देशातील सर्वात महागड्या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये लग्नाचा खर्च किती येतो? खाण्यापिण्यापासून ते डेकोरेशनपर्यंत जाणून घ्या
भारतातील पंचतारांकित हॉटेलांमधील लग्नाचा खर्च हा केवळ एक सोहळा नसून तो एक अविस्मरणीय अनुभव आहे. ताज, ओबेरॉय, लीला सारख्या महागड्या हॉटेल्समध्ये डेस्टिनेशन वेडिंगचा खर्च पाहुण्यांची संख्या, लग्नाचे दिवस आणि सेवांवर अवलंबून असतो. खाण्यापिण्यापासून ते डेकोरेशनपर्यंत, लहान समारंभासाठी 30 लाखांपासून ते भव्य शाही सोहळ्यासाठी 2 कोटींपर्यंत बजेट लागू शकते.

भारतात लग्न म्हणजे केवळ एक रितीरिवाज नाहीय, तर तो एक उत्सवच असतो. अत्यंत जल्लोषात आणि उत्साहात लग्न सोहळा आयोजित केला जातो. आयुष्यातील हा सर्वात संस्मरणीय क्षण असल्याने या आठवणी कायम ताज्या ठेवण्यासाठी प्रत्येकाचा प्रयत्न असतो. एखाद्या बॉलिवूडमधील लग्नासारखा किंवा शाही विवाह सोहळ्यासारखा आपल्या लग्नाचा थाट असावा असं प्रत्येकाला वाटत असतं. काही लोक तर हटके विवाह करण्यावर भर देतात. डेस्टिनेशन वेडिंग हा त्यातलाच एक प्रकार आहे. तर काही लोकांना पंचतारांकित हॉटेल्स, पॅलेस किंवा लग्जरी रिसॉर्ट्समध्ये लग्न करण्याची अनावर इच्छा असते आणि ते पूर्णही करतात.
ताज, ओबेरॉय, लीला आणि आयटीसी सारखे पंचतारांकित हॉटेल हे देशातील सर्वात मोठे हॉटेल्स आहेत. या हॉटेलात जर लग्न करायचं असेल तर किती खर्च येत असेल असा प्रत्येकाला प्रश्न पडतो. या पंतचारांकित हॉटेलातील लग्नाचा किती खर्च येतो यावरच टाकलेला हा प्रकाश.
पंचतारांकित हॉटेलातील लग्न महागडी का असतात?
पंचतारांकित हॉटेल याचा अर्थ केवळ चांगला रुम असा नाहीये. तर यात महाराजा स्टाईल इंटिरिअर, आलिशान हॉल आणि आऊटडोअर लॉन, रुचकर जेवण, प्रोफेशनल मॅनेजमेंट, प्रीमियम सजावट आणि पाहुण्यांसाठी लग्झरी एक्सपिरिअन्स आदींचा यात समावेश होतो. या सुविधांमुळे लग्न करणं एक इव्हेंट नव्हे तर एक एक्सपिरिअन्स बनतो. पंचतारांकित हॉटेलात लग्न करण्याची किंमत केवळ हॉटेलातील रुम वा हॉलवर निर्भर राहत नाही. अनेक महत्त्वाच्या आवश्यक गोष्टी त्यासाठी महत्त्वाच्या असतात.
ब्रँड इमेज हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग असतो. ताज, ओबेरॉय, लीला आणि आयटीसी हे फेमस ब्रँड आहेत आणि महागडेही आहेत. छोटे आणि नवीन हॉटेल स्वस्त असू शकतात. याशिवाय पाहुण्यांची संख्या, जेवढे अधिक पाहुणे असतील, तेवढ्या खोल्या, जेवण आणि कार्यक्रमाचा खर्च वाढतो. तसेच लग्नाची वेळ, एका दिवसाचं लग्न छोटं आणि स्वस्त असतं. तर दोन तीन दिवसांचं मोठं सेलिब्रेशन अधिक खर्चिक असतं. तसेच वातावरण आणि सीजन हे सुद्धा महत्त्वाचं असतं. पीक सीजनमध्ये हॉटेल महागडे असतात. तर ऑफ सीजनमध्ये किंमत कमी असते. तुम्हाला थीमवर आधारीत सजावट, डिझायनर कपडे आणि विशेष मनोरंजन हवं असेल तर खर्च अधिक वाढतो.
देशातील महागड्या फाइव्ह स्टार हॉटेलातील खर्च किती?
1) ओबेरॉय उदयविलास, उदयपूर – उदयपूर तलावाच्या किनाऱ्यावर हे हॉटेल आहे. शाही महालासारखी वास्तू कला, विशाल अंगण, नाव लँडिंग करण्याची सुविधा या हॉटेलात आहे. या हॉटेलातील लग्नाचा खर्च 80 लाखापासून ते 1.5 कोटी रुपयांपर्यत आहे.
2) ताज फलकनुमा पॅलेस – ताज फलकनुमा पॅलेस हा हैद्राबादमधील एक शाही महाल आहे. जुन्या निझामी राजवटीची भव्यता आणि आधुनिक सुविधांच्या संगमाने नटलेलं हे हॉटेल आहे. या हॉटेलातील लग्नाचा खर्च 90 लाख ते 2 कोटीपर्यंतचा आहे.
3) लीला पॅलेस – जयपूर आणि उदयपूरमध्ये लीला पॅलेस आहे. या हॉटेलात मुगल गुंबद आणि हाताने बनवलेली कारागिरी पाहायला मिळते. या हॉटेलातील लग्नाचा खर्च 60 लाख ते 90 लाखापर्यंत आहे.
4) आयटीसी ग्रँड – आयटीसी ग्रँड भारत हे हॉटेल गुरुग्राममध्ये आहे. इंडो-युरोपिय वास्तुकला आणि हिरव्यागार लॉनसाठी हे हॉटेल ओळखलं जातं. या हॉटेलातील लग्नाचा खर्च 50 ते 80 लाख रुपये एवढा आहे.
5) वेस्टिनेशन – गोवा आणि मुंबईत वेस्टिनेशन हॉटेल आहे. गोवा आणि मुंबईच्या समुद्र किनारी हे हॉटेल आहे. आधुनिक आणि आलिशान वेडिंग स्थळ म्हणून हे हॉटेल प्रसिद्ध आहे. या हॉटेलातील लग्नाचा खर्च 40 ते 70 लाख रुपयांच्या घरात जातो.
सरासरी खर्च किती?
भारतात पंचतारांकित हॉटेलातील खर्च तुमच्या हौशीवर अवलंबून आहे. लग्न सोहळा किती दिवस आहे, तुम्ही लग्न कोणत्या पंचतारांकित हॉटेलात करणार आणि शाही एक्सपिरिअन्स हवाय का? या सर्व गोष्टींवर तुमच्या लग्नाचा खर्च अवलंबून आहे. जर तुमचा लग्न सोहळा छोटा असेल आणि त्यात 100 ते 150 पाहुणे सहभागी असतील, तर त्याचा खर्च साधारणपणे 30 ते 50 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतो. मध्यम आकाराच्या लग्नासाठी, ज्यात 200 ते 300 पाहुणे असतात, अंदाजे खर्च 50 ते 80 लाख रुपयांपर्यंत होतो. तर भव्य किंवा शाही लग्न समारंभात 400 पेक्षा जास्त पाहुणे असतील, तर एकूण खर्च 1 ते 2 कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकतो.
