वाहत्या नदीत कसे बांधतात पूलाचे खांब? जाणून घ्या या ट्रिकबद्दल सर्व माहिती

पिलर वाले पूल बांधण्यापूर्वी सर्वप्रथम पाण्याचे खोली, पाण्याच्या प्रवाहाची गती, पाण्याखालील मातीची गुणवत्ता, पुलावरील भार आणि पुल तयार झाल्यानंतर गाड्यांचा भार यावर सखोल संशोधन केले जाते. (How to build bridge pillars in a flowing river, know the which trick use)

वाहत्या नदीत कसे बांधतात पूलाचे खांब? जाणून घ्या या ट्रिकबद्दल सर्व माहिती
वाहत्या नदीत कसे बांधतात पूलाचे खांब? जाणून घ्या या ट्रिकबद्दल सर्व माहिती

नवी दिल्ली : नदी किंवा समुद्राच्या मध्यभागी तुम्ही पूल बांधलेला पाहिला असेल. नद्यांवरील पुलांना खांबांचा आधार असतो. हे खांब पाहिल्यानंतर तुमच्या मनात असा प्रश्न पडला असेल की हे खांब नदीच्या प्रवाहात कसे बांधले गेले असतील आणि पूल बांधण्यासाठी कोणत्या पद्धती वापरल्या गेल्या असतील. नदीवर बांधलेले पूल अनेक प्रकारचे असतात. नदीवर बीम ब्रिज, सस्पेंशन ब्रिज, कमान ब्रिज बांधले जातात. पिलर वाले पूल बांधण्यापूर्वी सर्वप्रथम पाण्याचे खोली, पाण्याच्या प्रवाहाची गती, पाण्याखालील मातीची गुणवत्ता, पुलावरील भार आणि पुल तयार झाल्यानंतर गाड्यांचा भार यावर सखोल संशोधन केले जाते. या संशोधनानंतरच पूल बांधण्याचे काम सुरू होते. (How to build bridge pillars in a flowing river, know the which trick use)

कसा टाकतात पुलाचा पाया

पुलामध्ये पायाही बनविला जातो आणि संपूर्ण प्रकल्पाच्या आधारे पायाबाबतही आधीच प्लान बनविला जातो. तसे, पाण्याच्या मध्यभागी घातलेल्या पायाला कॉफरडॅम(Cofferdam) म्हणतात. हे कॉफर डॅम एका प्रकारे ड्रमसारखे असतात, जे क्रेनद्वारे पाण्याच्या मध्यभागी स्थापित केले जातात. हे कॉफर डॅम स्टीलच्या मोठ्या मोठ्या प्लेटने बनविले जाते. हा कॉफर डॅम गोल किंवा चौरस असू शकते आणि ते पुलाचे बांधकाम, नदी इत्यादींवर अवलंबून असते.

कॉफरडॅमचा होतो वापर

सोप्या भाषेत सांगायचे तर ते ड्रमसारखे असते. हे खूप मजबूत आणि स्टीलने बनलेले असते. हे पाण्याच्या मध्यभागी ठेवले जाते, जेणेकरुन पाणी त्याच्या आसपास राहत नाही. जेव्हा ते पाण्याने भरले जाते तेव्हा ते बाहेर काढले जाते आणि या कॉफर डॅममध्ये, खाली माती दिसू लागते आणि तेथे खांब बनविण्याचे काम सुरू होते. याच्या आत जाऊन अभियंते काम करतात आणि मजबूत पिलर बनविला जातो. मग खांब बांधल्यानंतर पुलाचे काम सुरू होते.

मात्र, पाणी खोल असताना या कॉफर डॅमच्या माध्यमातून पूल बांधता येणार नाही. जेथे पाणी जास्त खोल असते तेथे काही संशोधन करुन जमिनीखाली जेथे माती चांगली असेल आणि खांब तयार करण्यासाठी जमीन योग्य असेल तेथे काही पॉईंट बनवले जातात. यानंतर तेथे खड्डे तयार केले जातात आणि वरुन पुष्कळ पाईप्स खाली टाकले जातात आणि पाणी बाहेर काढले जाते. मग या पाईपमध्ये सिमेंट वगैरे भरले जातात. असे अनेक पाईप्स एकत्र करुन पिलर बनवले जातात.

पूल कसा तयार होतो?

पूल बांधताना, अर्ध्याहून अधिक काम दुसर्‍या जागेवर केले जाते, जिथे पुलाचे ब्लॉक बनवले जातात. असे केल्यावर दोन्ही खांबांदरम्यान ब्लॉक सेट करुन पूल बनविला जातो. तसे, बरेच विना पिलरवाले पूलही बांधले जातात, जे वेगळ्या प्रकारे बांधले जातात. (How to build bridge pillars in a flowing river, know the which trick use)

इतर बातम्या

UEFA Champions League Final : चेल्सी संघ 1-0 च्या फरकाने विजयी, दुसऱ्यांदा कोरले चषकावर नाव

Twitter कडून जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीवर अटी लादण्याचा प्रयत्न; केंद्र सरकारचा पलटवार

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI