आहे. खास करुन जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाईट हाऊसमध्ये पुनरागमन झालेले आहे. आज रशिया वा चीन यांच्याकडे देखील व्हेनेझुएलाचे संपूर्ण संरक्षण करण्याचे काही खास कारण उरलेले नाही. रशिया युक्रेन युद्धात अडकलेला आहे. तर चीन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासोबत आंतरराष्ट्रीय स्तरावर सह अस्तित्व बनवण्याचा प्रयत्न करत आहे.
युक्रेन युद्धाने रशिया गांजलेला
साल २०२२ मध्ये युक्रेनवर रशियाच्या हल्ल्यानंतर मॉस्कोने या संघर्षात मोठी सामुग्री झोकून दिली आहे. त्यामुळे त्याची आर्थिक स्थिती सैन्य क्षमता दोन्हींवर दबाव आहे. तसेच रशियाला व्यापक प्रमाणावर पाश्चिमात्य देशाच्या निर्बंधांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे यापूर्वी रशियाच्या पाठींब्याचा जास्त फायदा मिळायचा त्या देशांना आता रशियाकडून जास्त मदतीची आशा राहिलेली नाही.
आर्थिक कंगालपण आणि तेल उद्योगाची दुरावस्था
कोलंबियातील इसेसी विद्यापीठातील राजकारण आणि आंतरराष्ट्रीय संबंध लॅबोरेटरीचे संचालक प्रोफेसर व्लादिमीर रुविन्स्की यांच्या मते रशिया आता पहिल्यापेक्षा जास्त निर्बंध झेलण्याची जोखीम घेऊ इच्छीत नाही. तसेच चीन व्हेनेझुएलाच्या मादुरो यांच्या संरक्षणासाठी आपल्यावर आणखी टॅरिफ ओढवून घेण्याचा धोका उचलू इच्छीत नाही.व्हेनेझुएलाचे आर्थिक कंगालपण आणि तेल उद्योगाची दुरावस्था देखील चीनची मदत न करण्यामागचे कारण आहे. चीनने आता व्हेनेझुएलाला नवीन कर्ज देणे बंद केले आहे. त्याचे लक्ष जुनी कर्जे वसुल करण्याकडे अधिक लागले आहे. तसेच चीन आणि रशिया दोघांनाही गेल्या राष्ट्राध्यक्ष निवडणूकात व्हेनेझुएलात गोंधळ झाल्याचे वाटत आहे.
