उत्तर सांगा! कोणत्या देशात समोसा खाण्यावर बंदी आहे?
आज आम्ही तुम्हाला सामान्य ज्ञानाचे काही प्रश्न सांगणार आहोत, ज्यांची उत्तरे कुठेही गेलात तरी तशीच राहतील. मग त्या प्रश्नाचं उत्तर आज द्या किंवा उद्या किंवा आणखी वर्षभरानंतर.

मुंबई: जगभरातील कॉमन सब्जेक्ट म्हणजे जनरल नॉलेज. तुम्ही कुठेही गेलात तरी इतिहास नेहमीच सारखाच असतो. आज आम्ही तुम्हाला सामान्य ज्ञानाचे काही प्रश्न सांगणार आहोत, ज्यांची उत्तरे कुठेही गेलात तरी तशीच राहतील. मग त्या प्रश्नाचं उत्तर आज द्या किंवा उद्या किंवा आणखी वर्षभरानंतर. आम्ही तुम्हाला असेच प्रश्न आणि त्यांची उत्तरे सांगत आहोत.
दक्षिण भारताची गंगा म्हणून कोणती नदी ओळखली जाते?
कावेरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.
भारतातील कोणत्या राज्यात रावणाचे मंदिर आहे?
राजस्थानमध्ये रावणाचे मंदिर आहे.
एका व्यक्तीने दिवसभरात किती लिटर पाणी प्यावे?
एका व्यक्तीने दिवसातून 8 लिटर पाणी प्यावे.
भारतातील चहाचे सर्वात मोठे उत्पादक कोणते?
आसाम हे भारतातील सर्वात मोठे चहा उत्पादक राज्य आहे.
कोणत्या प्राण्याचे रक्त हिरवे आहे?
सरड्याचे रक्त हिरव्या रंगाचे असते.
काळे सफरचंद कोणत्या देशात आढळते?
काळे सफरचंद चीनमध्ये आढळते.
कोणते झाड सर्वात जास्त ऑक्सिजन देते?
पिंपळाचे झाड सर्वात जास्त ऑक्सिजन देते.
मानवाने सर्वप्रथम कोणत्या प्राण्याचे दूध प्यायले?
असे म्हटले जाते की मानवाने प्रथम मेंढ्यांचे दूध प्यायले.
जगातील सर्वात शांत देश कोणता आहे?
आइसलँड ला जगातील सर्वात शांत देश म्हटले जाते.
कोणत्या देशात समोसा बंदी आहे आणि का?
आफ्रिकन देश सोमालियामध्ये समोसे खाण्यावर आणि बनवण्यावर बंदी आहे. सोमालियातील अतिरेकी गटांचा असा विश्वास आहे की समोसा त्रिकोणी आकाराचा आहे आणि ख्रिश्चन समुदायाच्या पवित्र चिन्हासारखा आहे. त्यामुळेच या देशात समोस्यावर बंदी घालण्यात आली.
