AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ ट्रिक्सच्या मदतीने काही मिनिटांत स्वच्छ होईल स्वंयपाकघरातील चिमणीपासून ते टाईल्सपर्यंत चिवट तेलकटपणा

स्वयंपाकघर हे प्रत्येक घराचा एक महत्वाचा भाग असल्याने ते स्वच्छ ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे. मात्र स्वंयपाकघरात फोडणी देताना टाईल्सवर उडलेले तेल, मसाले आणि धुरामुळे चिमणी आणि आजूबाजूचा भागांवर चिवट तेलकटपणा जमा होतो. तर हा चिवटपणा काढण्यासाठी आजच्या लेखात काही सोप्या किचन ट्रिक्स जाणून घेऊयात.

'या' ट्रिक्सच्या मदतीने काही मिनिटांत स्वच्छ होईल स्वंयपाकघरातील चिमणीपासून ते टाईल्सपर्यंत चिवट तेलकटपणा
Image Credit source: Social media
| Edited By: | Updated on: Apr 07, 2026 | 12:47 PM
Share

स्वयंपाकघरातील चिमणी तसेच टाईल्सवरील तेलकट व चिवटपणा काढण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. कारण स्वयंपाक करताना गॅसच्या अवतीभोवती मसाल्याचे, तेलाचे अनेक चिवट पिवळे डाग दिसू लागतात आणि हे डाग सहज साफ करता येत नाही. पण अशावेळेस एखादा सोपा, प्रभावी व कमी खर्चाचा उपाय शोधत असाल, तर या किचन हॅक्स अत्यंत उपयुक्त ठरू शकतात. या सोप्या टिप्सचे पालन करून, तुम्ही तुमचे स्वयंपाकघर पुन्हा नव्यासारखे चमकवू शकता आणि त्याची स्वच्छता टिकवून ठेवू शकता. या काही सोप्या घरगुती पद्धती आहेत ज्या तुम्हाला जास्त मेहनत न करता काही मिनिटांत चिवट डाग आणि तेलकटपणा साफ करण्यास मदत करू शकतात. चला तर मग आपले स्वयंपाकघर चकचकीत करण्यासाठी काही स्मार्ट ट्रिक्स जाणून घेऊयात.

व्हिनेगर आणि बेकिंग सोड्याची कमाल

किचनच्या टाईल्स, चिमणी आणि स्लॅबवरील तेलकटपणा काढण्यासाठी व्हिनेगर आणि बेकिंग सोडा हे एक अत्यंत प्रभावी उपाय आहे. प्रथम चिकट तेलटपणा असलेल्या भागावर बेकिंग सोडा लावा, नंतर त्यावर व्हिनेगर स्प्रेच्या साहाय्याने फवारा. तेलकटपणा व चिकटपणा सहज निघावा यासाठी ते काही मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर, स्पंज किंवा ब्रशने हळुवारपणे घासून स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे हट्टी तेलकटपणा सहजपणे निघून जातो.

गरम पाणी आणि भांडी धुण्याचे लिक्विड

चिमणी आणि किचनच्या टाईल्सवरील रोजचा तेलकटपणा साफ करण्यासाठी कोमट पाणी आणि डिशवॉशिंग लिक्विडचा उपाय प्रभावी ठरतो. एका भांड्यात कोमट पाणी घ्या आणि त्यात थोडे डिशवॉशिंग लिक्विड मिक्स करा. या मिश्रणात एक कापड किंवा स्पंज बुडवा आणि स्वंयपाकघरातील चिमणी तसेच टाईल्सवरील तेलकटपणा पुसून घ्या. या पद्धतीमुळे तेलकटपणा लवकर निघतो,ज्यामुळे तुमचे स्वयंपाकघर चकचकीत स्वच्छ होते.

लिंबू आणि मीठ वापरून खोलवर स्वच्छता

लिंबामधील आम्ल आणि मिठाची शक्ती चिवट तेलकटपणा काढून टाकण्यास मदत करतात. एक लिंबू अर्धे कापून, त्यावर मीठ लावा आणि ते थेट स्वंयपाकघरातील तेलकट चिवट डाग पडलेल्या भागावर चोळा. थोड्या वेळाने ओल्या कापडाने ते पुसून टाका. यामुळे केवळ तेलकटपणाच निघून जात नाही, तर स्वयंपाकघरात ताजेपणाचा सुगंधही दरवळतो.

बेकिंग सोडा पेस्टने घाण स्वच्छ करा

तुमच्या स्वयंपाकघरात खूप चिवट डाग असेल तर बेकिंग सोड्याची पेस्ट उत्तम ठरू शकते. बेकिंग सोडा थोड्या पाण्यात मिक्स करून एक घट्ट पेस्ट तयार करा. त्यानंतर ही पेस्ट चिवट डाग असलेल्या भागावर लावा आणि 10 ते 15 मिनिटे तशीच राहू द्या. त्यानतर, ब्रशने घासून ओल्या कापडाने पुसून घ्या. यामुळे तेलाचे जाड थरसुद्धा सहजपणे निघून जातात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
अभिनेता रोहित चंदेलवर कारवाई, अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर थेट...
मोठी बातमी! अभिनेता रोहित चंदेलवर कारवाई, अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर थेट...
कोणी जिवंत कोंबडा अंगावरून उतरवला तर कोणी...विनायक राऊतांच्या सूनेनं
कोणी जिवंत कोंबडा अंगावरून उतरवला तर कोणी...विनायक राऊतांच्या सूनेनं सांगितली लग्नानंतरची प्रत्येक घटना
विनायक राऊत प्रकरणाला नवं वळण! सुनेच्या आरोपांवर दिलं सडेतोड उत्तर....
Vinayak Raut | विनायक राऊत प्रकरणाला नवं वळण! सुनेच्या आरोपांवर दिलं सडेतोड उत्तर, म्हणाले...
गोमूत्र प्यायला दिलं अन् डोक्यावरचे केस... विनायक राऊतांच्या सूनेचा...
गोमूत्र प्यायला दिलं अन् डोक्यावरचे केस... विनायक राऊतांच्या सूनेचा हादरवणारा दावा; थेट....
विनायक राऊत अडचणीत! सुनेचे धक्कादायक आरोप; 7 जणांविरोधात गुन्हा दाखल
Vinayak Raut | विनायक राऊत अडचणीत! सुनेचे धक्कादायक आरोप; 7 जणांविरोधात गुन्हा दाखल
शिवसेना फोडल्याचं बक्षीस मिळालं... आता पुन्हा CM...; शिंदेंबाबत संजय..
Sanjay Raut on Eknath Shinde | शिवसेना फोडल्याचं बक्षीस मिळालं... आता पुन्हा CM...; शिंदेंबाबत संजय राऊतांचं मोठं भाकीत
मोठी बातमी! ओमराजे आणि एकानाथ शिंदेंची तातडीची बैठक; धाराशिवबाबत
मोठी बातमी! ओमराजे आणि एकानाथ शिंदेंची तातडीची बैठक; धाराशिवबाबत सर्वात मोठा निर्णय, आता....
खडसेंचा गौप्यस्फोट! शाहांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली, पण...
Eknath Khadse | एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट! अमित शाहांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली, पण...
सडलेलं अन्न, Unsafe Products?; स्विगी इन्स्टामार्टवर FSSAIचा मोठा दणका
ऑनलाइन अन्न मागवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! स्विगी इन्स्टामार्टवर FSSAIचा मोठा दणका
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश