स्कोरिंग आणि नॉन स्कोरिंग विषयात काय फरक? जाणून घ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त माहिती
जर तुम्ही एखादा कोर्स किंवा स्पर्धा परीक्षा (जसे UPSC) देण्यासाठी विषय निवडत असाल, तर स्कोरिंग आणि नॉन-स्कोरिंग या फरकाची नीट माहिती असणं गरजेचं आहे. यामुळे तुम्ही अभ्यास योग्य पद्धतीनं करू शकता आणि चांगले गुण मिळवू शकता. तुमच्या अभ्यासपद्धतीनुसार आणि स्वभावानुसार योग्य विषय निवडा आणि यश मिळवा.

शालेय शिक्षणात वेळोवेळी अनेक बदल होत असतात. नव्या शैक्षणिक धोरणामुळे अजूनही काही गोष्टी बदलतील. पण एक गोष्ट कायम आहे की अभ्यासातले विषय दोन प्रकारात येतात स्कोरिंग आणि नॉन-स्कोरिंग. तुम्ही कधी ना कधी ऐकलंच असेल, “हा विषय स्कोरिंग आहे” किंवा “तो विषय स्कोरिंग नाही”. हे विशेषतः दहावी नंतर स्ट्रीम निवडताना खूप महत्त्वाचं ठरतं.
चला, हे दोन्ही प्रकार अगदी साध्या भाषेत समजून घेऊया.
स्कोरिंग विषय म्हणजे काय?
ज्या विषयात कमी मेहनतीत चांगले मार्क्स मिळवता येतात, तो विषय स्कोरिंग मानला जातो.
या विषयांमध्ये उत्तर निश्चित असतात. तुम्ही जर योग्य उत्तर दिलं, तर पूर्ण मार्क्स मिळण्याची शक्यता जास्त असते. या विषयांचा अभ्यास ठरावीक पद्धतीनं केला की मार्क्स नक्की मिळतात.
वैशिष्ट्यं:
1. अभ्यासक्रम ठरलेला आणि मर्यादित असतो.
2. MCQ किंवा थोडक्यांत उत्तर देणारे प्रश्न असतात.
3. उत्तरं चुकीची होण्याची शक्यता कमी असते.
4. रिविजन आणि सरावानं चांगले गुण मिळवता येतात.
उदाहरणं:
गणित: प्रत्येक प्रश्नाचं एक ठराविक उत्तर असतं. उदा. 5x + 3 = 18 तर x = 3.
विज्ञान: सायन्समधील नियम, सूत्रं हे लक्षात ठेवून लिहिता येतात. उदा. पाण्याचं तापमान = 100°C.
भूगोल/इतिहास: ठराविक तारखा, घटना लक्षात ठेवून उत्तरं लिहिता येतात.
कंप्युटर सायन्स: कोडिंग आणि प्रोग्रामिंगमध्ये योग्य कोड लिहिलं की उत्तर बरोबर येतं.
नॉन-स्कोरिंग विषय म्हणजे काय?
ज्या विषयात उत्तर ठराविक नसतं, विचार, लेखनशैली आणि प्रेझेंटेशन यावर गुण मिळतात, ते नॉन-स्कोरिंग विषय असतात.
या विषयात गुण मिळवणं थोडं कठीण असतं कारण शिक्षकांच्या समजुतीवर गुण अवलंबून असतात.
वैशिष्ट्यं:
1. उत्तरं लांब आणि विचारपूर्वक लिहावी लागतात.
2. एकच उत्तर प्रत्येकासाठी वेगळं असू शकतं.
3. अभ्यासक्रम डीटेलमध्ये असतो.
4. विचार करण्याची क्षमता, भाषा आणि सादरीकरण महत्त्वाचं असतं.
उदाहरणं:
इंग्रजी साहित्य: निबंध, कविता, नाटके उत्तरं स्पष्ट नियमांवर नसतात. उदा. “Romeo and Juliet मधील प्रेमाचे विश्लेषण करा.”
हिंदी साहित्य: कबीर, तुलसी यांची रचना समजून विश्लेषण करावं लागतं.
समाजशास्त्र: सामाजिक विषयांचा सखोल अभ्यास करावा लागतो. उदा. ‘ग्लोबलायझेशनचे परिणाम’.
कला विषय: चित्रकला, संगीत कल्पकता आणि सादरीकरणावर गुण मिळतात.
काही विषय स्कोरिंग आणि काही नॉन-स्कोरिंग का असतात?
मूल्यांकन पद्धत : स्कोरिंग विषयात उत्तर बरोबर की चूक हे ठराविक असतं. नॉन-स्कोरिंग विषयात उत्तर बरोबर आहे की नाही हे शिक्षक ठरवतो.
अभ्यासक्रम : स्कोरिंग विषयांचा अभ्यास मर्यादित असतो. नॉन-स्कोरिंग विषयात विचार करावा लागतो.
मार्किंग स्कीम : स्कोरिंग विषयात मार्किंग ठरलेली असते. उदा. 5 गुणांसाठी 5 मुद्दे. पण नॉन-स्कोरिंग विषयात हे ठरलेलं नसतं.
