AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Trump Tariff on China : रेअर अर्थ मिनरल्‍सवरुन अमेरिकेचा गेम करताना चीनने भारताला टाकलं मोठ्या संकटात, ही अट टाकली

Trump Tariff on China : चीनने 1 डिसेंबरपासून रेअर अर्थ मिनरल्‍स (Rare Earth Minarals) वर कठोर नियंत्रण आणण्याचा निर्णय घेतला आहे. चीन रेअर अर्थ मिनिरल्सचा राजा आहे. रेअर अर्थ मिनरल्‍स निर्यातीचा 90 टक्के कंट्रोल चीनच्या हातात आहे.

Trump Tariff on China :  रेअर अर्थ मिनरल्‍सवरुन अमेरिकेचा गेम करताना चीनने भारताला टाकलं मोठ्या संकटात, ही अट टाकली
Modi-Trump-Jinping
| Updated on: Oct 11, 2025 | 11:28 AM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी चीनवर टॅरिफ हल्ला केला. 1 नोव्हेंबर 2025 पासून चीनमधून आयात होणाऱ्या सर्व सामानावर अतिरिक्त 100 टक्के टॅरिफ लावण्यात येणार आहे. म्हणजे आधीपालून जो टॅक्स आहे, त्यावर 100 टक्के अतिरिक्त टॅक्स लागणार आहे. ट्रम्प यांनी टॅरिफ धमकीसह येत्या 1 नोव्हेंबरपासून ‘क्रिटिकल सॉफ्टवेअर’ वर एक्सपोर्ट कंट्रोल लागू करण्याची सुद्धा घोषणा केली आहे. आता प्रश्न हा विचारला जातोय की, अखेर डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर इतका 100 टक्के टॅरिफ का लावला?. आता कुठे हळू-हळू गोष्टी रुळावर येत होत्या. या मागे कारण आहे, चीनचा एक निर्णय.

चीनने 1 डिसेंबरपासून रेअर अर्थ मिनरल्‍स (Rare Earth Minarals) वर कठोर नियंत्रण आणण्याचा निर्णय घेतला आहे. चीन रेअर अर्थ मिनिरल्सचा राजा आहे. रेअर अर्थ मिनरल्‍स निर्यातीचा 90 टक्के कंट्रोल चीनच्या हातात आहे. म्हणूनच चीन रेअर अर्थ मिनरल्‍सवरुन नवनवीन नियम आणत असतो. आता चीनने म्हटलय की, या खनिजाच्या निर्यातीवर ते कठोर नियंत्रण आणणार. पर्यावरण रक्षण आणि राष्ट्रीय सुरक्षा मजबुतीच कारण चीनने यासाठी दिलय.

भारतासमोर काय अट ठेवली?

चीनने भारताकडून सुद्धा आश्वासन मागितलय की, तुम्ही अमेरिकेला हेवी रेअर अर्थ मिनरल्सचा पुरवठा करणार नाही, तरच ते भारताला रेअर अर्थ मिनरल्स देतील. याच निर्णयामुळे ट्रम्प चीनवर चिडले आहेत. त्यामुळे अमेरिकेने चिनी सामानाच्या आयातीवर 100 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे.

कुठल्या इंडस्ट्रीज प्रभावित होतील?

रेअर अर्थ मिनरल्‍स 17 प्रकारच चुम्‍बकीय तत्‍व असलेलं खनिज आहे. यात लॅथेनम, नियोडिमियम आणि यूरोपियम आहे. याचा उपयोग स्मार्टफोन, इलेक्ट्रिक कार, कंप्यूटर चिप्स, सैन्य उपकरणं आणि ग्रीन एनर्जीसाठी केला जातो. रेअर अर्थ मिनरल्स मिळालं नाही, तर ऑटोसह अनेक इंडस्ट्रीज प्रभावित होतील. इलेक्‍ट्रॉनिक इंडस्‍ट्री ठप्प होऊन जाईल. जगातील 70 टक्क्यापेक्षा जास्त रेअर अर्थ मिनरल्सचा साठा चीनकडे आहे.

वाटाघाटासाठी अजून मध्ये 20 दिवस

चीनच्या रेअर अर्थ मिनरल्सच्या निर्णयाने सर्व देश प्रभावित होतील असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. “चीनचं हे पाऊल म्हणजे नैतिक अपमान आहे. वर्ल्ड ट्रेड कंट्रोल करण्याच्या त्याच्या दीर्घकालीन रणनितीचा हा भाग आहे” असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. अमेरिका एकतर्फी कारवाई करेल असं ट्रम्प म्हणाले. चीनवर 1 नोव्हेंबर 2025 पासून 100 टक्के टॅरिफ लागू होईल. वाटाघाटासाठी अजून मध्ये 20 दिवस आहेत.

भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....