FastTag युजरसाठी महत्वाची बातमी, प्रवास न करता कापले जात आहेत पैसे, CEO ने शेअर केला स्क्रीनशॉट
सोशल मीडियावर सुंदरदीप सिंह यांनी या घटनेबद्दल आपले मत मांडत पोस्ट केल्यानंतर अनेक युजरनी प्रतिक्रीया दिली आहे. लोकांना धक्का बसला आहे.
फास्ट टॅगने टोलनाक्यावरील रांगापासून काही प्रमाणात सुटका झालेली आहे. परंतू आता या फास्ट टॅगमध्ये सॅटेलाईट तंत्रज्ञान देखील आणले जात आहेत. मात्र अलिकडे फास्ट टॅगचा वापर करणाऱ्या चांगलाच फटका बसला आहे. त्याचा अनुभव एका कंपनीच्या सीईओने दिला आहे. त्यांनी त्यांच्या कारचा संबंधित राज्यातून प्रवास न होताही पैसे कापल्याचा आलेला मॅसेजचा स्क्रीनशॉट समाजमाध्यमावर शेअर केला आहे. त्यामुळे आधी आहे ती फास्टटॅग यंत्रणेत सुधारणा आणा नंतर सॅटेलाईटने पैसे कापा असे म्हणण्याची वेळ कारचालकांवर आली आहे.
देशातील महामार्गावर टोल भरताना रोकड भरण्यासाठी बराच वेळ वाया जात असतो त्यामुळे सेन्सरद्वारे गेटवर आपोआप बॅंक खात्यातून पैसे कट होण्याची यंत्रणा फास्टटॅगने आणली आहे. त्यामुळे टोलनाक्यांवरील गर्दीवर काही प्रमाणात तरी सुटका झाली आहे. मात्र या आधुनिकतेची किंमत ग्राहकांना भोगावी लागत आहे. देशभरातली युजरनी यासंदर्भात आपले अनुभव शेअर केले आहेत. या अनुभवांना वाचून कोणत्याही तंत्रावर अतिविश्वास ठेवणे किती धोकादायक आहे याचा अनुभव आपल्याला येईल. लोकांनी आपल्या समस्या एकामागोमाग कमेंट करुन मांडलेल्या आहे.
घरात बसलो असताना पैसे कस कापले ?
लुधियाना येथील रहिवासी सुंदरदीप सिंह यांनी एक हैराण करणारा अनुभव सांगितलेला आहे,ते आपल्या घरी आराम करीत होते. तेव्हा त्यांच्या फोनवर पैसे कापल्याचे फास्ट टॅगचे नोटिफिकेशन आल्याने त्यांनी कसला संदेश आलाय म्हणून त्यांनी काळजीपूर्वक वाचला त्यांना धक्का बसला. कारण त्यांच्या बॅंक खात्यातून चक्क 220 रुपये कट झाले होते. विशेष म्हणजे त्यादिवशी आपल्या कारने ते कुठेच गेले नव्हते. या अनुभवाने त्यांना धक्का बसला त्यांनी यासंदर्भात
यंत्रणेत काय गडबड
या सीईओंनी पोस्ट केल्यानंतर या फास्ट टॅगच्या विश्वासार्हतेला तडा गेला आहे. आपण संगणकीय किंवा रेडीओ लहरींवर होणारे ट्राक्झंशनवर डोळे बंद ठेवून निर्धास्त राहू शकत नाही हा धडा या घटनेने मिळाला आहे. जर संबंधित कारने प्रवासच केलेला नाही तर पैसे कसे कापले जाऊ शकतात असा सवाल उपस्थित झाला आहे. म्हणजे यंत्रणेत काही तरी त्रुटी आहे.
लोकांच्या प्रतिक्रीया
गेल्या एक वर्षांपासून आमच्याबाबत हाच अनुभव असल्याचे आमच्या कारचा रजिस्ट्रेशन नंबर कोणा भलत्याच कारशी संलग्न झाला आहे की काय ? अशा संशयाला जागा आहे की सर्व दंडाच्या रकमा आणि फास्टटॅग कपात आमच्या खात्यातून होत आहे. अनेक पोलिस ठाणी तसेच बॅंकेच्या पायऱ्या चढल्यानंतर आम्ही आता आमच्या घरच्या जमा खर्चातील ही एक बुडीत खातं झाले आहे असे सिद्धार्थ गुप्ता यांनी म्हटले आहे. प्रकाश नावाच्या एका युजरने म्हटले आहे की के त्यांचा FASTag आंध्र प्रदेशात कापला गेला. परंतू आमची कार गुजरातमध्ये होती असा दावा त्यांनी केला आहे.