नारळ आणि… विमानातून या वस्तू चुकूनही नेऊ नका, नाही तर… नियम बदलले; लिस्ट जारी
नवीन विमान प्रवास नियमांनुसार, अनेक घरगुती वस्तू आता विमानात घेऊन जाण्यास बंदी आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाने ट्विटरवर याची माहिती दिली आहे. यात नारळ, काही धारदार वस्तू, ज्वलनशील पदार्थ आणि इतर अनेक वस्तूंचा समावेश आहे. या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, अन्यथा प्रवाशांना त्रास होऊ शकतो. हे नियम सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत.

विमानातून प्रवास करत असाल तर ही बातमी आवश्यक वाचा. नाही तर अज्ञानामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. फ्लाइटमध्ये लगेज, बॅग आदी सामानांना घेऊन जाण्याबाबतच्या नियमात बदल झाल आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाने ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. तुम्ही नेहमी किंवा कधी तरी विमानातून प्रवास करत असाल तर ही बातमी वाचली पाहिजे. नियमात काय काय बदल झाला याचीच माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत. त्यामुळे तुम्हाला सावध राहता येईल.
नागरी उड्डाण मंत्रालयाने ट्विटरवरून फ्लाईटमधून सामान नेण्याबाबतच्या नव्या नियमांची माहिती दिली आहे. नागरी उड्डाण मंत्रालय सर्व प्रवाशांना सांगू इच्छिते की, सुरक्षा नियमाच्या कारणास्तव बॅगेजमधून घरगुती सामान घेऊन जाण्यास मनाई आहे. हा प्रतिबंध एका व्यापक वर्गीकरण प्रणालीच्या अंतर्गत करण्यात आला आहे. आठ श्रेणींमध्ये तो विभागला आहे. शस्त्र किंवा प्रतिकृती (Weapons and Replicas), विस्फोटक (Dangerous Substances), खतरनाक पदार्थ (Dangerous Articles), उपकरण (Tools), इलेक्ट्रॉनिक्स आयटम, घरगुती सामान (Household Items) आणि खेळाचं साहित्य विमानातून नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. ही सूचना विशेषता घरगुती सामान श्रेणीसाठी आहे. प्रवाशांनी नियमांचं पालन करावं. ज्या वस्तूंना बंदी घालण्यात आली आहे, त्या विमानातून नेऊ नये, असंही या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
अनेकांना माहीत नाही…
विमानातून प्रवास करताना चाकू, मोबाईलची बॅटरीसारखे धारदार वस्तू आणि लायटर सारखे ज्वलनशील पदार्थ सोबत ठेवण्यास बंदी आहे, हे आपल्याला माहीत आहे. पण या वस्तूंच्या खेरीज विमानातून नारळ नेण्यासही बंदी आहे हे अनेकांना माहीत नाही.
या वस्तूंनाही बंदी
नागरी उड्डाण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, फ्लाइटमध्ये केबिन बॅगेजमध्ये काही वस्तू घेऊन प्रवाशी प्रवास करू शकत नाही. त्यात, कैची, रस्सी, सेलो, मेजरिंग व मास्किंग टेप, नाइट स्टिक, रेजर टाइप ब्लेड, छत्री, विणकामाच्या सूया, पंपासह एअर गादी, मिरचीचे लोणचे, माचिस, बाटलीचे बूच काढण्याचा स्क्रू, सिगार कटर, नारळ, किसलेलं नारळ, बर्फ फोडण्याचे हत्यार आदी वस्तूंचा यात समावेश आहेत. या वस्तू प्रवाशांना विमानातून नेता येणार नाही.
The Ministry of Civil Aviation informs all passengers that certain household items are prohibited in cabin baggage due to security regulations.
These restrictions fall under a comprehensive classification system that divides items into eight categories: Weapons and Replicas,… pic.twitter.com/eLcXaWBsZJ
— MoCA_GoI (@MoCA_GoI) May 27, 2025
नारळ का नेऊ शकत नाही?
विमानतळावर लिक्विड सामान घेऊन जाण्याचे कठोर नियम बनवण्यात आले आहेत. नारळात लिक्विड असतं. त्यामुळे नारळ सोबत नेता येत नाही. नारळ आतून नरम आणि बाहेरून टणक असतं. पण विमानाने अवकाशात उड्डाण घेतल्यावर हवेच्या दाबात बदल होतो. त्यामुळे नारळ फुटू शकते. तसेच नारळ हा ज्वलनशील असतो, कारण त्यात सर्वाधिक तेल असतं. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव विमानातून नारळ घेऊन जाण्यास परवानगी देण्यात येत नाही.
नारळ कसा न्याल?
दरम्यान, नारळाचे छोटे छोटे तुकडे करून चेक इन बॅगेत ठेवले जाऊ शकतात, असं एअरलाइन्सचं म्हणणं आहे. नारळाशिवाय मासे, मांस, मसाले, मिरची आणि लोणचं सारखं तीव्र गंध असलेले खाद्यपदार्थ केबिन बॅगेतून नेण्यास परवानगी नाहीये.
