AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ दिवशी सुरू होणार Amazon Prime Day Sale, लॅपटॉप आणि स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट

Amazon Prime Day 2025 सेलमध्ये तुम्हाला स्मार्टफोन आणि लॅपटॉपवर बंपर डिस्काउंट मिळू शकतो. हा सेल कधी सुरू होईल आणि कधी संपेल? या सेलमध्ये लॅपटॉप आणि स्मार्टफोनसाठी तुम्हाला कोणत्या गोष्टींवर सवलतीचा फायदा मिळेल याची माहिती आजच्या या लेखात जाणून घेऊयात...

'या' दिवशी सुरू होणार Amazon Prime Day Sale, लॅपटॉप आणि स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट
amazon prime day
| Edited By: | Updated on: Jul 26, 2025 | 1:46 PM
Share

जर तुम्ही नवीन स्मार्टफोन किंवा लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. Amazon लवकरच त्यांचा सर्वात मोठा सेल प्राइम डे 2025 सर्व ग्राहकांसाठी घेऊन येत आहे, ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्सपासून फॅशन, घरगुती उपकरणे आणि गॅझेट्सपर्यंत सर्व गोष्टींवर मोठी सूट मिळेल. विशेष म्हणजे यावेळी प्राइम डेमध्ये स्मार्टफोन आणि लॅपटॉपवर देखील बंपर ऑफर उपलब्ध असणार आहेत. चला तर मग आजच्या या लेखात आपण Amazon Prime Day Sale 2025 हा सेल कधी सुरू होत आहे त्याबद्दल जाणून घेऊयात…

2025 चा अमेझॉन प्राइम डे कधी आहे?

अमेझॉन प्राइम डे 2025 हा सेल 12 जुलै ते 14 जुलै 2025 पर्यंत चालेल. हा सेल फक्त प्राइम सदस्यांसाठी असेल. जर तुम्ही अमेझॉन प्राइमचे सदस्य असाल तरच तुम्ही या डीलचा लाभ घेऊ शकाल. या काळात तुम्ही आयसीआयसीआय (ICICI) आणि एसबीआय (SBI) कार्डवर 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंट देखील मिळवू शकता.

स्मार्टफोनवर उपलब्ध ऑफर्स

प्राइम डे सेलमध्ये तुम्हाला Samsung, OnePlus, Realme, Redmi, iQOO आणि Motorola सारख्या अनेक लोकप्रिय स्मार्टफोन ब्रँडवर मोठ्या सवलतींचा फायदा मिळेल.

Realme GT 7 Pro 5G: सेल सुरू होण्यापूर्वीच, या फोनवर सुमारे 13,000 रुपयांची सूट मिळत आहे.

Nothing Phone 2: तर या फोनची किंमत 45,000 हजार रुपयांवरून चक्क 28,000 रुपयांपर्यंत कमी झाली आहे.

Samsung Galaxy S24 FE: या फोनवरही 30,000 रुपयांपर्यंत सूट मिळण्याची शक्यता आहे. काही डीलमध्ये एक्सचेंज ऑफर आणि नो-कॉस्ट ईएमआयचाही समावेश असेल, ज्यामुळे तुम्हाला हे महागडे फोन खरेदी करणे सोपे होईल.

लॅपटॉपवर आकर्षक ऑफर्स

जर तुम्हाला अभ्यास, ऑफिस किंवा गेमिंगसाठी लॅपटॉप खरेदी करायचा असेल तर तुम्हाला Amazon Prime Day Sale मध्ये अनेक उत्तम डील मिळतील. HP आणि Asus स्टुडंट लॅपटॉपवर 35 ते 50 टक्के सूट मिळत आहे. Acer Predator Helios Neo 16 सारख्या गेमिंग लॅपटॉपवर 40 टक्क्यांहून अधिक सूट मिळत आहे.

सॅमसंग गॅलेक्सी बुक आणि इतर पोर्टेबल ऑफिस लॅपटॉपवरही उत्तम डील तुम्हाल या सेलमध्ये पाहता येतील. यातील अनेक लॅपटॉपवर नो-कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज ऑफर देखील दिल्या जातील.

यासारखा सर्वोत्तम डील मिळवा

सेलमधील सर्व डीलचा लाभ घेण्यासाठी तुम्ही प्राइम मेंबरशिप घेऊ शकता. कार्ड ऑफर्स तपासा, तुम्हाला ICICI किंवा SBI कार्डद्वारे पेमेंट केल्यास अतिरिक्त सूट मिळेल. तसेच Wishlistची यादी आधीच तयार करा, जेणेकरून सेल सुरू होताच तुम्ही लवकर ऑर्डर करू शकाल. लाइटनिंग डीलवर लक्ष ठेवा. हे डील काही मिनिटांत संपतात.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.