कार लोन घ्यायचंय का? 10 लाखाला किती EMI येणार? लोनसाठी कोणती बँक बेस्ट?
तुम्हाला लोनवर कार घ्यायची आहे का? असं असेल तर ही बातमी नक्की वाचा. कार लोन मिळवण्यासाठी तुम्ही कॅनरा बँक या देशातील सरकारी बँकेकडूनही कर्ज घेऊ शकता. कॅनरा बँक आपल्या ग्राहकांना अतिशय चांगल्या व्याजदराने कार लोन देते. कॅनरा बँकेच्या कार लोनच्या डिटेल्सबद्दल चला जाणून घेऊया.

तुम्हाला स्वत:ची कार घ्यायची आहे का? मग चिंता करू नका. स्वत:ची गाडी विकत घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. प्रत्येकाला स्वत:ची गाडी असावी अशी इच्छा असते, पण सामान्य माणसासाठी कार विकत घेणं ही खूप मोठी गोष्ट असते. कार खरेदी करण्यासाठी लाखो रुपये लागतात, ही मोठी रक्कम आहे. कार खरेदी करण्यासाठी आणि कार खरेदीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेकजण बँकेकडून कार लोन घेतात. आज आम्ही तुम्हाला याचविषयीची माहिती देणार आहोत.
देशातील विविध बँकांकडून वेगवेगळ्या व्याजदराने कार लोन दिले जाते. अशावेळी तुम्ही अशी बँक निवडली पाहिजे ज्यात तुम्हाला अतिशय कमी व्याजदराने कार लोन मिळू शकेल. कार लोन मिळवण्यासाठी तुम्ही कॅनरा बँक या देशातील सरकारी बँकेकडूनही कर्ज घेऊ शकता. कॅनरा बँक आपल्या ग्राहकांना अतिशय चांगल्या व्याजदराने कार लोन देते. चला जाणून घेऊया कॅनरा बँकेकडून कार लोनच्या डिटेल्सबद्दल.
कॅनरा बँक कार लोन
कॅनरा बँक आपल्या ग्राहकांना 8.45 टक्क्यांपासून सुरू होणाऱ्या व्याजदराने कार लोन देते. जर तुमचा सिबिल स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला या व्याजदराने कार लोन मिळेल. दुसरीकडे, जर तुमचा सिबिल स्कोअर कमी असेल तर तुम्हाला जास्त व्याजदराने कर्ज घ्यावे लागू शकते.
10 लाख रुपयांच्या कार लोनवर मासिक EMI किती?
तुम्ही कॅनरा बँकेकडून पूर्ण 5 वर्षांसाठी 10 लाख रुपयांचे कार लोन घेत असाल तर तुम्हाला 8.45 टक्के व्याजदराने दरमहा 20,492 रुपये EMI म्हणून भरावे लागतील. संपूर्ण 5 वर्षात तुम्ही पूर्ण 12,29,547 रुपये बँकेला भराल, ज्यात तुमचे व्याज फक्त 2,29,547 रुपये असेल.
कार लोन घेण्यापूर्वी तुम्हाला 20/4/10 फॉर्म्युल्याची माहिती असणे आवश्यक आहे. कार लोन घेण्यापूर्वी जर तुम्ही हा फॉर्म्युला लावला तर तुम्हाला भविष्यात कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. जाणून घेऊया काय आहे 20/4/10 फॉर्म्युला.
‘हे’ सूत्र समजून घ्या
कार लोन घेण्यापूर्वी तुम्हाला 20/4/10 या नियमाची माहिती असायला हवी. येथे 20 म्हणजे 20 टक्के डाऊन पेमेंट, म्हणजेच कार खरेदी करताना तुम्हाला कारच्या एकूण किमतीच्या 20 टक्के इतके डाउन पेमेंट करावे लागेल. 4 म्हणजे 4 वर्षांचा कालावधी, तुम्ही 4 वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी तुमचे कर्ज घेऊ नये. तर 10 म्हणजे पगाराच्या 10 टक्के. तुमचा मासिक EMI तुमच्या पगाराच्या फक्त 10 टक्क्यांपर्यंत असावा.
(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
