AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

4 वाजता मेल, झोपेतून कर्मचारी उठताच धक्का, भारतात सर्वात मोठी कपात, 2600 कर्मचाऱ्यांना काढले कामाहून, बड्या कंपनीत..

नुकताच एक धक्कादायक घटना पुढे आली. एकाच वेळी एका बड्या कंपनीने तब्बल 2600 कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला. हेच नाही तर पहाटे 4 वाजता कंपनीकडून कर्मचाऱ्यांना मेल करण्यात आला. हा मेल पाहून कर्मचाऱ्यांची झोपच उडाली.

4 वाजता मेल, झोपेतून कर्मचारी उठताच धक्का, भारतात सर्वात मोठी कपात, 2600 कर्मचाऱ्यांना काढले कामाहून, बड्या कंपनीत..
Visa
| Updated on: Aug 10, 2026 | 6:58 AM
Share

गेल्या काही दिवसांपासून कर्मचाऱ्यांना कामाहून काढण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. मोठ्या मोठ्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामाहून काढून घरी बसवले. त्यामध्येच आता अजून एका बड्या कंपनीने आपल्या तब्बल 2600 कर्मचाऱ्यांना एकाचवेळी नारळ दिले. भारतीय वेळेनुसार, सकाळी 4 वाजता या कर्मचाऱ्यांना कंपनीकडून एक मेल आला. त्यात त्यांना काढून टाकण्यात आल्याबद्दल माहिती देण्यात आली. फक्त हेच नाही तर त्यांना आजपासूनच कंपनीत प्रवेश मिळणार नसल्याचे त्या मेलमध्ये स्पष्ट करण्यात आले. या कंपनीने फक्त भारतातीलच नाही तर जगभरातील कर्मचाऱ्यांना हा मेल पाठवला. आपल्या सर्वांच्या ATM कार्डवर नाव असलेली कंपनी VISA या बड्या कंपनीने मोठी कपात केली. ज्यामुळे खळबळ उडाली. सकाळी सकाळी कंपनीचा मेल पाहून कर्मचाऱ्यांची झोप उडाली.

भारतासोबतच जगभरातून तब्बल 2600 कर्मचाऱ्यांची कपात केली. कर्मचारी पहाटे साखर झोपेत असतानाच सकाळी 4 वाजता याबाबतचा मेल त्यांना आला. सकाळी ऑफिसला जाण्यासाठी लवकर उठलेल्या कर्मचाऱ्यांची हा मेल पाहून धांदळ उडाली. काय करावे आणि काय नाही हे देखील त्यांना सूचत नव्हते. एका वेळेसाठी सर्वकाही थांबले.

मेटा, गूगल, अॅमेझान, सिस्को आणि ओरॅकल या मोठ्या कंपन्यांनी यापूर्वी कर्मचाऱ्यांना कामाहून काढले. ATM ला VISA कंपनी सपोर्ट करते. ही एक बडी पेमेंट कंपनी आहे. डिजीटल सपोर्टसाठी ही एक जगप्रसिद्ध कंपनी आहे. 2600 कर्मचाऱ्यांमध्ये सर्वाधिक जास्त भारतीय कर्मचाऱ्यांना कंपनीने काढल्याचे कळते. मात्र, नक्की किती कर्मचाऱ्यांना भारतातून काढण्यात आले, याबाबत माहिती मिळू शकली नाही. मुंबई, हैद्राबाद, बंगळूर, चैन्नई या शहरांमधील व्हिसाच्या कंपन्यांना मेल आली आहेत.

मात्र, या कर्मचाऱ्यांना नक्की कोणत्या गोष्टीवरून कामाहून काढण्यात आले, याबाबतची माहिती पुढे येऊ शकली नाही. कंपनीची आर्थिक स्थितीही चांगली असल्याचे सांगितले जातंय. सोशल मीडियावर मुथुकृष्णन धंदापणी या नावाच्या व्यक्तीने पोस्ट केली. व्हिसाच्या बंगलूरू येथील कार्यालयातील 1400 कर्मचाऱ्यांना कंपनीने काढल्याचे कळतंय. AI चे कारण कंपनीकडून पुढे केल्याचेही सांगितले जातंय. कामाच्या पद्धतीमध्ये त्यांना काही बदल करायची आहेत. मात्र, कंपनीची आर्थिक स्थिती एकदम चांगली असल्याचेही सांगितले जातंय.

Follow Us
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?