AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जग झोपलेले असताना चैतन्यमय भारत जन्मला, पंडित नेहरुंचे ते भाषण आणि भारताच्या स्वातंत्र्याची कहाणी

स्वांतत्र्य दिनाला दिल्ली खास सोहळा असतो. लाल किल्ला हा या सोहळ्याच्या केंद्र स्थानी असतो, कारण लाल किल्ल्यावरच देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहर लाल नेहरु यांनी भारतीय ध्वज फडकविला होता. चला तर पाहूयात स्वातंत्र्याची कहाणी...

जग झोपलेले असताना चैतन्यमय भारत जन्मला, पंडित नेहरुंचे ते भाषण आणि भारताच्या स्वातंत्र्याची कहाणी
Independence Day history
| Updated on: Aug 10, 2024 | 7:56 PM
Share

भारताला 15 ऑगस्ट 2023 रोजी 76 वा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहे. या दिवशी साल 1947 रोजी ब्रिटीशांपासून आपल्याला मुक्त श्वास घेता आला. तर साल 1950 मध्ये आपण घटनेचा स्वीकार केला. यात काही संशय नाही की ब्रिटीशांपासून आपल्या सहजासहजी स्वातंत्र्य मिळालेले नाही यासाठी हजारो लोकांना आपले प्राण वेचावे लागले. अनेकांना फासावर जावे लागले. स्वातंत्र्य सैनिकांनी हसत हसत प्राण अर्पण केले. 15 ऑगस्ट रोजी आपल्याला राष्ट्रीय सुट्टी असते, केंद्र सरकारची आणि राज्य सरकारची सर्व कार्यालये बंद असतात. पोस्ट आणि बॅंका बंद असतात.

भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास –

1757 मध्ये भारतात ब्रिटीशांचे राज्य सुरु झाले. त्यानंतर प्लासीच्या लढाईत ईस्ट इंडिया कंपनीचा विजय झाला. त्यानंतर ब्रिटीशांचे भारतावर नियंत्रण आले.ईस्ट इंडिया कंपनीने सुमारे 100 वर्षे भारतात राज्य केले.त्यानंतर 1857-58 मध्ये भारतीयांनी उठाव केला परंतू त्यात यश आले नाही. आणि ब्रिटीश सरकारने भारताचा संपूर्ण ताबा घेतला. पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान भारतीय स्वातंत्र्याची चळवळ सुरु झाली. याचे नेतृत्वल महात्मा गांधी यांनी केले. महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या माध्यमातून आणि असहकार चळवळीतून ब्रिटीशांना विरोध करणे सुरु केले होते. त्यानंतर सविनय कायदेभंगाची चळवळ सुरु झाली. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देश आज्ञा पाळत होता.

1946 मध्ये ब्रिटनच्या लेबर सरकारने दुसऱ्या महायुद्धाच्या काळात बसलेल्या आर्थिक फटक्यांमुळे आणि भारतीयांचा टोकाचा विरोध सुरु झाल्याने भारतातील आपले बस्तान आवरते घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर ब्रिटीश सरकारने 1947 च्या सुरुवातीलाच जून 1948 पर्यंत सर्व सत्ता भारताला टप्प्या टप्प्याने सोपविण्याची घोषणा केली. परंतू पंजाब आणि बंगाल मध्ये हिंदू आणि मुस्लीमातील हिंसा काही केल्या कमी होत नव्हती. जून 1947 रोजी पंडित जवाहर लाल नेहरु, मोहम्मद अली जिन्ना, अब्दुल कलाम आझाद आणि डॉ.बी.आर.आंबेडकर आदी नेते भारताच्या फाळणीसाठी सहमत झाले होते. विविध धार्मिक समुहांनी त्यांचे रहाण्याचे ठिकाण निवडण्यास सुरुवात केली होती. परंतू या दंगलीत अडीच ते पाच लाख लोक मारले गेले. 15 ऑगस्ट 1947 च्या मध्यरात्री भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि यावेळी पहिले पंतप्रधान पंडित जवाहर लाल नेहरु यांच्या ‘ट्रिस्ट विथ डेस्टिनी’ ने याचा समारोप झाला.

भारतीय स्वातंत्र्य अधिनियम 1947 काय ?

ब्रिटीश पंतप्रधान क्लेमेंट एटली यांनी 20 फेब्रुवारी 1947 रोजी घोषणा केली भारतातील ब्रिटन सरकारचे शासन 30 जून 1948 पर्यंत संपेल.त्यानंतर सत्तेची सूत्रे जबाबदार व्यक्तींच्याकडे सुपूर्द केली जातील. या घोषणेनंतर मुस्लीम लीगने आंदोलन केले गेले आणि देशाच्या फाळणीची मागणी केली गेली. त्यानंतर 3 जून 1947 ब्रिटीश सरकारने घोषणा केली की 1946 मध्ये स्थापित भारतीय संविधान सभेद्वारे तयार केलेली घटना त्या भागाला लागू केली जाणार नाही जो भाग त्यास स्वीकारण्यास तयार होणार नाही.

लॉर्ड माऊंटबॅटन योजना म्हणजे काय ?

3 जून 1947 रोजी भारताचे व्हॉईस रॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांनी फाळणीची योजना समोर ठेवली. त्यास माऊंटबॅटन योजना असे म्हटले जाते. ही योजना कॉंग्रेस आणि मुस्लीम लीगने स्वीकार केली. भारतीय स्वातंत्र्य अधिनियम 1947 योजना त्यानंतर तात्काळ लागू झाली. 14 ऑगस्टच्या मध्यरात्री ब्रिटीश सरकारचे राज्य संपुष्ठात आले. त्यानंतर सत्ता दोन नव्या राष्ट्रांमध्ये हस्तांतरित केली गेली. जवाहर लाल नेहरु स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान बनले. 1946 मध्ये स्थापित संविधान सभेनूसार भारतीय संसदेची रचना झाली. मध्यरात्री बाराचे ठोके पडले आणि भारत  पारतंत्र्य संपून  स्वतंत्र झाला. लाल किल्ल्यावरील लाहोरी गेटवर ब्रिटिशांचा युनियन जॅक खाली उतरवण्यात आला. त्याच्या जागी भारताचा तिरंगी ध्वज फडकवण्यात आला.  गुलामगिरीच्या बंधने गळून पडली आणि देश स्वतंत्र झाला. पंडित नेहरु म्हणाले की अनेक वर्षांपूर्वी आपण नियतीशी एक करार केला होता. आज त्याची पूर्तता होत आहे, पूर्णपणे नसली तरी बर्‍याच मोठया प्रमाणात आपण करत आहोत. मध्यरात्रीचा ठोका पडेल तेव्हा सारे जग झोपलेले असताना स्वतंत्र आणि चैतन्यमय भारत जन्माला येईल… हे नेहरुंचे भाषण तेव्हा गाजले होते.

दरवर्षी भूदल, नौदल आणि वायदल लाल किल्ल्यावर परेड करते. आणि शाळेतील लहान मुले रंगीबेरंगी कपडे घालून पाहुण्यांसमोर झेंडा वंदन समारंभ साजरा करतात. यावेळी देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर भारताचा तिरंगा ध्वज फडकवितात आणि भाषण करतात. देशाच्या राजधानी दिल्लीत विविध शाळा आणि संघटना सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करीत असतात.

साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.