मुलींच्या शर्टला डाव्या बाजूला का असतात बटणं? जाणून घ्या यामागील इंटरेस्टिंग कारण!!

Girls Shirt Button Facts: तुम्ही कधी लक्षपूर्वक पाहिले आहे का की मुलींच्या शर्टाची बटणं ही उजव्या बाजूला नाही तर डाव्या बाजूला असतात ,चला तर मग जाणून घेऊया या मागचे कारण..

मुलींच्या शर्टला डाव्या बाजूला का असतात बटणं? जाणून घ्या यामागील इंटरेस्टिंग कारण!!
मुलींच्या शर्टच्या बटणाबद्दलचे इंटरेस्टिंग फॅक्ट्स

सध्याच्या काळात आपण सर्वत्र पाहतो की स्त्री आणि पुरूष यांच्या फॅशनमध्ये तसे फारसे अंतर राहिलेले नाही. दोघांचेही काही कपडे सोडून बरेच कपडे एकसारखे असतात. ज्यामध्ये शर्ट सगळ्यात महत्त्वाचा आहे, शर्ट हल्लीच नाही तर अनेक वर्षांपासून स्त्री आणि पुरुष दोघेही त्याचा वापर करतात. तुम्हीसुद्धा पाहिले असेल की शर्ट स्त्री आणि पुरुष दोघेही परिधान करतात. मात्र तुम्ही कधी लक्षपूर्वक पाहिले आहे का की, स्त्रियांच्या शर्टची बटणं डाव्या बाजूस आणि पुरुषांच्या शर्टची बटणं उजव्या बाजूला असतात. चला तर मग जाणून घेऊया असे का असते..

डाव्या बाजूला का असतात बटणं?

तसे पाहायला गेले तर त्याचे परफेक्ट आणि अचूक कारण सांगणे अवघड आहे. मात्र एक गोष्ट खरी आहे हे अनेक वर्षांपासून चालत आलेले आहे. रीडर्स डायजेस्टच्या एका रिपोर्टनुसार, स्त्रियांच्या शर्टचे बटणं डाव्या बाजूला असण्यामागे अनेक प्रकारच्या थेरिज आहेत आणि त्या थेरिजच्या हिशोबाने आपण अंदाज लावू शकतो की स्त्रियांच्या शर्टाची बटणं दुसऱ्या बाजूने का लावले जातात.

रिपोर्टनुसार 13 व्या शतकामध्ये शर्ट तेच लोक अफोर्ड करू शकत होते ज्यांच्याकडे अधिक पैसे होते. अन्य लोक तर असेल त्याच्यावर समाधान मानत होते. त्याकाळी ज्या व्यक्ती शर्ट अफोर्ड करू शकत होत्या त्या महिलांना कपडे दुसऱ्या (दासी आणि नोकरानी) महिला परिधान करून देत असत. त्यामुळे दुसऱ्या व्यक्ती कपडे परिधान करायला मदत करत असल्यामुळे त्यांना ते सोपे वाटत असे. तर दुसरीकडे पुरुष स्वतः स्वतःचे कपडे घालत असत आणि उजवा हाताचा अधिकाधिक वापर करत असल्यामुळे असे केले गेले होते.

गार्जियनच्या एका रिपोर्टमध्ये फॅशन इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार त्याकाळात दुसरे कपडे घालायला मदत करत असल्यामुळे बटण डाव्या बाजूला ठेवण्यात आले होते. याशिवाय दुसर्‍या इतिहासकारांचे म्हणणे असे आहे की याच्या मागचे कारण असू शकते की स्त्रीया मुलांना स्तनपान करावे लागत असे, आणि अधिकाधीक स्त्रीया डाव्या बाजूला अधिक ब्रेस्टफीडिंग करतात. त्यामुळे बटण डाव्या बाजूस ठेवले होते..

याशिवाय एक थेअरी ही सुद्धा आहे की पुरुष अनेकदा युद्धा मध्ये सहभाग घेत होते आणि डाव्या बाजूला गण किंवा तलवार ठेवत असत, त्या हिशोबाने कपडे डिझाइन केले जात होते आणि या कारणामुळे पुरुषांना सहज व्हावे यासाठी उजव्या बाजूला बटण असल्याचे आपल्याला पाहायला मिळत.

याबाबत अनेक थेअरी आहेत की उजव्या बाजूस बटन असल्यामुळे सहज त्याचा वापर करता येतो आणि पुरुष प्रधान समाज असल्यामुळे पुरुषांच्या शर्टाची बटणं या बाजूला देण्यात आले आहेत, याशिवाय महिला आणि पुरुषांचे कपडे भलेही एकसारखे असोत. मात्र अंतर दाखवण्यासाठी हा बदल संभव आहे यासाठी महिलांच्या कपड्यांमध्ये असणाऱ्या बटणांची साईड बदलली असावी..

संबंधित बातम्या –

कधी विचार केलंय? एवढे वजनदार असूनही ढग पडत का नाही बुवा खाली? कारण इंटरेस्टिंग आहे!

भारतातील 11 महत्वाचे कामगार कायदे, जे प्रत्येकाला माहीत असणे गरजेचे आहेत…

मानवी शरीराचे दोन अवयव, अखेरच्या श्वासापर्यंत वाढतच राहतात, कारण अत्यंत इंटरेस्टिंग


Published On - 7:47 pm, Tue, 11 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI