AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुसलमान पुरुष सोनं का वापरत नाहीत ? कारण वाचून थक्क व्हाल

आजकाल फक्त बायकाच नव्हे तर आजकाल अनेक पुरूषही सोनं घालतात, काहीजण सोन्याने अगदी नखशिखांत सजून गोल्ड मॅन म्हणूनही मिरवात. पण असं असलं तरी काही धर्मात पुरूषांनी मात्र सोनं घालण्याची परवानगी नाही.

मुसलमान पुरुष सोनं का वापरत नाहीत ? कारण वाचून थक्क व्हाल
मुसलमान पुरुष सोनं का वापरत नाही ?Image Credit source: social media
| Updated on: Oct 06, 2025 | 2:33 PM
Share

सोनं… सोनं घालायला कोणाला आवडत नाही ? पिवळं धम्मक, झळाळणारे सोन्याचे दागिने, कानातले, गळ्यातलं, अंगठी, कंकण, अगदी वेगवेगळ दागिने परिधान करून, ते मिरवण्याची हौस बऱ्याच लोकांना असते. फक्त बायकाच नव्हे तर आजकाल अनेक पुरूषही सोनं घालतात, काहीजण सोन्याने अगदी नखशिखांत सजून गोल्ड मॅन म्हणूनही मिरवात. पण असं असलं तरी काही धर्मात पुरूषांनी मात्र सोनं घालण्याची परवानगी नाही.

इस्लाममध्ये विनयशीलता आणि शालीनतेला खूप महत्त्व आहे. समाजात संतुलन आणि नैतिकता राखण्यासाठी इस्लाम धर्म हा पुरुष आणि महिला दोघांसाठीही वेगवेगळ्या पोशाखांचे मानक ठरवतो. या तत्त्वांनुसार, मुस्लिम पुरुषांना सोने आणि रेशीम घालण्यास सक्त मनाई आहे. एवढंच नव्हे तर ते हराम देखील घोषित करण्यात आले आहे. मात्र असं असलं तरी इस्लाम धर्मात, महिलांसाठी ते (सोनं) परवानगी योग्य असते, घालण्याची परवानगी आहे आणि ते हलाल देखील मानलं जाते. अलीगडचे मौलाना यांनी याबद्दल माहिती दिली.

मुस्लिम पुरुष सोनं का वापरत नाहीत ?

यासंदर्भात माहिती देताना, अलीगड येथील मुस्लिम धर्मगुरू मौलाना चौधरी इफ्रहिम हुसेन यांनी स्पष्ट केले की इस्लाममध्ये मुस्लिम पुरुषांसाठी सोने आणि रेशीम घालणे निषिद्ध आहे. इस्लामने याची अनेक कारणे देखील दिली आहेत. पहिले आणि सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे प्रिय पैगंबर हजरत मुहम्मद सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम यांनी सोने आणि रेशीम पुरुषांसाठी हराम आणि महिलांसाठी हलाल घोषित केले आहे. इस्लाम धर्म मानणाऱ्या कोणत्याही पुरूषाला रेशीम किंवा सोने घालणे निषिद्ध आहे.

मौलानांनी स्पष्ट केले की सोने आणि रेशीम घालण्यामुळे पुरुषांमध्ये अहंकार आणि दिखाऊपणाची इच्छा निर्माण होते, जी इस्लाममध्ये निंदनीय आहे. शिवाय, इस्लाम हा धर्म, साधेपणा आणि नम्रतेला प्राधान्य देतो, परंतु सोने आणि रेशीम हे पुरुषांमध्ये या साधेपणाच्या विरुद्ध मानले जातात. त्यांनी सांगितले की काही विद्वानांनी वैद्यकीय कारणे देखील दिली आहेत, ज्यात म्हटले आहे की सोन्याचा जास्त वापर केल्यास, पुरुषत्वावर परिणाम होतो. म्हणून, ते पुरुषांसाठी निषिद्ध आहे. मात्र तेच सोने आणि रेशीम हे महिलांसाठी परवानगीयोग्य आणि हलाल मानले जातात, कारण त्यामुळे त्यांचे सौंदर्य आणि शोभा वाढते. म्हणूनच इस्लाम धर्म हा महिलांना (सोन्याच्या वापरासाठी) परवानगी देतो आणि पुरुषांसाठी ते निषिद्ध आहे.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....