AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्या जुन्या पॅन कार्डचे काय होणार? समजून घ्या नवीन नियमात काय बदल होणार?

Digital PAN Card PAN 2.0 : सीबीडीटीने म्हटले, क्यूआर कोड नसणाऱ्या जुने पॅन कार्ड ज्यांच्याकडे आहे, ते क्यूआर कोड असणाऱ्या नवीन पॅनकार्डसाठी अर्ज करु शकतात. नवीन पॅन कार्ड व्यवस्था सुरु झाल्यावरही जुने पॅनकार्ड वैधच राहणार आहे.

तुमच्या जुन्या पॅन कार्डचे काय होणार? समजून घ्या नवीन नियमात काय बदल होणार?
| Updated on: Dec 07, 2024 | 9:53 AM
Share

Digital PAN Card PAN 2.0 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पॅन 2 प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. नवीन पॅनवर क्यूआर कोड असणार आहे. या प्रगत प्रणालीमुळे बनावट पॅन कार्ड ओळखणे सोपे होणार आहे. तसेच करदाता एकापेक्षा जास्त पॅनकार्ड ठेऊ शकणार नाही. मग जुन्या पॅनकार्डचे काय होणार? हा प्रश्न सर्वांना पडला आहे.

जुने पॅनकार्ड असणार वैध

नवीन व्यवस्था सुरु झाल्यावर जुने पॅन कार्ड वैध असणार आहे. तसेच पॅनकार्ड धारकाला नवीन पॅनकार्डसाठी अर्ज करण्याची गरज नाही. फक्त तुम्हाला कार्डवर असणाऱ्या माहितीत काही बदल करायचा असेल तर पॅन कार्ड 2.0 साठी अर्ज करावा लागणार आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (सीबीडीटी) ने PAN 2.0 प्रोजेक्टसंदर्भात महत्वाची माहिती शेअर केली. त्यातून सामान्य जनतेच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे मिळाली.

सर्व सेवा एकाच ठिकाणी येणार

सध्या देशात 78 कोटी पॅन आणि 73.28 लाख टॅन खाती आहेत. यासंदर्भातील सेवा ई फाइलिंग पोर्टल, युटीआआआयटीएसएल पोर्टल आणि प्रोटीन ई-गव्हर्नेंस पोर्टलवर आहे. परंतु PAN 2.0 लागू झाल्यावर या सर्व सेवा एकाच पोर्टलवर येणार आहे. नवीन पॅनकार्डमध्ये क्यूआर कोड असणार आहे. क्यूआर कोड सुविधा पॅन कार्डवर नवीन नाही. ही सेवा 2017-18 पासून मिळत आहे. परंतु पॅन 2.0 प्रोजेक्टमधील क्यूआर कोडमध्ये डायनॅमिक सुविधा असणार आहे. त्यामुळे पॅनच्या डेटाबेसमध्ये लेटेस्ट डेटासुद्धा पाहता येणार आहे. त्यामध्ये फोटो, सही, नाव, आई-वडिलांचे नाव आणि जन्मतारीख असणार आहे.

नवीन पॅनकार्ड हवे असल्यास किती रुपये लागणार

सीबीडीटीने म्हटले, क्यूआर कोड नसणाऱ्या जुने पॅन कार्ड ज्यांच्याकडे आहे, ते क्यूआर कोड असणाऱ्या नवीन पॅनकार्डसाठी अर्ज करु शकतात. नवीन पॅन कार्ड व्यवस्था सुरु झाल्यावरही जुने पॅनकार्ड वैधच राहणार आहे. त्याला बदलण्याची गरज नाही. परंतु फिजिकल पॅनकार्ड मिळवण्यासाठी करदात्यास 50 रुपये शुल्क लागणार आहे.

पॅनकार्डमधील माहिती अपडेट करायची असल्यास खाली लिंकवर जाऊन ती माहिती अपडेट करता येणार आहे. NSDL PAN services(https://www.onlineservices.nsdl.com/paam/endUserAddressUpdate.html) UTI PAN services (https://www.pan.utiitsl.com/PAN_ONLINE/homeaddresschange)

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.