गुगलच्या नावात 2 नव्हे तर आहेत 10 ‘ओ’, जाणून घ्या
गुगल सर्च करताना तुम्ही कधी गुगलच्या नावाच्या स्पेलिंगकडे लक्ष दिले आहे का? तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की गुगलच्या नावात दोन "ओ" नसून दहा आहेत. तुम्हाला दहा "ओ" कसे दिसू शकतात आणि त्यांचा अर्थ काय आहे हे आजच्या लेखात जाणून घेऊयात.

आज संपूर्ण जगाला माहितीचा प्रंचड साठा उपलब्ध करून देणारा Google हे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा एक भाग बनला आहे. जेव्हा जेव्हा एखाद्या प्रश्नांचे उत्तर येत नाही तेव्हा मनात एकच विचार येतो की, “चला गुगल करूया.” कारण काहीही सर्च करण्यासाठी आपण त्वरीत गुगलची मदत घेतो. उत्तर शोधण्यासाठी गुगल करणे ही एक सामान्य पद्धत बनली आहे. बोलून, टाइपकरून, कोणत्याही भाषेत आपण सर्च करतो व प्रत्येक प्रश्नांचे उत्तर काही सेंकदात मिळते. अशातच तुम्ही कधी गुगलच्या नावाच्या स्पेलिंगकडे लक्ष दिले आहे का?
हे लक्षात घेण्यासारखे आहे, विशेषतः जेव्हा तुम्ही गुगलवर एखादी माहिती शोधता आणि सर्च करता तेव्हा तुम्हाला सर्च रिझल्ट्स दिसते. तर आपण सर्वजण “Google” असे लिहितो, पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की गुगलच्या नावात दोन “ओ” नसून दहा आहेत. तुम्ही असा विचार करत असाल की हे कसे शक्य आहे ? तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण ते अगदी खरे आहे. चला तर मग हे मनोरंजक रहस्य जाणून घेऊया आणि तुम्हाला दहा “ओ” कसे दिसू शकतात आणि त्यांचा अर्थ काय आहे हे देखील जाणून घेऊयात.
अशा प्रकारे तुम्हाला दहा O दिसतील
जेव्हा तुम्ही माहितीसाठी किंवा प्रश्नाची उत्तरे शोधण्यासाठी गुगलवर जाऊन सर्च करता, तेव्हा तुम्हाला सर्च रिजल्ट एकच पेज दिसते. आता तुम्ही वापरत असलेले मोबाईल किंवा लॅपटॉप, टॅबच्या स्क्रिनकडे बारकाईने लक्ष द्यावे लागेल. कारण सर्च केलेल्या पेजच्या खाली स्क्रोल करा आणि सर्वात खाली असलेल्या गुगल स्पेलिंगकडे लक्ष देऊन तुम्हाला लक्षात येईल की गुगल या नावात दहा “ओ” आहेत.

गुगल नाव: दहा ओ चा अर्थ काय?
हे दहा O म्हणजे सर्च रिजल्टची दहा पेज. दहा 10 म्हणजे तुम्ही शोधत असलेल्या माहितीचे दहा पेज आहेत जे सहजपणे पाहू शकता. जर तुम्हाला अकरा किंवा त्याहून अधिक पेज सर्च रिजल्टची पाहायची असतील, तर तुम्हाला Nextवर क्लिक करावे लागेल .
