AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK Quiz: नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण? या 20 GKच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला देता येतील का?

GK Quiz: जनरल नॉलेज विद्यार्थ्यांना भारताची संस्कृती, विज्ञान, इतिहास आणि मोठ्या कामगिरी समजण्यास मदत करतो. खाली दिलेल्या 20 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला देता येतील का? एकदा पाहून घ्या...

GK Quiz: नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण? या 20 GKच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला देता येतील का?
QuizzImage Credit source: Freepik
| Updated on: Nov 22, 2025 | 2:04 PM
Share

जनरल नॉलेजचे प्रश्न इतिहास, भूगोल, विज्ञान किंवा कोणत्याही विषयाचे असू शकतात. जीके विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहे कारण ते जग, भारत, विज्ञान, इतिहास, खेळ आणि महत्त्वाच्या व्यक्तींबद्दल माहिती देतात. हे स्पर्धा परीक्षा, क्विझ आणि शाळेच्या अभ्यासातही उपयुक्त ठरते. जनरल नॉलेजच्या प्रश्न-उत्तरांमुळे विद्यार्थ्यांची विचार करण्याची क्षमता, समज आणि निर्णय घेण्याची ताकद वाढते. म्हणून आजच्या या लेखात तुमच्यासाठी 20 महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे घेऊन आलो आहोत, जे तुम्हाला तुमचे GK किती चांगले आहे? हे सांगतील

प्रश्न १ – भूदान चळवळ कोणी सुरू केली होती?

उत्तर – भूदान चळवळ विनोबा भावे यांनी सुरू केली होती.

प्रश्न २ – ‘भारताचा मॅनचेस्टर’ कोणाला म्हटले जाते?

उत्तर – भारताचा मॅनचेस्टर अहमदाबादला म्हणतात.

प्रश्न ३ – सापेक्षतावादाचा सिद्धांत कोणी शोधला होता?

उत्तर – सापेक्षतावादाचा सिद्धांत अल्बर्ट आइन्स्टाइन यांनी शोधला होता.

प्रश्न ४ – बल्पचे फिलामेंट कोणत्या धातूचे बनलेले असते?

उत्तर – बल्पचे फिलामेंट टंगस्टनचे बनलेले असते.

प्रश्न ५ – प्रोटॉनचा शोध कोणी लावला होता?

उत्तर – प्रोटॉनचा शोध रदरफर्ड यांनी लावला होता.

प्रश्न ६ – कामगार दिवस कधी साजरा केला जातो?

उत्तर – कामगार दिवस १ मे रोजी साजरा केला जातो.

प्रश्न ७ – ‘चायनामन’ हा शब्द कोणत्या खेळात वापरला जातो?

उत्तर – चायनामन हा शब्द क्रिकेट खेळात वापरला जातो.

प्रश्न ८ – टीपू सुल्तानची राजधानी कोणती होती?

उत्तर – टीपू सुल्तानची राजधानी श्रीरंगपट्टणम होती. टीपू सुल्तानांनी 1782 ते 1799 पर्यंत राज्य केले. ते हैदर अली यांचे पुत्र होते. त्यांनी फ्रेंच लोकांच्या मदतीने आपली सेना मजबूत केली होती.

प्रश्न ९ – ओडिसी हे कोणत्या राज्याचे शास्त्रीय नृत्य आहे?

उत्तर – ओडिसी हे ओडिशा राज्याचे शास्त्रीय नृत्य आहे.

प्रश्न १० – सुंदरलाल बहुगुणा कोणत्या चळवळीशी संबंधित होते?

उत्तर – सुंदरलाल बहुगुणा चिपको चळवळीशी संबंधित होते.

प्रश्न ११ – डेव्हिस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

उत्तर – डेव्हिस कप टेनिस खेळाशी संबंधित आहे.

प्रश्न १२ – ‘अष्टाध्यायी’ कोणी लिहिले?

उत्तर – अष्टाध्यायी पाणिनी यांनी लिहिले होते.

प्रश्न १३ – कथक हे कोणत्या राज्याचे शास्त्रीय नृत्य आहे?

उत्तर – कथक हे उत्तर प्रदेशाचे शास्त्रीय नृत्य आहे.

प्रश्न १४ – बिहारचा शोक कोणत्या नदीला म्हणतात?

उत्तर – बिहारचा शोक कोसी नदीला म्हणतात.

प्रश्न १५ – पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह कोणता आहे?

उत्तर – पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह चंद्र आहे.

प्रश्न १६ – माऊंट एव्हरेस्टवर चढणारी पहिली भारतीय महिला कोण होती?

उत्तर – माऊंट एव्हरेस्टवर चढणारी पहिली भारतीय महिला बछेंद्री पाल होत्या.

प्रश्न १७ – नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण होते?

उत्तर – नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय रवींद्रनाथ टागोर होते.

प्रश्न १८ – भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र कुठे स्थापित केले गेले?

उत्तर – पहिले अणुऊर्जा केंद्र तारापूर येथे स्थापित केले गेले.

प्रश्न १९ – भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात कोणी केली?

उत्तर – भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात लॉर्ड मॅकॉले यांनी केली.

प्रश्न २० – गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला?

उत्तर – गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटन यांनी लावला.

वर दिलेल्या जनरल नॉलेजच्या प्रश्नांची किती उत्तरे तुम्हाला योग्य देता आली ते नक्की सांगा. तसेच तुम्हाच्या ज्ञानात भर टाकण्यासाठी हे प्रश्न आणि उत्तरे नक्कीच मदत करतील.

तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.