थाप मारून थापाड्या गेला; बनावट ई-मेल पाठवून बँकेच्या हातावर तुरी, नाशिकच्या व्यावसायिकाला 39 लाखांचा गंडा

एका थापाड्याने नाशिकमधल्या प्रख्यात व्यावसायिकाला तब्बल 39 लाखांचा ऑनलाईन गंडा घातल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे बँकेला परस्पर बनावट ई-मेल पाठवून त्याने हे कुंभाड रचले.

थाप मारून थापाड्या गेला; बनावट ई-मेल पाठवून बँकेच्या हातावर तुरी, नाशिकच्या व्यावसायिकाला 39 लाखांचा गंडा
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Nov 11, 2021 | 11:42 PM

नाशिकः एका थापाड्याने नाशिकमधल्या प्रख्यात व्यावसायिकाला तब्बल 39 लाखांचा ऑनलाईन गंडा घातल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे बँकेला परस्पर बनावट ई-मेल पाठवून त्याने हे कुंभाड रचले. त्यातही दुसरे विशेष म्हणजे सदोदित दक्ष असण्याचा दिखावा करणाऱ्या बँकेने या मेलवर विश्वासही ठेवला. अशी ही चित्रपटालाही शोभेल मोठी रंजक स्टोरी. तुमच्या-आमच्या डोळ्यांत दक्षतेचे लख्ख अंजन घालते.

या अतिशय इंटरेस्टिंग ऑनलाईन चोरीची हकीकत अशी की, व्यवसाय जगतातील प्रख्यात नाव असणाऱ्या वासन समूहाच्या एका शोरूमच्या संचालकांचे बँक ऑफ बडोदाच्या शाखेत खाते आहे. भामट्याने चोरीची हीच सुवर्ण संधी मानली. त्याने प्रदीप वासन यांच्या नावाने एक बनावट ई-मेल अॅड्रेस तयार केला. या अॅड्रेसवरून एक खरमरीत पत्र बँक ऑफ बडोदाच्या नाशिक शाखेला लिहिले. त्यातून तत्काळ पाच वेगवेगळ्या खात्यांमध्ये एकूण 39 लाख 32 हजार 932 रुपये आरटीजीएसद्वारे वर्ग करावेत, असा लकडा लावला. बँकेच्या व्यवस्थापकांनी एवढी मोठी रक्कम पाहून त्याची पडताळणी सुरू केली. तेव्हा भामट्याने आपण वासन बोलत असल्याचे भासवले. त्यासाठी तात्काळ मोबाइलवरून बँकेशी संपर्क साधण्याचा चतुरपणा केला. शिवाय फोनवरही तत्काळ व्यवहार पूर्ण करा, असा तगादा लावला. बँकेने डोळे झाकून संबंधिताच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि काही वेळातच पैसे वर्ग करायला सुरुवात केली. त्यानंतर नेट बँकिंगद्वारे जसे जसे पैसे कमी होत गेले, तसे तसे मेसेज व्यावसायिकांच्या मोबाइलवर धडकू लागले. त्यांनी तत्काळ बँकेशी संपर्क साधला. तेव्हा हा सारा प्रकार उघड झाला. मात्र, तोपर्यंत बराच वेळ झाला होता.

अन् बँकेचे धाबे दणाणले

जेव्हा खरे खातेदार वासन यांचा बँकेत फोन धडकला, तेव्हा व्यवस्थापकांचे धाबे दणाणले. त्यांनी तात्काळ सायबर पोलीस ठाणे गाठले. या साऱ्या घोळाची कल्पना वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांना दिली. त्यांनी पोलीस निरीक्षक सुरेश कोरबू व त्यांच्या पथकाला सूचना दिल्या. त्यांनी संबंधित पाच खाती असलेल्या तीन शाखांशी संपर्क साधला. त्या संबंधित खात्यावर जमा होणारी रक्कम थांबवण्याच्या सूचना केल्या. मात्र, फक्त 13 लाख 37 हजार रुपये जमा होण्यापासून वाचवण्यात यश आले. याप्रकरणी अज्ञात भामट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Businessman’s online fraud of Rs 39 lakh, fake e-mail sent to Bank of Baroda)

इतर बातम्याः

शेतकऱ्यांना मोठा दिलासा, माथाडी कामगारांचा संप मागे; पिंपळगाव बसवंतमधील कांदा लिलाव उद्यापासून सुरू

बहीण-भावाच्या अंगावर पाण्याची टाकी कोसळली; नाशिकमध्ये 4 वर्षांची मुलगी ठार

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं चाक हेलिपॅडवर खचलं आणि...., कुठं घडला प्रकार?
शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं चाक हेलिपॅडवर खचलं आणि...., कुठं घडला प्रकार?.
बापरे... धक्कादायक... मुंबईत दोन ठिकाणी भलं मोठं होर्डिंग कोसळलं
बापरे... धक्कादायक... मुंबईत दोन ठिकाणी भलं मोठं होर्डिंग कोसळलं.
मुंबईकरांनो...ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक बंद
मुंबईकरांनो...ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक बंद.
शिंदेंची मध्यरात्री दिनकर पाटलांशी भेट, सामंतांनी सांगितलं भेटीचं कारण
शिंदेंची मध्यरात्री दिनकर पाटलांशी भेट, सामंतांनी सांगितलं भेटीचं कारण.
लोकसभेचा 4 जूनचा निकाल काय असणार? प्रविण तरडेंनी एका शब्दात सांगितलं
लोकसभेचा 4 जूनचा निकाल काय असणार? प्रविण तरडेंनी एका शब्दात सांगितलं.
डोक्यावर पगडी, लंगरमध्ये बनले वाढपी, मोदींकडून सुवर्ण मंदिरामध्ये सेवा
डोक्यावर पगडी, लंगरमध्ये बनले वाढपी, मोदींकडून सुवर्ण मंदिरामध्ये सेवा.
दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा का? ठाकरे गटाचा गंभीर आरोप काय
दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा का? ठाकरे गटाचा गंभीर आरोप काय.
मध्य रेल्वे विस्कळीत, 20 मिनिटं लोकलची वाहतूक उशिरानं; मुंबईकर संतप्त
मध्य रेल्वे विस्कळीत, 20 मिनिटं लोकलची वाहतूक उशिरानं; मुंबईकर संतप्त.
पाकीट आलं...मालकमंत्री म्हणताय फुलाला मतदान करा, रोहित पवारांचा निशाणा
पाकीट आलं...मालकमंत्री म्हणताय फुलाला मतदान करा, रोहित पवारांचा निशाणा.
बुलेटचा फायदा मराठी माणसाला की गुजरातला? ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल
बुलेटचा फायदा मराठी माणसाला की गुजरातला? ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल.