मृतदेह, महिला अन् 3 महिने… सत्य समोर येताच पायाखालची जमीन सरकली, नेमकं काय घडलं?
एक महिला एका मृतदेहासोबत तब्बल 3 महिने राहत होती. हा मृतदेह तिच्या रूममेटचा होता. ही घटना फ्रान्समधील कार्पेन्ट्रास येथील आहे. तिने त्या मृतदेहाच्या डोक्याची विल्हेवाट लावल्याचेही समोर आले आहे. त्यानंतर आता याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

तुम्ही मृतदेहासोबत एखादी व्यक्ती राहत असल्याच्या काही बातम्या ऐकल्या असतील. आताही अशीच एक घटना समोर आली आहे. एक महिला एका मृतदेहासोबत तब्बल 3 महिने राहत होती. हा मृतदेह तिच्या रूममेटचा होता. ही घटना फ्रान्समधील कार्पेन्ट्रास येथील आहे. तिने त्या मृतदेहाच्या डोक्याची विल्हेवाट लावल्याचेही समोर आले आहे. त्यानंतर आता याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
फ्लॅटमधून येत होती दुर्गंधी
एलिस(बदललेले नाव) ही 29 वर्षीय महिला एका फ्लॅटमध्ये राहत होती. काही काळापूर्वी पास्कल बी नावाचा एक साठ व्यक्ती तिच्यासोबत राहू लागला. मात्र काही दिवसांनंतर हे दोघे शेजाऱ्यांना दिसले नाहीत. तसेच एलिसच्या फ्लॅटमधून एक विचित्र दुर्गंधी येत होती. त्यामुळे शेजाऱ्यांनी याबाबत तक्रार केली. त्यानंतर सफाई कामगारांना बोलावण्यात आले.
सर्वांना बलसा धक्का
सफाई कामगारांनी दार उघडले तेव्हा सर्वांच्या पायाखालील जमीन सरकली. कारण त्यांच्यासमोर सोफ्याखाली एक कुजलेला मृतदेह दिसून आला. या मृतदेहाला डोके नव्हते. तपासात असे दिसून आले की हा मृतदेह पास्कल बी यांचा आहे. तो काही महिन्यांपू्र्वी एलिससोबत राहत होता.
मृतदेहावर सोफा ठेवला
पोलीसांनी या घटनेचा तपास सुरु केला. यात असे आढळले की, एलिस मानसिकदृष्ट्या अस्थिर होती. तिला स्किझोफ्रेनिया आणि बायपोलर डिसऑर्डर या गंभीर आजारांनी ग्रासलेले होते. त्यामुळे उपचारासाठी तिला अनेक वेळा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अशीही माहिती समोर आली की, जेव्हा एलिसला पास्कल मृतावस्थेत आढळला तेव्हा तिने या घटनेची माहिती पोलीसांना देण्याऐवजी त्याच्या मृतदेहावर सोफा ठेवला.
एलिसला अटक
कालांतराने हा मृतदेह कुजण्यास सुरुवात झाली. काही दिवसांपूर्वी एका साक्षीदाराने एलिसला काळ्या प्लास्टिक पिशव्या फेकताना पाहिले, ज्यामध्ये पास्कलचे डोके आणि काही अवयव असण्याची शक्यता होती. या घटनेचा तपास सुरु असताना एलिसला अटक करण्यात आली. तिच्यावर खुनाचा आरोप ठेवला होता, मात्र हा आरोप सिद्ध होऊ शकला नाही. न्यायालयाने तिची मानसिक स्थिती लक्षात घेत तिला फक्त 4 महिन्यांची शिक्षा सुनावली.
