जगाला रम पाजणारा स्वतः होता चहाचा शौकीन, नावही अगदी हटके
भारतात रम म्हटलं की सर्वप्रथम डोळ्यासमोर येतं ते नाव म्हणजे ओल्ड मॉन्क (Old Monk). जगाला बेहतरीन रम पाजणारा हा ब्रँड तयार करणारे कपिल मोहन मात्र आयुष्यभर दारूपासून दूर राहिले आणि चहाचे शौकीन होते. पण ओल्ड मॉन्कचं नाव कसं पडलं आणि ती इतकी प्रसिद्ध कशी झाली? वाचा संपूर्ण इतिहास!

भारतामध्ये रम म्हटलं की सर्वप्रथम डोळ्यासमोर येतं ते नाव म्हणजे ओल्ड मॉन्क (Old Monk). सात दशकांहून अधिक काळ हा ब्रँड केवळ रम नव्हे तर तिचा पर्याय ठरला आहे. आश्चर्य म्हणजे, जगभर रम पाजणारा हा ब्रँड उभा करणारे कपिल मोहन स्वतः आयुष्यभर दारूपासून दूर राहिले आणि चहाचे शौकीन म्हणून ओळखले गेले.
कधी झाली सुरूवात ?
ओल्ड मॉन्कची सुरूवात 1954 मध्ये झाली. त्यानंतर इतक्या वर्षांत बाजारात अनेक रम्स आल्या, पण ओल्ड मॉन्कचा स्वाद, त्याची रेसिपी आणि अगदी बाटलीचं डिझाइनही आजपर्यंत न बदलल्याने ग्राहकांची नाळ या ब्रँडशी जुळून राहिली आहे. ही रम तिच्या रिच आणि कॉम्प्लेक्स स्वादासाठी ओळखली जाते, ज्यात फळं, मसाले आणि लाकडाचा स्पर्श जाणवतो.
‘ओल्ड मॉन्क’ नाव कसं पडलं ?
या नावामागेही एक गूढ गोष्ट आहे. असा समज आहे की, रम तयार करण्यासाठी वापरले जाणारे लाकडी बॅरल्स जुन्या मठांत (Monastery) ठेवले जात, त्यामुळे त्यांना ‘ओल्ड मॉन्क’ म्हटले जाई. दुसरी समजूत अशी आहे की, या रमचा गंभीर, जटिल स्वाद ‘जुन्या साधू’सारखा आहे, म्हणून हे नाव देण्यात आले. मात्र, या नावाचा नेमका उगम आजही एक गूढ आहे.
जगाला रम दिली, पण स्वतः चहा प्यायले
ओल्ड मॉन्कचा सुवर्णकाळ घडवणारे कपिल मोहन हे स्वतः टीटोटलर होते. त्यांनी आयुष्यात कधीच दारूला हात लावला नाही. त्यांना चहा पिण्याचा छंद होता. सैन्यातून रिटायर झाल्यानंतर त्यांनी भावाच्या निधनानंतर मोहन मीकिन लिमिटेडची सूत्रं हाती घेतली आणि ओल्ड मॉन्कला भारतापुरतंच नव्हे तर जागतिक पातळीवर लोकप्रिय केलं.
आजादीनंतरचा प्रवास आणि यश
ओल्ड मॉन्कची सुरुवात एम.एन. मोहन यांनी केली होती. 1885 मध्ये जनरल डायरच्या वडिलांनी हिमाचलमध्ये सुरू केलेली दारूची फॅक्टरी स्वातंत्र्यानंतर मोहन कुटुंबाने विकत घेतली आणि त्यातून मोहन मीकिनचा प्रवास सुरू झाला. 2000 पर्यंत ओल्ड मॉन्क जगातील सर्वाधिक विकली जाणारी डार्क रम ठरली होती. एकेकाळी दररोज 80 लाख बाटल्या विकल्या जात होत्या.
प्रचाराशिवाय गाजलेला ब्रँड
विशेष म्हणजे, या ब्रँडने कधीच जाहिरात केली नाही. “लोकांनी प्यावं आणि इतरांना सांगावं” ही कपिल मोहन यांची नीती होती. त्यामुळे ओल्ड मॉन्कची लोकप्रियता तोंडी प्रसिद्धीवरच उभी राहिली.
50 देशांमध्ये चाहत्यांचा लळा
भारताबरोबरच अमेरिका, ब्रिटन, रशिया, जर्मनी, जपान, न्यूझीलंड, केन्या, यूएई अशा 50 देशांमध्ये ओल्ड मॉन्कची मागणी आहे. चाहत्यांना ती ‘सर्वोत्कृष्ट ड्रिंक’ वाटते आणि ती हँगओव्हर कमी देते, म्हणून ती वारंवार प्यायची इच्छा होते.
आजही रमचा पर्याय
आज जरी बाजारात स्पर्धक असले तरी ओल्ड मॉन्कचं क्लासिक मिक्स्ड रम व्हर्जन अजूनही सर्वाधिक विकलं जातं. सुप्रीम आणि गोल्ड रिजर्व सारखी 12 वर्षे जुनी प्रीमियम व्हर्जन्स देखील उपलब्ध आहेत. पण सात दशकांपासून न बदललेला तिचा मूळ स्वादच ब्रँडची खरी ताकद आहे.
