AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WiFi चे नाव वाय-फाय असेचं का? काय होतो त्याचा अर्थ? रोज वापरणाऱ्यांनाही नाही माहिती

WiFi Wirless Internet Technology: या डिजिटल युगात इंटरनेट, वायफाय हे परवलीचे शब्द ठरले आहेत. रोज त्याचा वापर होतो. स्मार्टफोन हाती आल्यापासून इंटरनेटशिवाय त्याचा अर्थ उरत नाहीत. पण Wifi चे नाव वायफाय असंच का ठेवण्यात आलं, काय आहे त्यामागील कारण, काय होतो त्याचा अर्थ, जाणून घ्या...

WiFi चे नाव वाय-फाय असेचं का? काय होतो त्याचा अर्थ? रोज वापरणाऱ्यांनाही नाही माहिती
वायफायImage Credit source: गुगल
| Updated on: Jan 16, 2026 | 10:44 AM
Share

WiFi Wirless Internet Technology: आजच्या डिजिटल युगात वायफाय हा दैनंदिन जीवनातील परवलीचा शब्द ठरला आहे. घर असो वा ऑफिस, शाळा असो वा हॉटेल प्रत्येक ठिकाणी वायफायमुळे कनेक्टिविटी अत्यंत सोपी होते. युझर्स लोक वायफायचा वापर करतात, पण त्याचा अर्थ त्यांना माहिती नसतो. तर वायफायला हेच नाव का दिले हे पण अनेकांच्या गावी नसते. फ्री वायफायचा अनेक जणांना मोह असतो. पण त्याचा फटकाही अनेकांना बसतो. कारण त्यामुळे सायबर सिक्युरिटीचा मोठा धोका निर्माण होतो. चला तर वायफायचं नाव वायफायच असं का ठेवलं हे समजून घेऊयात…

काय आहे WiFi?

वाय फाय हे एक वायरलेस नेटवर्किंग तंत्रज्ञान आहे. हे विना कोणत्याही तारेशिवाय डिव्हाईसला इंटरनेटशी जोडते. वायफाय हे रेडिओ फ्रीक्वेंसी पद्धतीने काम करते. यामागे WLAN म्हणजे वायरलेस लोकल एरिया नेटवर्क सिस्टम असते. मोबाईल, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही सारखे डिव्हाईस वायफायद्वारे डेटा रिसिव्ह करतात आणि पाठवतात.तर वायफायचा अर्थ Wireless Fidelity असे होते. पण हा WiFi हा काही एखाद्या शब्दाचा शॉर्ट फॉर्म नाही. हे एक ब्रँड नाव आहे. 1999 मध्ये Wi Fi Alliance ने हे नाव निवडले होते. विचारपूर्वक सोप आणि सहज लक्षात ठेवण्याजोगं नाव ठेवण्यात आले.त्यामुळे IEEE 802.11 सारख्या तांत्रिक नावाची गरज पडली नाही. सर्वसामान्यांना वायफाय हे नाव आवडलेले आहे. वायफायचे नाव हे Hi-Fi (High Fidelity) वरून ठेवण्यात आले आहे.

कसे करते वायफाय काम?

WiFi सिस्टिम राऊटर इंटरनेटशी जोडणी असते. हे रेडिओ सिग्नलद्वारे आजूबाजूच्या डिव्हाईसपर्यंत नेटवर्क पोहचवते. डिव्हाईस हे सिग्नल पकडून इंटरनेटशी कनेक्ट करते. यामुळेच विना केबल इंटरनेटाचा वापर करणे सोपे होते. वायफाय हे कोणत्या एका कंपनीचे अथवा व्यक्तीची संपत्ती नाही. त्याची मानकं आणि तंत्रज्ञानाचे नियमन हे Wi Fi Alliance नावाची संगघटना करते. यामध्ये अनेक टेक कंपन्यांचा समावेश आहे. ही संघटना वायफाय तंत्रज्ञान अधिक चांगलं आणि सुरक्षित करण्यासाठी कामं करते.

वाय-फायशी संबंधित कोणता धोका?

जर वायफाय नेटवर्क सुरक्षित नसेल तर सायबस हल्ला होण्याची दाट शक्यता असते. सायबर भामटे सहजरित्या हे नेटवर्क भेदून तुमची महत्त्वाची माहिती चोरू शकतो. बँक खात्यातून रक्कमही पळवू शकतात. तर तुमच्या फोटोंचा गैरवापर करू शकतात. डेटा चोरी, हँकिंग आणि वैयक्तिक माहिती चोरी होण्याची शक्यता दाट असते. त्यामुळे लोक अनेकदा वायफाय शेअर करताना काळजी घेत नसल्याचे समोर आले आणि त्यात त्यांना फटका बसतो.