AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK Quiz: भारतात पाकिस्तान? या राज्यात Pakistan नावाचे गाव… बहुसंख्य हिंदू असताना या खेड्याला का पडले हे नाव?

Pakistan Name Village in India: भारत आणि पाकिस्तानचे हाडवैर जगाला माहिती आहे. पाकिस्तान हा भारतात दहशतवादी कारवाया घडवून आणत असल्याने हा देश भारताचा विरोधक मानल्या जातो. पण याच देशाच्या नावाने या राज्यात एक गाव आहे, हे तुम्हाला माहिती आहे का?

GK Quiz: भारतात पाकिस्तान? या राज्यात Pakistan नावाचे गाव... बहुसंख्य हिंदू असताना या खेड्याला का पडले हे नाव?
भारतात पाकिस्तान?Image Credit source: एजन्सी
| Updated on: May 23, 2026 | 3:09 PM
Share

Pakistan Name Village in India:  देशात पाकिस्तान नावाचे गाव  आहे हे वाचून अनेकांना  धक्का बसला असेल. पण  या राज्यात पाकिस्तान नावाचे गाव आहे. पाकिस्तानशी भारताचे हाडवैर जगजाहीर आहे. धर्माच्या नावावर पाकिस्तान भारतातून फाळणीनंतर स्वतंत्र झाला.  तर भारतात  या कट्टर हाडवैऱ्याचे नाव असलेले गाव आहे.  विशेष म्हणजे या पाकिस्तान नावाच्या गावात मुस्लिम नाही तर हिंदू राहतात. या गावाच्या नावावरून सातत्याने टीका होऊ लागल्यानंतर लोकांनी गावाच्या नावाची पाटी बदलली. पण प्रशासकीय स्तरावर या गावाची ओळख पाकिस्तान अशीच आहे.

बिहारमध्ये पाकिस्तान नावाचे गाव

बिहार राज्यातील पुर्णिया जिल्ह्यात श्रीनगर हा एक भाग आहे. त्यात सिंधीया ही पंचायत समिती आहे. पुर्णिया या शहरापासून 30 किलोमीटरवर सिंधीया आहे. त्यातंर्गत पाकिस्तान नावाचे गाव आहे. या गावात एकही मुस्लिम कुटुंब नसताना या गावाला पाकिस्तान हे नाव कसं पडलं हा एक रोचक इतिहास आहे. हिंदू-मुस्लिमांमधील सद्भावाची झालर त्यामागे आहे. इथे हिंदू आदिवासी राहतात.

का पडेल पाकिस्तान हे नाव?

1947 साली भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली. तेव्हा भारतातील अनेक भागातून मुस्लिम कुटुंब पाकिस्तानमध्ये स्थलांतरीत झाले. बिहारमधील या गावातील मुस्लिम कुटुंब पूर्व पाकिस्तानात म्हणजे आजच्या बांगलादेशात स्थलांतरीत झाली. त्यांची आठवण म्हणून या गावातील हिंदूंनी गावाचे नाव पाकिस्तान असे ठेवल्याचे म्हटले जाते.

भारत आणि पाकिस्तानमध्ये तीन युद्ध झाली आहेत. या युद्धानंतर या गावाचं नाव स्थानिकांना सातत्याने खटकत आले आहे. या गावातील मुलांना लग्नासाठीही मोठी अडचण येऊ लागली. तर मुलींची लग्नी जुळवतानाही या नावामुळे मोठी अडचण येत होती. या आदिवासी पाड्याकडे प्रशासनाने कायम दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येतो. या गावाकडं जाण्याचा पक्का रस्ताही नसल्याने गावकरी नाराज होते. अखेर त्यांनी गावाचे नाव बदलण्याचे ठरवले. गावकऱ्यांनी पाकिस्तान नावाची पाटी काढली आणि बिरसानगर असे नाव दिले. या गावात संथाल आदिवासी राहतात. या गावाचे नाव बिरसानगर असे करण्यात आले असले तरी अनेक गावकऱ्यांच्या आधार कार्डवर पाकिस्तान असेच नाव असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. गावकऱ्यांनी सरकार दरबारी पाकिस्तान ही ओळख पुसण्याची मागणी केली आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ