नासाच्या सुपरसॉनिक पॅराशूटचा विश्वविक्रम!   

नासाच्या सुपरसॉनिक पॅराशूटचा विश्वविक्रम!    

वॉशिंग्टन : अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने मंगळयान मोहिम 2020 साठी खास सुपरसॉनिक पॅराशूटची निर्मिती केली आहे. या सुपरसॉनिक पॅराशूटची नासाकडून बुधवारी 31 ऑक्टोबरला चाचणी करण्यात आली. या चाचणीत सुपरसॉनिक पॅराशूटने विश्वविक्रमाची नोंद केली.  हे सुपरसॉनिक रॉकेट लाँच झाल्यानंतर एका सेकंदाच्या 40 व्या भागात उघडल्याने, हा विक्रम नोंदवला गेला.

विशेष म्हणजे या पॅराशूटवर 37 हजार किलोचा भार लादण्यात आला होता. नासाच्या महत्त्वकांशी असलेल्या मंगळयान मोहिमेत सुपरसॉनिक पॅराशूटची भूमिका महत्त्वाची असणार आहे.

नासाने दिलेल्या माहितीनुसार, 17.7 मीटर लांबीचे ब्लॅक ब्रेंट IX साऊंडिंग नंबरचे रॉकेट लाँच झाल्यानंतर, केवळ दोन मिनिटांपेक्षाही कमी वेळात रॉकेटपासून पॅराशूट वेगळं झालं.  पृथ्वीच्या वायूमंडळात येताच सुपरसॉनिक पॅराशूट उघडलं.

सामान्य रॉकेटच्या पॅराशूटला उघडण्यासाठी दहा सेकंदांपर्यंत वेळ लागतो. मात्र, त्या तुलनेत सुपरसॉनिक पॅराशूट हे एका सेकंदाच्या 40 व्या भागात उघडलं, ही आजवरची सर्वात जलद प्रक्रिया असल्याने विश्वविक्रम प्रस्थापित झाला.

सुपरसॉनिक पॅराशूट नायलॉन आणि फायबर यापासून तयार करण्यात आल्यानं इतर पॅराशूटच्या तुलनेत याचं वजन हलकं आहे.

दरम्यान, सुपरसॉनिक पॅराशूटचा वापर नासाची सर्वात मोठी मोहीम म्हणवल्या जाणाऱ्या मंगळयान मोहिम 2020मध्ये होणार असल्याने नासातर्फे सुपरसॉनिक पॅराशूटची चाचणी करण्यात आली.

Published On - 6:17 pm, Wed, 31 October 18

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI